Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sanjay Raut News: २०२९ च्या आधीच राजकीय बाजार उठलेला असेल; भाजपच्या इशाऱ्यावर संजय राऊत यांचा पलटवार

हा व्हिडीओ म्हणजे आणखी एक शरणागती आहे. रात्री व्हिडीओ टाकण्यापेक्षा दिवसा जनतेसमोर या. तुमचे सल्लागार बदला. तुमची मानसिक स्थिती चांगली नाही.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 01, 2026 | 03:02 PM
Sanjay Raut On Amit Shah Pune Visit,

Sanjay Raut On Amit Shah Pune Visit,

Follow Us
Follow Us:
  • अमित शाह  आणि   अजित डोवाल आज पुणे दौऱ्यावर
  • 2029च्या आधीच पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचा बाजार उठलेला असेल-संजय राऊत
  • २०२९ मध्ये मोदी आणि शाह सत्तेत नसतील-संजय राऊत
 

Sanjay Raut News: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह  आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आज पुणे दौऱ्यावर आहेत. पण काँग्रेसने हा दौरा उधळून लावण्याचा इशारा दिला होता. त्यावर पुणे दौऱ्यात गोंधळ घातल्यास जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा भाजपनेही दिला होता. या घडामोडींवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपच्या हा इशारा थेट धुडकावून लावला आहे. तुम्ही काय हिंसेच्या गप्पा करता तुमच्या लाठीचार्जनंतरही मुलं क्रांती करायला तयार झाली. तुम्ही आडवे येऊ नका, 2029च्या आधीच पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचा बाजार उठलेला असेल.” अशा शब्दांत संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे.

संजय राऊत म्हणाले की, “काँग्रेस आणि इतर पक्षांनी आंदोलन करण्याचे ठरवले असेल तर हा त्यांचा अधिकार आहे. भाजपमध्ये हिंसाचार करण्याची हिंमत आहे का, तुमचे पंतप्रधान रात्री 12 वाजता व्हिडिओ टाकतात. मग दिवसा व्हिडिओ टाकायला घाबरता का. तुम्ही हिंसेबद्दल बोलता पण त्या लहान मुलांनी तुम्हाला गुडघ्यावर आणलं, २०२९ मध्ये मोदी आणि शाह सत्तेत नसतील. कदाचित २०२९ पूर्वीच त्यांचा राजकीय बाजार उठलेला असेल.” अशी टीका संजय राऊत यांनी केली.

Raj Thackeray: मंदिरातही श्रद्धेची लूट? सिद्धीविनायक, राम मंदिराचा उल्लेख करत राज ठाकरेंचा सरकारवर निशाणा

मोदींच्या व्हिडीओ संदेशावरही टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओवरही राऊत यांनी निशाणा साधला. “हा व्हिडीओ म्हणजे आणखी एक शरणागती आहे. रात्री व्हिडीओ टाकण्यापेक्षा दिवसा जनतेसमोर या. तुमचे सल्लागार बदला. तुमची मानसिक स्थिती चांगली नाही. जर सरकार विद्यार्थ्यांना माफ करत असेल, तर मग शेकडो विद्यार्थ्यांची पार्श्वभूमी का तपासली जात आहे?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

“चंद्रकांत पाटील यांना वैज्ञानिक पुरस्कार द्या”

राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरही त्यांनी उपरोधिक टीका केली. “दगड गोळा करण्यापासून ते त्यावरील ठसे तपासण्यापर्यंतची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यांच्या ‘वैज्ञानिक’ संशोधनामुळे लोक डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनाही विसरतील. त्यांना वैज्ञानिक क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार द्यायला हवा,” असा टोला त्यांनी लगावला.

Abhijeet Dipke on BJP IT Cell: विद्यार्थ्यांच्या आधी भाजपच्या आयटीसेलवर गुन्हा दाखल करा…: अभिजीत दिपकेंचा इशारा

पुण्यातील होर्डिंग्जवरून भाजपवर आरोप

पुण्यात अमित शाह यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या होर्डिंग्जवरही राऊत यांनी निशाणा साधला. “भाजपने अशी होर्डिंग्ज लावणे म्हणजे लाचारीचा कळस आहे. भ्रष्टाचार, गुन्हे आणि खड्ड्यांच्या पैशावर हे सरकार चालत आहे. अमित शाह यांनी लाज वाटली पाहिजे. संसदेत उत्तर द्यायला ते येत नाहीत आणि पुण्यात स्वागत स्वीकारत आहेत,” असे ते म्हणाले.

 

Web Title: Sanjay raut attacks pm narendra modi and amit shah over pune visit protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2026 | 03:02 PM

Topics:  

  • Amit Shah
  • sanjay raut

संबंधित बातम्या

‘मोदीजींच्या कर्तृत्वाची उंची हिमालयाएवढी’; मोदींच्या वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदेंचं भरभरून कौतुक, गुजरातीमधून भाषणाची सुरुवात
1

‘मोदीजींच्या कर्तृत्वाची उंची हिमालयाएवढी’; मोदींच्या वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदेंचं भरभरून कौतुक, गुजरातीमधून भाषणाची सुरुवात

सत्ताधारी NDA मध्ये मोठा कलह; ‘या’ मुद्यावरून JDU सह चंद्राबाबू नायडू, पासवानही नाराज
2

सत्ताधारी NDA मध्ये मोठा कलह; ‘या’ मुद्यावरून JDU सह चंद्राबाबू नायडू, पासवानही नाराज

Devendra Fadnavis : ‘अमित शाहांचं पूर्ण भाषण ऐकलं असतं तर थोबाडं काळी झाली असती’; फडणवीसांचा विरोधकांना थेट टोला
3

Devendra Fadnavis : ‘अमित शाहांचं पूर्ण भाषण ऐकलं असतं तर थोबाडं काळी झाली असती’; फडणवीसांचा विरोधकांना थेट टोला

Lab Grown Diamond : भारतातच तयार होणार हिऱ्यांची संपूर्ण मूल्यसाखळी; अमित शाहांचं मोठं आवाहन, नवी मुंबईत ज्वेलरी पार्कची तयारी
4

Lab Grown Diamond : भारतातच तयार होणार हिऱ्यांची संपूर्ण मूल्यसाखळी; अमित शाहांचं मोठं आवाहन, नवी मुंबईत ज्वेलरी पार्कची तयारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.