Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“महापुरूषांनाही वेगळी भूमिका मांडली म्हणून वेडे ठरवले तसेच मलाही…”; वर्षा बंगल्याबाबत खासदार राऊत पुन्हा बोलले

मागील दोन दिवसांपासून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगला चर्चेत आला आहे. या ठिकाणी अंधश्रद्धेतून तांत्रिक विद्या केली असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 06, 2025 | 12:20 PM
आणीबाणीत ज्यांनी वर्तमानपत्र बंद पाडलं त्यांचा मुलगा आज भाजपात; शंकररावांवरून संजय राऊतांचा पलटवार

आणीबाणीत ज्यांनी वर्तमानपत्र बंद पाडलं त्यांचा मुलगा आज भाजपात; शंकररावांवरून संजय राऊतांचा पलटवार

Follow Us
Follow Us:

मुंबई : महायुतीचे सरकार स्थापन होऊन दोन महिने झाले आहेत. तरी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर राहायला न गेल्यामुळे राजकारण तापले आहे. वर्षा बंगल्यावर कामाख्या देवीला कापलेले रेड्याची शिंग पुरली गेली असल्याचा खळबळजनक दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. यावरुन जोरदार राजकारण रंगले असून शिंदे गटाने देखील जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आता पुन्हा एकदा खासदार संजय राऊत यांनी पलटवार केला आहे.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला. कामाख्या मंदिर आणि वर्षा बंगल्यावर रेड्याची शिंगं पुरल्याचे आपले वक्तव्य समजून घेण्यासाठी माणसाला साक्षर असणे आवश्यक आहे, इमानदार असणे गरजेचे आहे, असा टोला त्यांनी शिंदेंच्या शिलेदारांना लगावला. शिंदे सेनेने कामाख्याला जाऊन अघोरी विधी केलेत की नाही, याच्यावर कोणीच उत्तर देत नसल्याचे खासदार संजय राऊत म्हणाले आहेत.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पुढे खासदार राऊत म्हणाले की, “अघोरी विद्या ही अंधश्रद्धा कायद्याच्या विरोधात असताना सुद्धा असे काम झाले असेल तर ते राज्याच्या पुरागोमी विचारधारेच्या विरोधात आहे. लोकांनी सॉक्रेटिस, महात्मा फुले यांच्यासह महापुरूषांनाही वेगळी भूमिका मांडली म्हणून वेडे ठरवले. तसे मलाही ठरवत आहे. मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन राज्य कारभार करावा ही जनतेची अपेक्षा आहे, असे ते म्हणाले. जर ही एक नागरीक म्हणून आमची चिंता असेल तर शिरसाट यांना डिप्रेशनमध्ये जाण्याची गरज नाही,” असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री फडणवीस यांना वर्षा बंगल्यावर राहायला जाण्याचा सल्ला दिला आहे. खासदार राऊत म्हणाले की, “राज्यात अंधश्रद्धा विरोधी कायदा आहे. त्याविषयी काम करणारे अनेक जण आहेत. अनेक संघटना आहेत. वर्षा बंगल्यावर अंधश्रद्धेतून रेड्याची शिंगे पुरल्याची चर्चा होत आहे, ही मोठी गंभीर बाब आहे. त्याविषयीची चर्चा झाली पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच सांगितले की ते मुलीची दहावीची परीक्षा झाली की वर्षा बंगल्यावर राहायला जाणार आहे. त्यांनी खरंच तिथे राहायला जायला हवे,” असे आवाहन खासदार संजय राऊतांनी केले.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? 

एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांना याबाबत प्रश्न करण्यात आला. यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “मला असं वाटतं की अलिकडच्या काळात काही बाबतीत मीडिया वेड्यांचा बाजार होतोय. माफ करा, पण स्पष्ट सांगतो. आज मी एका माध्यमांवर पाहतो होतो की वर्षा पाडणार? काय वेड्यांचा बाजार आहे? वर्षा ही काय कोणाच्या घरची मालमत्ता आहे का? असं आहे की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा निवासस्थान सोडल्यानंतर त्या ठिकाणी मला जायचं आहे. पण त्यापूर्वी त्या ठिकाणी काही छोटी-मोठी कामे सुरु होती. दरम्यानच्या काळातच माझी मुलगी १० वीत आहे. १७ तारखेपासून तीची परीक्षा सुरु आहे. त्यामुळे ती म्हणाली की माझी परीक्षा झाल्यानंतर आपण तिकडे शिफ्ट होऊ, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षावरून सुरू झालेल्या राजकारणावर पडदा टाकला.

Web Title: Sanjay raut alleges that superstition was practiced at the chief ministers official residence varsha bungalow

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2025 | 12:20 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • sanjay raut
  • Varsha Banglow

संबंधित बातम्या

Sanjay Raut : ‘मोदी पंतप्रधान राहणार नाहीत?’ संजय राऊतांचा मोठा दावा, मोदी-शाह आणि फडणवीसांवर जोरदार टीका
1

Sanjay Raut : ‘मोदी पंतप्रधान राहणार नाहीत?’ संजय राऊतांचा मोठा दावा, मोदी-शाह आणि फडणवीसांवर जोरदार टीका

तुषार गांधी पोलिसांच्या ताब्यात, सुटकेसाठी आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात; ज्ञानेश कुमारांविरोधात मुंबईत जोरदार आंदोलन
2

तुषार गांधी पोलिसांच्या ताब्यात, सुटकेसाठी आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात; ज्ञानेश कुमारांविरोधात मुंबईत जोरदार आंदोलन

Devendra Fadnavis: महाराष्ट्र दुष्काळमुक्त होणार? जलसंधारणाच्या कामांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा; देवेंद्र फडणवीसांचे आदेश
3

Devendra Fadnavis: महाराष्ट्र दुष्काळमुक्त होणार? जलसंधारणाच्या कामांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा; देवेंद्र फडणवीसांचे आदेश

Sanjay Raut Criticized Gyanesh Kumar: 2024 मध्ये आमचा कृत्रिम पराभव घडवून आणला! संजय राऊतांचा गौप्यस्फोट
4

Sanjay Raut Criticized Gyanesh Kumar: 2024 मध्ये आमचा कृत्रिम पराभव घडवून आणला! संजय राऊतांचा गौप्यस्फोट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.