Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘शरद पवार गटाचा एकही आमदार फुटणार नाही’; रोहित पवारांचा ठाम विश्वास, संजय दिना पाटील यांच्या वर्तनावरही टीका

शिवसेना ठाकरे गटातील सहा खासदारांच्या पक्षांतरानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील आमदार फुटणार असल्याच्या चर्चांना रोहित पवार यांनी पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. पक्षातील सर्व आमदार आणि खासदार शरद पवार यांच्या नेतृत्वासोबत ठाम असल्याचा दावा त्यांनी केला.

  • By विवेक
Updated On: Jun 25, 2026 | 09:23 PM
प्रकृती अस्वस्थ्यामुळे रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

प्रकृती अस्वस्थ्यामुळे रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

Follow Us
Follow Us:
  • राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा एकही आमदार किंवा खासदार फुटणार नसल्याचा रोहित पवारांचा दावा.
  • पत्रकारांशी अरेरावी केल्याप्रकरणी संजय दिना पाटील यांच्यावर अप्रत्यक्ष टीका.
  • विरोधी पक्ष फोडण्याची केंद्र सरकारला आता गरज नसल्याचे रोहित पवार यांचे मत
 

शिवसेना ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर राज्याच्या राजकारणात पक्षफोडीच्या चर्चांना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील आमदारही फुटू शकतात, अशा चर्चांना उधाण आले होते. मात्र, या सर्व चर्चांना उत्तर देताना आमदार रोहित पवार यांनी पक्षातील एकही आमदार किंवा खासदार पक्ष सोडणार नसल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला.

लातूर दौऱ्यावर असताना माध्यमांशी संवाद साधताना रोहित पवार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील सर्व लोकप्रतिनिधी पक्ष नेतृत्वासोबत ठामपणे उभे आहेत. त्यामुळे पक्षफोडीच्या चर्चांना कोणताही आधार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

संजय दिना पाटील यांच्या वर्तनावर रोहित पवारांची नाराजी

शिंदे गटात प्रवेश केलेले खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांशी अरेरावी केल्याच्या घटनेवर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. पत्रकारांशी अशा प्रकारे वागणे योग्य नसल्याचे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे संजय दिना पाटील यांच्यावर टीका केली.

‘स्वतःच्या रक्ताशी गद्दारी करत नाही ना?’, संविधान हत्या दिनाच्या पोस्टवरून काँग्रेसचा अशोक चव्हाणांना टोला

महाविकास आघाडीमध्ये असताना त्यांच्याकडून अशा प्रकारची भाषा किंवा वर्तन कधीच पाहायला मिळाले नव्हते, असे सांगताना रोहित पवार म्हणाले की, सत्तेत गेल्यानंतर काही नेत्यांच्या वागणुकीत अहंकार दिसून येतो. लोकप्रतिनिधींनी संयम आणि जबाबदारीने वागण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.

विरोधी पक्ष फोडण्याची गरज उरलेली नाही

रोहित पवार यांनी केंद्रातील राजकीय परिस्थितीवरही भाष्य केले. केंद्र सरकारकडे आधीच आवश्यक राजकीय ताकद असल्याने विरोधी पक्षांतील आमदार-खासदार फोडण्याची गरज उरलेली नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील आमदार फुटणार असल्याच्या चर्चांना त्यांनी फेटाळून लावले.

‘रोजच्या शिवीगाळीने महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक’, संजय राऊत यांच्यावर कारवाईची मागणी करत महिला सेनेचे पोलीस आयुक्तांना निवेदन

राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांच्या या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झाले असून आगामी काळात विरोधी पक्षातील एकजूट कायम राहते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Rohit pawar on ncp sharad pawar mla defection sanjay dina patil criticism

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 09:23 PM

Topics:  

  • NCP Sharad Pawar
  • rohit pawar
  • Sanjay Dina Patil

संबंधित बातम्या

शरद पवार गटाच्या खासदारांची प्रधानमंत्री मोदींसोबत २० मिनिटे चर्चा; अमोल कोल्हेंनी भेटीचा सगळा तपशीलच सांगितला…
1

शरद पवार गटाच्या खासदारांची प्रधानमंत्री मोदींसोबत २० मिनिटे चर्चा; अमोल कोल्हेंनी भेटीचा सगळा तपशीलच सांगितला…

‘पवारांचे खासदार मोदींना भेटून काय दिवे लावणार?’; अंबादास दानवेंचा हल्लाबोल, डीलिमिटेशनवरही सवाल
2

‘पवारांचे खासदार मोदींना भेटून काय दिवे लावणार?’; अंबादास दानवेंचा हल्लाबोल, डीलिमिटेशनवरही सवाल

सुप्रिया सुळेंसह राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 8 खासदार सोमवारी प्रधानमंत्री मोदींची घेणार भेट; नेमकी काय चर्चा होणार?
3

सुप्रिया सुळेंसह राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 8 खासदार सोमवारी प्रधानमंत्री मोदींची घेणार भेट; नेमकी काय चर्चा होणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.