Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“१०-१५ तास लाईनमध्ये थांबूनही शेतकऱ्यांना…” इंधन तुटवड्यावरून रोहीत पवार यांचा सरकारवर निशाणा

नागरिकांनी पेट्रोल डिझेल भरण्याकरता पेट्रोल पंपांवर मोठी गर्दी केल्याचे चित्र दिसत आहे. अश्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी यावरून सरकारवर निशाणा साधला आहे.

  • By विवेक
Updated On: May 23, 2026 | 05:21 PM
Rohit Pawaar slams Maharashtra Government over Petrol Diesel price hike, Petrol Diesel price hike, Petrol Diesel shortage, Rohit Pawaar slams Maharashtra Government ,

Rohit Pawaar slams Maharashtra Government over Petrol Diesel price hike, Petrol Diesel price hike, Petrol Diesel shortage, Rohit Pawaar slams Maharashtra Government ,

Follow Us
Follow Us:
  • पेट्रोल डिझेल तुटवडयावरून तसेच गेल्या आठ दिवसात तीनवेळा झालेल्या इंधन दरवाढीवरून नागरिक संतप्त
  • रोहित पवार यांचा सरकारवर निशाणा
  • साठेबाजी करायला शेतकऱ्यांना डिझेल काही फुकट मिळत नाही आणि १५ तास लाईनमध्ये उभे राहायला त्यांच्याकडे वेळ देखील नाही – रोहित पवार
पेट्रोल डिझेल तुटवडयावरून तसेच गेल्या आठ दिवसात तीनवेळा झालेल्या इंधन दरवाढीवरून आता नागरिक चांगलेच संतप्त झाल्याचे चित्र दिसत आहे. नागरिकांमध्ये इंधन तुटवड्यावरून तणावाचे वातावरण असून शेतकरीवर्गातदेखील इंधन तुटवड्यावरून चिंता व्यक्त केली जात आहे. पेरणीपूर्वीच ट्रॅक्टरमध्ये टाकण्यासाठी इंधन उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. ग्रामीण भागात विशेष करून परभणी, हिंगोली, वाशीम आणि बुलढाणा जिल्ह्यात नागरिकांनी पेट्रोल डिझेल भरण्याकरता पेट्रोल पंपांवर मोठी गर्दी केल्याचे चित्र दिसत आहे. अश्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी यावरून सरकारवर निशाणा साधला आहे.

राज्ज्यात इंधन टंचाईच्या उद्भवलेल्या प्रश्नावरून मुख्यमंत्री फडणवीस यांनी कुणीही इंधनाचा साठा करू नये यासाठी प्रशासनाला आदेश दिले आहेत. त्यावरून आता रोहित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले रोहित पवार?

आपल्या अधिकृत ‘X’ अकाउंटवरून सरकारवर निशाणा साधत ते म्हणाले, “राज्यभरात विशेषतः मराठवाडा, विदर्भ, खान्देशात डिझेलचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून शेतीच्या मशागतीची कामे पूर्णतः खोळंबली आहेत. १०-१५ तास लाईनमध्ये थांबूनही शेतकऱ्यांना डिझेल मिळत नसल्याची परिस्थिती आहे. सर्वाधिक तक्रारीचे फोन याच भागातून येत आहेत. या भागातल्या लोकांना जाणीवूर्वक वंचित ठेवले जात आहे का? असा प्रश्न पडतो.”

राज्यभरात विशेषतः मराठवाडा, विदर्भ, खान्देशात डिझेलचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून शेतीच्या मशागतीची कामे पूर्णतः खोळंबली आहेत. १०-१५ तास लाईनमध्ये थांबूनही शेतकऱ्यांना डिझेल मिळत नसल्याची परिस्थिती आहे. सर्वाधिक तक्रारीचे फोन याच भागातून येत आहेत. या भागातल्या लोकांना… pic.twitter.com/En16wEiuaC — Rohit Pawar (@RRPSpeaks) May 23, 2026

पुढे ते म्हणाले, “साठेबाजी करायला शेतकऱ्यांना डिझेल काही फुकट मिळत नाही आणि १५ तास लाईनमध्ये उभे राहायला त्यांच्याकडे वेळ देखील नाही. आगाऊ रक्कम भरूनही पेट्रोलपंप चालकांना डिझेल मिळतच नसल्याने पेट्रोलपंप चालकांना निर्देश देऊन समस्या कशी सुटणार? समस्येचे मूळ suply chain मध्ये आहे. त्यामुळं सरकारने केंद्राकडून वेळेत आणि पुरेसा इंधन पुरवठा होण्यासाठी प्रयत्न करावेत.”

पेट्रोल डिझेलची भाववाढ सुरूच, ग्रामीण भागात शेतकऱ्यांना डिझेल नाही, मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आदेश

फडणविसांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश

मुख्यमांत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे पाऊल उचलत पेट्रोल डिझेल टंचाईबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज (शनिवार, २२ मे) शिर्डी येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते यावेळी म्हणाले, “शेतकऱ्यांना जे काही डिझेल लागेल ते ते उपलब्ध करवून द्या असे आदेश मी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. पण शेतकऱ्यांच्या नावाखाली कोणी साठेबाजी करत असेल तर त्यांच्यावर लक्ष ठेवा. कारण काही भागात डिझेलची मागणी २० ते ३० टक्क्यांनी वाढली आहे. अश्याप्रकारे डिझेलची मागणी अचानक वाढत असेल तर काहीतरी गडबड असण्याची शक्यता आहे. शेतकऱयांना त्रास होऊ नये यासाठी मी उपाययोजना करायला सांगितले आहे. काही ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी आरसी बुक बघून त्यांना डिझेल देणे सुरु केले आहे,” असे ते यावेळी म्हणाले.

Satara News: लोकप्रतिनिधींनी स्वेच्छेने निवृत्तीवेतनाचा त्याग करावा; सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरेंचे आवाहन

Web Title: Rohit pawaar slams maharashtra government over petrol diesel price hike

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2026 | 05:21 PM

Topics:  

  • Diesel Price Hike
  • Petrol diesel price
  • rohit pawar

संबंधित बातम्या

Petrol Diesel Price Hike: पेट्रोल – डिझेलच्या किमतीचा उडणार भडका! काय आहे कारण
1

Petrol Diesel Price Hike: पेट्रोल – डिझेलच्या किमतीचा उडणार भडका! काय आहे कारण

Rohit Pawar News: गुन्हेगारीत महाराष्ट्र यूपी, बिहारच्या पुढे!; जुन्नर प्रकरणावरून रोहित पवारांचा सरकारवर घणाघात
2

Rohit Pawar News: गुन्हेगारीत महाराष्ट्र यूपी, बिहारच्या पुढे!; जुन्नर प्रकरणावरून रोहित पवारांचा सरकारवर घणाघात

SIR प्रक्रियेवर रोहित पवारांचा गंभीर आरोप; मतदारांचा हक्क धोक्यात असल्याचा दावा
3

SIR प्रक्रियेवर रोहित पवारांचा गंभीर आरोप; मतदारांचा हक्क धोक्यात असल्याचा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.