Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘तर तुमच्या तंत्रज्ञानाला काय चाटायचं का?’ मोशी दुर्घटनेवरून रोहित पवारांचा राज्य सरकारवर निशाणा, 64 तास उलटूनही बचावकार्य सुरूच !

पिंपरी-चिंचवडच्या मोशी येथील इमारत दुर्घटनेनंतर सुरू असलेल्या बचावकार्यावरून आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर टीका केली. 'गरीबांच्या जीवाची किंमत नाही का?' असा सवाल करत त्यांनी ठेकेदारांवर कठोर कारवाईची मागणी केली.

  • By विवेक
Updated On: Jul 11, 2026 | 05:58 PM
Rohit Pawar, Disha Salian Case CBI FIR, Aaditya Thackeray, Sushant Singh Rajput,

Rohit Pawar, Disha Salian Case CBI FIR, Aaditya Thackeray, Sushant Singh Rajput,

Follow Us
Follow Us:

पुण्यातील पिंपरी-चिंचवडमधील मोशी (Pune Moshi Building Collapse) येथे झालेल्या भीषण इमारत दुर्घटनेला तब्बल 64 तास उलटले असून, बचावकार्य अद्यापही युद्धपातळीवर सुरू आहे. यावरून आता मोठ्या प्रतिक्रिया यायला लागल्या असून शासन आणि प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अश्यातच, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी यावरून राज्य सरकारवर चांगलेच ताशेरे ओढले आहेत.

रोहित पवारांनी आपल्या अधिकृत ‘X ‘ अकाऊंटवरून राज्य सरकारवर गंभीर सवाल उपस्थित केले आहेत. डिजिटल इंडिया, बुलेट ट्रेन, इंजिनिअरिंग मार्वल असलेला मिसिंग लिंग प्रकल्प यांचा डांगोरा पिटत हायटेक तंत्रज्ञानाच्या गप्पा झोडणाऱ्या राज्य सरकारला ४ दिवसांपासून इमारत कोसळल्याने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या ८ कामगारांना अजून बाहेर काढता आलं नसल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

Pune Moshi Building Collapse : 64 तासांनंतरही बचावकार्य सुरूच ! अत्याधुनिक कटरने दुसऱ्या मजल्याचा स्लॅब पाडला; आतापर्यंत काय घडलं?

नेमकं काय म्हणाले रोहित पवार ?

रोहित पवार म्हणाले, “डिजिटल इंडिया, बुलेट ट्रेन, इंजिनिअरिंग मार्वल असलेला मिसिंग लिंग प्रकल्प यांचा डांगोरा पिटत हायटेक तंत्रज्ञानाच्या गप्पा झोडणाऱ्या राज्य सरकारला ४ दिवसांपासून इमारत कोसळल्याने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या ८ कामगारांना अजून बाहेर काढता आलं नाही.. असं असेल तर तुमच्या तंत्रज्ञानाला काय चाटायचं का? कामगार आहेत म्हणून त्यांच्या जीवाची काहीच किंमत नाही का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

डिजिटल इंडिया, बुलेट ट्रेन, इंजिनिअरिंग मार्वल असलेला मिसिंग लिंग प्रकल्प यांचा डांगोरा पिटत हायटेक तंत्रज्ञानाच्या गप्पा झोडणाऱ्या राज्य सरकारला ४ दिवसांपासून इमारत कोसळल्याने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या ८ कामगारांना अजून बाहेर काढता आलं नाही.. असं असेल तर तुमच्या तंत्रज्ञानाला काय… — Rohit Pawar (@RRPSpeaks) July 11, 2026

ते पुढे म्हणाले, ” काही दिवसांपूर्वी कुदळवाडी भागात लोकांच्या राहत्या घरांवर आणि छोट्या-मोठ्या व्यवसायांवर ५० बुलडोझर लावून कारवाई करण्यात आली, पण आज ८ कामगार मृत्यूशी झुंजताना तिथं चार दिवसांपासून अवघे दोन मशीन काम करत आहेत. सरकारला लाज कशी वाटत नाही? किड्या-मुंग्याप्रमाणे मरणाऱ्या गरीब माणसांचे जीव सरकारने आधी वाचवावेत आणि या घटनेला जबाबदार असलेल्या ठेकेदारांवर कठोरातील कठोर कारवाई करावी, त्यानंतरच कथित विकासाच्या गप्पा माराव्यात.”

बचावकार्य अजूनही सुरूच

पुण्यातील पिंपरी-चिंचवडमधील मोशी (Pune Moshi Building Collapse) येथे झालेल्या भीषण इमारत दुर्घटनेला तब्बल 64 तास उलटले असून, बचावकार्य अद्यापही युद्धपातळीवर सुरू आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफ, अग्निशमन दल, पोलीस आणि महापालिकेची यंत्रणा सलग प्रयत्न करत आहे. अत्याधुनिक कटर मशिनरीच्या मदतीने इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचा स्लॅब हटवण्यात आला असून, आता पहिल्या मजल्याचा स्लॅब पाडण्याचे काम सुरू आहे.

दुर्घटनेनंतर एकूण 23 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती समोर आली होती. त्यापैकी 15 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले. मात्र, अजूनही आठ कामगार स्लॅबखाली अडकल्याची शक्यता असल्याने शोधमोहीम अधिक सावधगिरीने सुरू ठेवण्यात आली आहे.

Ambegaon Landslide: आंबेगावातील दरडग्रस्त ५ गावांचे पुनर्वसन करणार; दिलीप वळसे पाटलांची मोठी ग्वाही

दरम्यान, इमारतीचा उर्वरित ढाचा अत्यंत धोकादायक अवस्थेत असून तो कधीही कोसळू शकतो, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे बचाव पथकाला प्रत्येक टप्प्यावर काळजीपूर्वक काम करावे लागत आहे. मोठ्या काँक्रीट स्लॅबमुळे जेसीबी किंवा जड यंत्रांचा वापर मर्यादित ठेवण्यात आला असून, अत्याधुनिक कटरच्या साहाय्याने स्लॅबचे तुकडे करून हटवले जात आहेत.

Web Title: Rohit pawar on pune moshi building collapse government reaction

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2026 | 05:58 PM

Topics:  

  • Maharashtra Government
  • moshi
  • Moshi Building
  • pune news
  • rohit pawar

संबंधित बातम्या

शिक्षणाच्या प्रांगणात विद्यार्थिनींची सुरक्षा वाऱ्यावर? Pune University मध्ये ‘त्या’ रात्री नेमके काय घडले?
1

शिक्षणाच्या प्रांगणात विद्यार्थिनींची सुरक्षा वाऱ्यावर? Pune University मध्ये ‘त्या’ रात्री नेमके काय घडले?

मिया बाय तनिष्कचे पुण्यात नवे स्टोअर; जंगली महाराज रोडवर फेस्टिव्ह सीझनची शानदार सुरुवात
2

मिया बाय तनिष्कचे पुण्यात नवे स्टोअर; जंगली महाराज रोडवर फेस्टिव्ह सीझनची शानदार सुरुवात

Someshwar Sugar Factory Election: बारामतीतील सोमेश्वर कारखान्याचा फैसला आज!; ७५ टक्के मतदानानंतर मतमोजणीला सुरुवात
3

Someshwar Sugar Factory Election: बारामतीतील सोमेश्वर कारखान्याचा फैसला आज!; ७५ टक्के मतदानानंतर मतमोजणीला सुरुवात

Pune MLC Election : पुणे पदवीधर-शिक्षक निवडणुकीसाठी भाजपचा शड्डू! रविंद्र चव्हाण मैदानात
4

Pune MLC Election : पुणे पदवीधर-शिक्षक निवडणुकीसाठी भाजपचा शड्डू! रविंद्र चव्हाण मैदानात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.