Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

” कांदा उत्पादक आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न,” रोहित पवार यांची राज्य सरकारवर टीका

नाशिक जिल्ह्यातील चांदवड चौफुली येथे महाविकास आघाडीच्या वतीने शेतकरी क्रांती महामोर्चा काढण्यात आला. मात्र पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. यावरून आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी यावरून सरकारवर निशाणा साधला.

  • By विवेक
Updated On: May 26, 2026 | 03:57 PM
Rohit pawar slams Maharashtra Government over Police took action on protestors, Rohit pawar slams Maharashtra Government , Onion Farmers Protest,

Rohit pawar slams Maharashtra Government over Police took action on protestors, Rohit pawar slams Maharashtra Government , Onion Farmers Protest,

Follow Us
Follow Us:

आखाती देशांतील युद्ध आणि निर्यात बंदीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. राज्यात कांद्याचे दर कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाल्याचे चित्र दिसत आहे. कांद्याचा खर्चहि निघत नसल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले असल्याचे चित्र राज्यात दिसत आहे. यावरून आता महाविकास आघाडीकडून मोठे आंदोलन करण्यात आले असून कांद्याला ३ हजार रुपये हमीभाव मिळावा या मागणीसाठी नाशिक जिल्ह्यातील चांदवड चौफुली येथे महाविकास आघाडीच्या वतीने शेतकरी क्रांती महामोर्चा काढण्यात आला. मात्र पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. यावरून आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी यावरून सरकारवर निशाणा साधत, “आज पोलिसी बळाचा वापर करून आंदोलन दडपण्याचे काम सरकारने केले. या सरकारच्या काळात शेतकऱ्यांनी आपला हक्क मागणं गुन्हा झालाय का?” असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे.

या शेतकरी महामोर्चात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे (श.प.) प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, शिवसेना (उबाठा) आमदार अंबादास दानवे, आमदार रोहित पवार, खासदार शोभाताई बच्छाव, खासदार भगरे गुरुजी तसेच महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ, शिवसेना नेते अंबादास दानवे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिदे, आमदार रोहित पवार यांनीही शेतक-यांना मार्गदर्शन करताना भाजपा सरकारवर सडकून टीका केली.

पोलिसांनी आंदोलकांना घेतले ताब्यात

कांदा दरवाढीवरून निघालेले आंदोलन काहीच वेळात चिघळल्याचे चित्र पाहायला मिळाले. आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करत रस्ता रोको केला. काही आंदोलकांनी वगणांची हवा सोडण्याचा प्रयत्न केला असा आरोप करण्यात येत आहे. यामुळे मोठी तणावाची परिस्थिती निर्माण झाली. यातच पोलीस आणि आंदोलक यात झटपट झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. यानंतर पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली. पोलिसांनी रोहित पवार, हर्षवर्धन सकपाळ, अंबादास दानवे आणि शशिकांत शिंदे यांच्यासह अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले.

‘कांद्याला हमीभाव मिळालाच पाहिजे,’ कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी महाविकास आघाडीकडून क्रांती महामोर्चा

काय म्हणाले रोहित पवार?

आंदोलनात पोलिसांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना तसेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ताब्यात घेतले. यावरून आमदार रोहित पवार यांनी आपल्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून राज्य सरकारवर निशाणा साधला. ते यावेळी म्हणाले, “कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याऐवजी जर आंदोलकांना अटक केली जात असेल, तर हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न आहे. आज पोलिसी बळाचा वापर करून आंदोलन दडपण्याचे काम सरकारने केले. या सरकारच्या काळात शेतकऱ्यांनी आपला हक्क मागणं गुन्हा झालाय का?” असं प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

“आम्हाला आज अटक करून हा प्रश्न सुटला, असं सरकारला वाटत असेल तर हा त्यांचा गैरसमज आहे. १८ तारखेच्या शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर सरकारने ३ रुपये वाढवले आणि आजच्या शेतकऱ्यांच्या एकजुटीचा धसका घेऊन मुंबईपासून दिल्लीत हालचाली सुरू झाल्या असून उद्या दिल्लीत केंद्र सरकारच्या मंत्र्यांसोबत राज्याचे मुख्यमंत्री, पणन मंत्री यांच्या बैठका होणार आहेत, हे शेतकरी एकजुटीचे यश आहे,” असे ते म्हणाले.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याऐवजी जर आंदोलकांना अटक केली जात असेल, तर हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न आहे. आज पोलिसी बळाचा वापर करून आंदोलन दडपण्याचे काम सरकारने केले. या सरकारच्या काळात शेतकऱ्यांनी आपला हक्क मागणं गुन्हा झालाय का? आम्हाला आज अटक करून हा… pic.twitter.com/NF0MCE6cM4 — Rohit Pawar (@RRPSpeaks) May 26, 2026

ते पुढे म्हणाले, “कांदा उत्पादक शेतकऱ्यांची ही लढाई इतक्यात संपणारी नसून उद्याच्या बैठकीत जर ठोस निर्णय झाला नाही, तर कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून आपली लढाई तीव्र करतील आणि ते मात्र या सरकारला परवडणारे नसेल, हे या सरकारने ध्यानात घ्यावे.”

Devendra Fadnavis : इंधनाची वाढती मागणी, साठेबाजीचा संशय; कांद्याचा खरेदी दर 15 रुपये किलो, सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये

Web Title: Rohit pawar slams maharashtra government over police took action on protestors

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 03:57 PM

Topics:  

  • Farmer Issue
  • Farmer Protest
  • Onion Farmer
  • rohit pawar

संबंधित बातम्या

Rohit Pawar on Congress: रोहित पवार काँग्रेसच्या वाटेवर? राहुल गांधींसोबतच्या वाढत्या जवळीकतेमुळे राजकीय चर्चांना उधाण
1

Rohit Pawar on Congress: रोहित पवार काँग्रेसच्या वाटेवर? राहुल गांधींसोबतच्या वाढत्या जवळीकतेमुळे राजकीय चर्चांना उधाण

‘सरकारला जागे करण्यासाठी एकत्र लढू,’ रोहित पवार याचे प्रतिपादन; स्मार्ट मीटरविरोधात हिंगणघाटात मोर्चा
2

‘सरकारला जागे करण्यासाठी एकत्र लढू,’ रोहित पवार याचे प्रतिपादन; स्मार्ट मीटरविरोधात हिंगणघाटात मोर्चा

Rohit Pawar on Nagpur Event:’ भाजपकडून राहुल गांधींच्या कार्यक्रमाची कॉपी!; रोहित पवारांची देवेंद्र फडणवीसांवर बोचरी टीका
3

Rohit Pawar on Nagpur Event:’ भाजपकडून राहुल गांधींच्या कार्यक्रमाची कॉपी!; रोहित पवारांची देवेंद्र फडणवीसांवर बोचरी टीका

Rohit Pawar News: गुन्हेगारीत महाराष्ट्र यूपी, बिहारच्या पुढे!; जुन्नर प्रकरणावरून रोहित पवारांचा सरकारवर घणाघात
4

Rohit Pawar News: गुन्हेगारीत महाराष्ट्र यूपी, बिहारच्या पुढे!; जुन्नर प्रकरणावरून रोहित पवारांचा सरकारवर घणाघात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.