Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“इंडि आघाडीसोबत जाऊन उबाठा जिहादी मानसिकतेचे झाले…”, संजय निरुपम यांची घणाघाती टीका

उबाठाने हिंदुत्वाच्या विचारधारेला तिलांजली दिली आहे. मंदिरात दिप प्रज्वलन नाही करणार मग स्मशानात करणार का असा सवाल निरुपम यांनी यावेळी केला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Dec 12, 2025 | 05:57 PM
संजय निरुपम यांची घणाघाती टीका

संजय निरुपम यांची घणाघाती टीका

Follow Us
Close
Follow Us:
  • उद्धव ठाकरे जिहादी मानिसिकतेचे झाले
  • बाळासाहेबांनी सामनाची स्थापना हिंदुसाठी केली
  • निरुपम यांनी उबाठाच्या हिंदूविरोधी भूमिकेवर कडाडून टीका
 

मुंबई : इंडि आघाडीसोबत गेलेले आणि जिहादी लोकांच्या मतांसाठी उद्धव ठाकरे जिहादी मानिसिकतेचे झाले आहेत, अशी घणाघाती टीका शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी आज केली. बाळासाहेबांनी सामनाची स्थापना हिंदुसाठी केली होती मात्र आज तो जिहादी लोकांसाठी झाला आहे, असा हल्लाबोल निरुपम यांनी केला.

तामिळनाडूमधील मंदिरात दिप प्रज्वलन करण्यास मद्रास हायकोर्टाचे न्यायमूर्ती जी.आर स्वामीनाथन यांनी आदेश दिले होते, मात्र याविरोधात तामिळनाडूमधील जिहादी रस्त्यावर आले होते. तेथील डीएमके सरकारने दिप प्रज्वलन करण्यास बंदी घातली. यावर पुन्हा न्यायमूर्तींनी दिप प्रज्वलन करण्याचे आदेश दिले होते, मात्र त्यावरही डीएमके सरकारने सुप्रीम कोर्टातून स्थगिती आणली. या न्यायमूर्तींविरोधात डीएमके पक्षाने महाभियोग आणण्याचा प्रस्ताव संसदेत सादर केला आहे. या प्रस्तावावर हिंदू विरोधी पक्ष डीएमके, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याबरोबरच उबाठाचे खासदार अरविंद सावंत यांनीही स्वाक्षरी केली. यावरुन निरुपम यांनी उबाठाच्या हिंदूविरोधी भूमिकेवर कडाडून टीका केली.

आळंदीच्या इंद्रायणी नदीत मृत माशांचा खच, परिसरात खळबळ; नागरिक संतापले

ते पुढे म्हणाले की, अयोध्येत राम मंदिर व्हावं, अशी हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. अयोध्येत राम मंदिर उभारणीसाठी लाखो शिवसैनिक कारसेवेसाठी गेले होते, असे बाळासाहेबांचे ज्वलंत हिंदुत्व होते. मात्र त्यांचे सुपूत्र उद्धव ठाकरे आणि त्यांच्या खासदारांनी मंदिरात दिप प्रज्वलन करण्याविरोधात भूमिका घेतली. यावरुन उबाठाने हिंदुत्वाच्या विचारधारेला तिलांजली दिली आहे. मंदिरात दिप प्रज्वलन नाही करणार मग स्मशानात करणार का असा सवाल निरुपम यांनी यावेळी केला. बाळासाहेबांचे विचार आणि हिंदुत्व सोडल्यामुळेच विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने उद्धव ठाकरेंचा पराभव केला होता. उबाठा आता हिंदू विरोधी बनले आहेत, असा घणाघात निरुपम यांनी केला.

निरुपम म्हणाले की, उबाठा मुख्यमंत्री असताना पालघरमध्ये साधुंचे हत्याकांड झाले होते. या काळात केंद्र सरकारने घुसखोरांविरोधात एनआरसी मोहीम राबवली त्यालाही उबाठाने विरोध केला होता. वक्फ बोर्ड सुधारणांनाही उबाठाने विरोध केला होता. लोकसभा निवडणुकीत उबाठा उमेदवाराच्या प्रचारात मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सहभागी झाला होता. शिवसेना आणि भाजपाला हिंदुत्व शिकवण्यापेक्षा मुस्लिम मतांसाठी डीएमके, समाजवादी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसप्रमाणे जिहादी मानसिकतेचे झाले आहेत, असे उबाठाने आता जाहीर करावे, अशी टीका निरुपम यांनी केली.

Mumbai Drug Case: मुंबई पोलिसांची मोठी कारवाई! १० महिन्यांत ₹६७९ कोटींहून अधिक किमतीचे ड्रग्ज जप्त

 

Web Title: Sanjay nirupam on ubt has bid farewell to the ideology of hindutva

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 12, 2025 | 05:57 PM

Topics:  

  • Mumbai
  • Sanjay Nirupam

संबंधित बातम्या

Mumbai Drug Case: मुंबई पोलिसांची मोठी कारवाई! १० महिन्यांत ₹६७९ कोटींहून अधिक किमतीचे ड्रग्ज जप्त
1

Mumbai Drug Case: मुंबई पोलिसांची मोठी कारवाई! १० महिन्यांत ₹६७९ कोटींहून अधिक किमतीचे ड्रग्ज जप्त

Mumbai Missing Girl: मुंबईला कोणाची नजर लागली? 268 मुली गायब, तर 82 मुले बेपत्ता, मुलींची धक्कादायक आकडेवारी समोर
2

Mumbai Missing Girl: मुंबईला कोणाची नजर लागली? 268 मुली गायब, तर 82 मुले बेपत्ता, मुलींची धक्कादायक आकडेवारी समोर

Nerul–Mumbai Ferry: नवी मुंबईकरांसाठी खुशखबर! नेरुळ-मुंबई जलप्रवास ‘या’ दिवसापासून होणार सुरू; अवघ्या ३० मिनिटांचा प्रवास
3

Nerul–Mumbai Ferry: नवी मुंबईकरांसाठी खुशखबर! नेरुळ-मुंबई जलप्रवास ‘या’ दिवसापासून होणार सुरू; अवघ्या ३० मिनिटांचा प्रवास

मुंबईकरांसाठी गुडन्यूज! OC नसलेल्या 20 हजार इमारतींना…; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून घोषणा
4

मुंबईकरांसाठी गुडन्यूज! OC नसलेल्या 20 हजार इमारतींना…; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.