
Rohit Pawar x Post angry on VSR company False information Ajit Pawar black box was burnt
Rohit Pawar : मुंबई : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती विमान अपघातामध्ये (Ajit Pawar Plane Crash) निधन झाले. 28जानेवारी रोजी VSR कंपनीच्या विमानाचा हा अपघात झाला होता. हा अपघात होता की घातपात यावरुन संशय व्यक्त केला जात आहे. आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी अनेक पत्रकार परिषद घेत याचा तपास जलद आणि निपक्ष पद्धतीने करण्याची मागणी केली आहे. मात्र ब्लॅक बॉक्स सुरक्षित असताना देखील जळाला असल्याचे सांगितल्यामुळे आमदार रोहित पवार यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
आमदार रोहित पवार यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत अजित पवार अपघाताच्या तपासावर प्रक्रियेवर संशय व्यक्त केला आहे. तसेच VSR कंपनीच्या मालकाने डेटामध्ये छेडछाड केली असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी लिहिले आहे की, “अजितदादांच्या विमान अपघाताच्या संवेदनशील विषयावर केंद्रीय नागरी उड्डाणमंत्र्यांनी दिलेलं थातुरमातूर आणि वेळ मारून नेणारं उत्तर संपूर्ण देशाने बघितलं. पारदर्शक आणि आंतरराष्ट्रीय निकषानुसार तपास सुरु असल्याचं सांगणाऱ्या मंत्र्यांनी बारामती दुर्घटनेतील ब्लॅकबॉक्स सुरक्षित असतानाही black box जळाल्याचं का सांगितलं? आणि अमेरिकन एजन्सी अहमदाबाद अपघाताबद्दल माहिती मागत असतानाही माहिती का दिली जात नाही? याची उत्तरं द्यावीत,” असा आक्रमक पवित्रा आमदार रोहित पवारांनी घेतला आहे.
हे देखील वाचा : शाहू मिलसाठी आता थेट रस्त्यावरची लढाई! मिल सुरूच करूच; शाहू छत्रपतींचा आक्रमक पवित्रा
पुढे लिहिले की, “VSR कंपनी सोबत आर्थिक संबंध असणाऱ्या VSR च्या मालकाच्या मुलाच्या लग्नात पाहुणचार करून आलेल्या आणि मिठाला जागणाऱ्या केंद्रीय नागरी उड्डाणमंत्र्याकडून अपेक्षा तरी कशी करणार? मात्र काँग्रेससह INDIA आघाडीतील मित्रपक्ष हा विषय प्रभावीपणे मांडतीलच, असा विश्वास आहे!” अशी अपेक्षा रोहित पवारांनी व्यक्त केली.
अजितदादांच्या विमान अपघाताच्या संवेदनशील विषयावर केंद्रीय नागरी उड्डाणमंत्र्यांनी दिलेलं थातुरमातूर आणि वेळ मारून नेणारं उत्तर संपूर्ण देशाने बघितलं. पारदर्शक आणि आंतरराष्ट्रीय निकषानुसार तपास सुरु असल्याचं सांगणाऱ्या मंत्र्यांनी बारामती दुर्घटनेतील ब्लॅकबॉक्स सुरक्षित असतानाही… pic.twitter.com/B33mnsqPoR — Rohit Pawar (@RRPSpeaks) March 17, 2026
हे देखील वाचा : बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होण्यावर प्रश्नचिन्ह; भाजपमध्येच पवारविरोधी गट ‘अॅक्टिव्ह’
यापूर्वी देखील रोहित पवार यांनी व्हीएसआर कंपनीच्या मालकावर फेरफार केल्याचा आरोप केला होता. ते म्हणाले की, “फेरफार करण्यात अत्यंत सराईत असलेला VSR कंपनीचा मालक व्ही. के. सिंग सद्यस्थितीला आपल्या मर्जीतील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून FDR (balckbox चा एक भाग ज्यामध्ये विमानांची सर्व तांत्रिक माहिती रेकॉर्ड झालेली असते) मधील एडिट करत असल्याची माहिती मिळाली आहे. DGCA किंवा AAIB मधील जे कुणी याकामी मदत करत असतील किंवा करणार असतील त्यांनी forensic audit मध्ये हा फेरफार पकडला जाईल, याची नोंद असू द्यावी,” असा इशारा आमदार रोहित पवार यांनी दिला आहे.