सौजन्य - सोशल मिडीया
सांडपाणी आणि रासायनिक उत्सर्जन कारणीभूत
स्थानिक रहिवासी आणि नागरिकांनी अनेक दिवसांपासून नदीतील वाढत्या प्रदूषणाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार, नदीकाठच्या गावांमधून प्रक्रिया न केलेले सांडपाणी थेट इंद्रायणीत सोडले जात आहे. तसेच, काही उद्योगांमधून होणारे रासायनिक पाण्याचे निःसारण देखील नदीत मिसळत असल्याने प्रदूषणाची तीव्रता प्रचंड वाढली आहे. या वाढत्या प्रदूषणानेच माशांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. इंद्रायणीतील वाढते प्रदूषण हाच माशांच्या मृत्यूचा मुख्य कारणीभूत घटक आहे. परिस्थिती अतिशय गंभीर बनली आहे. मग यासाठी जबाबदार कोण? असे प्रश्न ग्रामस्थांनी व्यक्त केले आहेत.
भाविकांच्या आरोग्याला गंभीर धोका
दररोज हजारो भाविक याच इंद्रायणी नदीत स्नान आणि आचमन करतात. अशा वेळी नदीतील ही विषारी परिस्थिती भाविकांच्या आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण करू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. रात्री मृत माशांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या घटनेचे गांभीर्य अधिक वाढले असून, नागरिकांनी या गंभीर प्रदूषणाबद्दल तत्काळ आणि कठोर कारवाईची मागणी केली आहे.






