Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sanjay Raut: उबाठाचे खासदार फुटणार की सोबत राहणार? मातोश्रीवरील हाय-व्होल्टेज बैठकीनंतर संजय राऊतांचा मोठा खुलासा!

मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीला ५ खासदारांनी ऑनलाईन हजेरी लावल्याने राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे. त्यावर खासदार संजय राऊत यांनी सर्व खासदारांच्या अनुपस्थितीचे सविस्तर कारण स्पष्ट केले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 14, 2026 | 04:11 PM
मातोश्रीवरील हाय-व्होल्टेज बैठकीनंतर संजय राऊतांचा मोठा खुलासा! (Photo Credit- X)

मातोश्रीवरील हाय-व्होल्टेज बैठकीनंतर संजय राऊतांचा मोठा खुलासा! (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • उबाठाचे खासदार फुटणार की सोबत राहणार?
  • मातोश्रीवरील हाय-व्होल्टेज बैठकीनंतर संजय राऊतांचा मोठा खुलासा!
  • जाणून घ्या काय म्हणाले…
मुंबई: पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस (TMC) पक्षात २० खासदारांच्या बंडामुळे उभी फूट पडल्याची खळबळजनक बातमी ताजी असतानाच, महाराष्ट्राच्या राजकारणातही जोरदार चर्चांना उधाण आले आहे. ठाकरे गटातील (Shiv Sena UBT) काही खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी रविवारी ‘मातोश्री’ निवासस्थानी तातडीची बैठक बोलावली होती. या महत्त्वपूर्ण बैठकीला केवळ ४ खासदार प्रत्यक्ष उपस्थित राहिले, तर ५ खासदारांनी ऑनलाईन हजेरी लावल्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या असून वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र, पक्षाचे मुख्य प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या चर्चा फेटाळून लावत सर्व खासदार पक्षासोबतच असल्याचे स्पष्ट केले आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज ‘मातोश्री’वर लोकसभेतील सर्व खासदारांची महत्त्वाची बैठक बोलावली
बैठकीत
अरविंद सावंत
अनिल देसाई
संजय दिना पाटील
राजाभाऊ वाझे
हे उपस्थित होते.शिवाय
ओमराजे निंबाळकर
भाऊसाहेब वाघचौरे
नागेश आष्टीकर
संजय देशमुख हे खासदार व्हर्चुअली…
— Sanjay Raut (@rautsanjay61) June 14, 2026

मातोश्रीवर केवळ ४ खासदार प्रत्यक्ष हजर; कोण आले, कोण राहिले?

मुंबईतील खासदार वगळता मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील खासदारांची प्रत्यक्ष अनुपस्थिती आजच्या बैठकीत प्रकर्षाने दिसून आली. प्रत्यक्ष उपस्थित राहिलेल्या नेत्यांमध्ये प्रामुख्याने मुंबई आणि नाशिकच्या खासदारांचा समावेश होता:

अरविंद सावंत (खासदार, मुंबई दक्षिण)

संजय दीना पाटील (खासदार, मुंबई उत्तर-पूर्व)

अनिल देसाई (खासदार, मुंबई दक्षिण-मध्य)

राजाभाऊ वाजे (खासदार, नाशिक)

मोठी बातमी! ठाकरेंच्या बैठकीला येताना संजय दीना पाटील यांच्या ताफ्याचा अपघात; विक्रोळी हायवेवर घडली घटना

दोन-तीन दिवसांत सर्व खासदार मातोश्रीवर येणार: संजय राऊत

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी खासदारांच्या नाराजीच्या आणि शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या सर्व अफवा फेटाळून लावल्या. ते म्हणाले: “शिवसेना उबाठा पक्षाचे सर्वच्या सर्व ९ खासदार या बैठकीला पूर्णवेळ उपस्थित होते. जे प्रत्यक्ष येऊ शकले नाहीत, ते तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ऑनलाईन जोडले गेले होते. आमची ही दर महिन्याला होणारी एक ‘रूटीन मिटिंग’ आहे, ज्यामध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आम्हाला पुढील राजकीय वाटचालीसाठी मार्गदर्शन करत असतात. पुढील महिन्यातही अशीच बैठक होईल. आजच्या बैठकीला जे खासदार काही घरगुती आणि अपरिहार्य कारणांमुळे प्रत्यक्ष येऊ शकले नाहीत, ते येत्या दोन-तीन दिवसांत स्वतः मुंबईत येऊन मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतील. त्यामुळे विरोधकांनी वावड्या उठवणे बंद करावे.”

बैठकीनंतर संजय राऊत यांनी माहिती दिली

संजय राऊत यांनी सांगितले की, ‘मातोश्री’ येथे झालेल्या बैठकीला पक्षाचे सर्व नऊ खासदार उपस्थित होते. यापैकी चार खासदार प्रत्यक्ष ‘मातोश्री’वर उपस्थित होते, तर पाच जण ऑनलाइन माध्यमातून बैठकीत सहभागी झाले. राऊत यांनी स्पष्ट केले की, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा मुलगा विधानपरिषदेची निवडणूक लढतोय, त्यामुळे ते ऑनलाईन होते. तर, संजय जाधव – फोनवरून उपस्थित होते. यवतमाळचे खासदार संजय देशमुखांच्या घरीही मुलीचं लग्न आहे, त्यामुळे ते देखील ऑनलाईन उपस्थित होते. तर, भाऊसाहेब वाकचौरे आणि खासदार ओमराजे कौटुंबिक कारणास्तव बैठकीला ऑनलाईन उपस्थित होते, अशी माहिती संजय राऊत यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली.

सोलापूर विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटात बंडाचे पडसाद; भाजपला साथ देणाऱ्या तीन आमदारांवर मोठी कारवाई

Web Title: Sanjay raut makes a major revelation after the high voltage meeting at matoshree

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2026 | 04:10 PM

Topics:  

  • BJP
  • sanjay raut
  • Shisena UBT
  • Uddhav Thackaray

संबंधित बातम्या

PM Narendra Modi Birthday Special: पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी भाजपकडून लाल चौकातील ३४ वर्षे जुना ‘तो’ ऐतिहासिक फोटो शेअर!
1

PM Narendra Modi Birthday Special: पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी भाजपकडून लाल चौकातील ३४ वर्षे जुना ‘तो’ ऐतिहासिक फोटो शेअर!

Shiv Sena Split : पक्षांतर्गत लोकशाही संपुष्टात आल्यामुळेच फूट पडली ; शिवसेनेच्या वतीने नीरज कौल यांचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद
2

Shiv Sena Split : पक्षांतर्गत लोकशाही संपुष्टात आल्यामुळेच फूट पडली ; शिवसेनेच्या वतीने नीरज कौल यांचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद

BJP National President : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गणरायाचे घेतले दर्शन
3

BJP National President : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गणरायाचे घेतले दर्शन

Begging BJP MLA Net Worth : हातात कटोरा घेत भीक मागणारे भाजपचे अब्जाधीश आमदार! संपत्ती किती कोटींची? नेट वर्थ ऐकून व्हाल थक्क
4

Begging BJP MLA Net Worth : हातात कटोरा घेत भीक मागणारे भाजपचे अब्जाधीश आमदार! संपत्ती किती कोटींची? नेट वर्थ ऐकून व्हाल थक्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.