Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sanjay Raut Counters Devendra Fadnavis: तुम्ही तर लोकशाहीच चोरलीय!’; संजय राऊतांचा फडणवीसांवर पलटवार

Sanjay Raut on Devendra Fadnavis: “सिंधुदुर्गमधील ९०० कोटी रुपयांची जमीन—वेंगुर्ला, सावंतवाडी दोडा मार्ग या भागातील शेतजमीन आणि कृषी जमीन—बेंगळुरू, हैदराबाद आणि दिल्लीतील लोकांना बेकायदेशीर रित्या शेतकरी नसलेल्या लोकांना विकण्यात आल्याचा आरोप आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Sep 28, 2026 | 12:22 PM
Sanjay Raut, Devendra Fadnavis, Rahul Gandhi, Shiv Sena UBT

Sanjay Raut, Devendra Fadnavis, Rahul Gandhi, Shiv Sena UBT

Follow Us
Follow Us:
  • राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय’ या मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा संजय राऊतांकडून समाचार
  • तुम्ही तर संपूर्ण लोकशाहीच चोरली आहे’ – संजय राऊतांचा फडणवीसांवर घणाघात
  • निवडणूक आयोगाच्या मदतीने घोटाळे केल्याचा भाजपवर गंभीर आरोप
Sanjay Raut Counters Devendra Fadnavis:  कोण बोलत आहे, कोणाचा मेंदू चोरीला गेला आहे? तुम्ही लोकशाहीची चोरी केली आहे. तुम्ही निवडणूक आयोगाचे तुम्ही वकील आहात का? तुम्ही वकिली करताय म्हणजे तुम्ही काहीतरी लपवताय, तुम्ही घोटाळे केलेत, ते निवडणूक आयोगाच्या मदतीने केले आहेत.” अशी घणाघाती टिका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींवर टिका केली होती. राहुल गांधी यांचा मेंदू चोरीला गेला आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. आता फडणवीस यांच्या टिकेला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ” फक्त राहुल गांधीच हे सर्व मांडत आहेत का, जो इंडियन एक्सप्रेस पहिल्यापासून आरएसएस सोबत राहिला. . पूर्वी जनता पक्षाचे मुख्यालय ‘एक्स्प्रेस टॉवर’मध्ये होते. गोयंका यांना ‘मेंदू नाही’ असे मुख्यमंत्री बोलतील का? आहे का तुमच्यामध्ये हिंमत, असा निशाणाही त्यांनी यावेळी साधला.

Ujjain Shahi Masjid: शाही मशिदीच्या कारवाईवरून उज्जैनमध्ये गोंधळ; जमाव-पोलिसांत संघर्ष, दगडफेकीनंतर अश्रुधुराच्या नळकांड्या

देवेंद्रजींनी आम्हाला राजकारण शिकवू नये. आम्हाला माहिती आहे. तुम्ही मुख्यमंत्री आहात म्हणून सगळे तुम्हाला मानतात; बाकी काही नाही. त्यांच्या आधीपासून आम्ही राजकारण आणि समाजकारणात काम करत आहोत. ज्या दिवशी त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची खुर्ची नसेल त्या दिवशी त्यांच्याकडे कोणीही फिरकणार नाही.

देवेंद्र फडणवीस काल म्हणाले , लोकांनी खर्च कमी करावा, असं ते म्हणत आहेत. पण आपल्याच सहकाऱ्यांनी भ्रष्टाचार कमी करावा. त्यांनी जर त्यांच्या सहकाऱ्यांना असे सांगितले असते तर मी म्हटलो असतो त्यांचा मेंदू आहे, त्यांचा मेंदू कोणी चोरलेला नाही.” असे ते का सांगत नाहीत. असा टोलाही त्यांनी लगावला.

सिंधुदुर्गमधील ९०० कोटी रुपयांची जमीन बेकायदेशीरित्या विकली

 

इंडियन एक्सप्रेसने आज पुन्हा एक वृत्त प्रसिद्ध केलं आहे. त्यात “सिंधुदुर्गमधील ९०० कोटी रुपयांची जमीन—वेंगुर्ला, सावंतवाडी दोडा मार्ग या भागातील शेतजमीन आणि कृषी जमीन—बेंगळुरू, हैदराबाद आणि दिल्लीतील लोकांना बेकायदेशीर रित्या शेतकरी नसलेल्या लोकांना विकण्यात आल्याचा आरोप आहे. महसूल खाते गेल्या तीन वर्षांपासून चौकशी करत आहे. महाराष्ट्रात तुकडेबंदी कायदा असताना म्हणजेच शेतजमीन न विकण्याचा कायदा असताना कोकणातील या तीन तालुक्यातील जमीन कशी विकली, आता कोकणाचे नेते आहेत ना मंत्रिमंडळात, ते पार्टनर आहेत.मंत्रिमंडळातील ते नेते पार्टनर बनून या जमिनींचे व्यवहार करत आहेत. ९०० कोटींचा व्यवहार आतापर्यंत झाला आहेत. मी तिथे जाणा आहे. आता देवेंद्र फडणवीस यांनी नावं जाहीर केली पाहिजेत. कोणाला जमिनी देण्यात आल्या आहेत? याचा सूत्रधार कोण आहे? देवेंद्र फडणवीस यांचा मेंदू जागेवर असेल तर या जमिनींच्या व्यवहारांची माहिती आणि यामागचा सुत्रधार कोणा आहे, याची माहिती उघड करावी, असे आव्हान संजय राऊत यांनी केली आहे.

Australia-India Relations : मोदी-अल्बानीज भेट ठरणारा खास; मुंबईतील बिझनेस मीट अन् क्रिकेट सामन्याने

एफडीएचे अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, “मी तुकाराम मुंढे यांच्याबाबत काही बोलत नाही. त्यांच्यावर माझे आक्षेप नाहीत. पण बाकी लोक काय करत आहेत, याकडे लक्ष दिले पाहिजे. तुकाराम मुंढे यांचे अभिनंदन करावे लागेल, कारण ते कौतुकास्पद काम करत आहेत. पण त्यांचे अधिकारी काय करत आहेत, यावर आम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहोत. FDA मध्ये भ्रष्टाचार वाढला आहे का? माझ्याकडे माहिती आहे. मुंढेंनी फौजफाट्यावर लक्ष दिले पाहिजे. महापालिका नालेसफाई करत नाही. अशा अनेक हॉटेल मालकांनी आमच्याकडे तक्रारी केल्या आहेत. फार्मा कंपन्यांवर कारवाई का होत नाही? कारण त्यांचे संबंध दिल्लीशी आहेत, असा आरोप आहे. मी माहितीशिवाय बोलत नाही.महाराष्ट्रात, कोकणातल्या जमिनी लुटल्या जात आहेत. मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष दिले पाहिजे.”

सीजेपीच्या भूमिकेबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, “संघर्ष हा करावा लागतो. त्यांची रणनीती काय आहे, त्यावर ते काम करत आहेत. ४ तारखेला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मोठा मोर्चा काढण्यात येणार आहे. -त्याची तयारी सुरू आहे. दोघे तुम्हाला माहिती देतील.”

 

Web Title: Sanjay raut counters devendra fadnavis brain stolen remark election commission

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2026 | 12:22 PM

Topics:  

  • BJP Devendra Fadnavis
  • Maharashtra Politics
  • Marathi News
  • sanjay raut
  • Tukaram Munde

संबंधित बातम्या

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi:  आशियाई खेळामध्ये १८ वर्षीय अनाहत सिंगने स्क्वॉशमध्ये रौप्य पदक
1

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi:  आशियाई खेळामध्ये १८ वर्षीय अनाहत सिंगने स्क्वॉशमध्ये रौप्य पदक

US News : चीनकडून अमेरिकेला पुन्हा पांडांची भेट; अटलांटा झूमध्ये दोन नवे पाहुणे दाखल
2

US News : चीनकडून अमेरिकेला पुन्हा पांडांची भेट; अटलांटा झूमध्ये दोन नवे पाहुणे दाखल

Attack News :ब्रिटनमधील अमेरिकन तळावर मोठा हल्ला करण्याचा संशय; ट्रम्प यांचा दावा
3

Attack News :ब्रिटनमधील अमेरिकन तळावर मोठा हल्ला करण्याचा संशय; ट्रम्प यांचा दावा

World News:होर्मुझमधून विक्रमी तेल वाहतूक झाल्याचा ट्रम्प यांचा दावा
4

World News:होर्मुझमधून विक्रमी तेल वाहतूक झाल्याचा ट्रम्प यांचा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.