(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (शनिवार, २२ मे) शिर्डी येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते यावेळी म्हणाले, “शेतकऱ्यांना जे काही डिझेल लागेल ते ते उपलब्ध करवून द्या असे आदेश मी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. पण शेतकऱ्यांच्या नावाखाली कोणी साठेबाजी करत असेल तर त्यांच्यावर लक्ष ठेवा. कारण काही भागात डिझेलची मागणी २० ते ३० टक्क्यांनी वाढली आहे. अश्याप्रकारे डिझेलची मागणी अचानक वाढत असेल तर काहीतरी गडबड असण्याची शक्यता आहे. शेतकऱयांना त्रास होऊ नये यासाठी मी उपाययोजना करायला सांगितले आहे. काही ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी आरसी बुक बघून त्यांना डिझेल देणे सुरु केले आहे,” असे ते यावेळी म्हणाले.
पेट्रोल पंपावर लोकांची झुंबड, व्हायरल व्हिडियोवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना सुनावले
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडियो तुफान व्हायरल होत असून भारतातील इंधन टंचाईचे भीषण वास्तव यातून समोर येताना दिसत आहे. बुलढाण्यात लोणार येथील एका पेट्रोल पंपावर पेट्रोल – डिझेल घेण्यासाठी लोकांची झुंबड उडाल्याची व्हिडियो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडियोत शेकडो लोक हातात कॅन घेऊन पेट्रोल पंपच्या दिशेने पळत असल्याचे दिसत आहे. आता या व्हिडियोवरून राज्यातील विरोधकांनी सत्ताधारी नेत्यांवर चांगलीच आगपाखड केली आहे. लवकरच महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन होणार आहे. याआधी शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामाला सुरुवात करण्यात येत आहे. मात्र पेरणीसाठी ट्रॅक्टरमध्ये डिझेल उपलबध होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.






