Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अखेर रुपाली चाकणकर यांचा राजीनामा; पायउतार होताच केलं मोठं विधान, म्हणाल्या…

रुपाली चाकणकर यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री फडणवीस यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली. चाकणकरांनी तत्काळ राजीनामा द्यावा, असा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे वृत्त समोर आले होते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 21, 2026 | 07:54 AM
रुपाली चाकणकरांच्या अडचणींत होणार वाढ; SIT नंतर आता ED कडून समन्स

रुपाली चाकणकरांच्या अडचणींत होणार वाढ; SIT नंतर आता ED कडून समन्स

Follow Us
Follow Us:

मुंबई : नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाशी संबंध आल्याने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर विरोधकांकडून टीका केली जात होती. याप्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील नाराजी व्यक्त केली होती. मुख्यमंत्र्यांच्या नाराजीनंतर चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

रुपाली चाकणकर यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री फडणवीस यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली. चाकणकरांनी तत्काळ राजीनामा द्यावा, असा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे वृत्त समोर आले होते. यानंतर काही तासांतच त्यांनी राजीनामा दिला. खरात प्रकरणात रूपाली चाकणकर पूर्णपणे अडकल्या होत्या. खरातच्या मंडळीत चाकणकर प्रमुख होत्या, असा आरोप विरोधी पक्षांनी केला. त्यांचे तांत्रिकासोबतचे फोटो व्हायरल झाल्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत होती.

दरम्यान, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनीही या प्रकरणाला गंभीर संबोधले असून, दोषींवर कारवाई करण्याचे संकेत दिले होते. तर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या विषयावर बोलणे टाळले. वाढता दबाव पाहता रूपाली चाकणकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन आपली बाजू मांडली व त्यांना आपला राजीनामा सोपविला.

निष्पक्ष चौकशीसाठीच राजीनामा

खरात प्रकरणाची निष्पक्ष चौकशी झालीच पाहिजे ही माझी आधीपासूनचीच भूमिका आहे. या प्रकरणाचा निष्पक्ष तपास व्हावा, यासाठी मी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा आमच्या नेत्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपविला असल्याची घोषणा रूपाली चाकणकर यांनी केली आहे.

विरोधकांकडून राजीनाम्याच्या मागणीला जोर

अशोक खरात याला एका महिलेच्या लैंगिक शोषणप्रकरणी अटक झाल्यानंतर रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांचे काही फोटो आणि विशेषतः त्याची ‘पाद्यपूजा’ करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. महिलांच्या हक्कासाठी लढणाऱ्या आयोगाच्या अध्यक्षांचेच एका शोषण करणाऱ्या भोंदू बाबासोबत असे व्हिडिओ समोर आल्याने सर्वच स्तरांतून संताप व्यक्त केला जात होता. विरोधकांसह सर्वसामान्यांकडूनही त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली होती. त्यानंतर अखेर त्यांना राजीनामा द्यावा लागला.

हेदेखील वाचा : Rupali Chakankar News : भोंदूबाबाचे कारनामे भोवले! महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना मुख्यमंत्र्यांचे राजीनाम्याचे आदेश?

Web Title: Rupali chakankar has resigned as the chairperson of the state womens commission

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2026 | 07:54 AM

Topics:  

  • Ashok Kharat Case
  • maharashtra
  • rupali chakankar

संबंधित बातम्या

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात
1

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक
2

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
3

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Kolhapur Ganesh Visarjan: विद्युत तारेला स्पर्श अन् क्षणात 21 फुटी गणेशमूर्ती कोसळली; कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीला गालबोट
4

Kolhapur Ganesh Visarjan: विद्युत तारेला स्पर्श अन् क्षणात 21 फुटी गणेशमूर्ती कोसळली; कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीला गालबोट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.