Sanjay Raut News:
Sanjay Raut News:”भाजपवाल्यांचं असं बोलणं मूर्खासारखं आहे.आख्या देशात कोविडचे बळी जात असताना, भाजप शासित राज्यात नद्यांमध्ये प्रेत फेकली जात असताना महाराष्ट्राने कोविडवर नियंत्रण मिळवलं. पण एखादी गोष्ट भाजपच्या अंगलट आली तर ते विषय दुसऱ्या टोकाला नेतात. मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा हा विषय आहे. कोविडमध्ये काय झालं हा प्रश्न आता कोणी विचारला आहे का. असा सवाल खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला. ते माध्यमांशी बोलत होते, याचवेळी, बिहार, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेशात ज्यावेळी प्रेतं गंगेत फेकली जात होती. ती जगाने पाहिली आहेत. मि. देवेंद्र फडणवीस ते फोटो एकदा तुम्ही पाहा. तुम्ही ती स्वीकारा. हा भाजपचा मोठी प्रॉब्लेम आहेत. असा टोलाही राऊतांनी लगावला.
शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी पीएम केअर फंडातील पैसे वापरण्याची मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यांनी मराठवाड्याच्या दौऱ्यादरम्यान केंद्राकडून पुरेसा निधी देण्यासोबतच, प्रत्येक शेतकऱ्यास एकरी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी केली होती. पण यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, उद्धव ठाकरे आर्थिक मदतीसंदर्भात राज्य सरकारला शहाणपण शिकवू नयेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना केंद्राने त्यांना पीएम केअर फंडासारखा निधी तयार करण्याची परवानगी दिली होती, जो कोरोनाच्या काळात तयार झाला आणि त्यात तब्बल ६०० कोटी रुपये जमा झाले होते. मात्र, त्यातल्या नव्या निधीचा वापर ते करू शकले नाही, अशी टिकाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे.
संजय राऊत म्हणाले. लडाखमध्ये दंगल झाली, त्याचा दोष दुसऱ्याला पण तुम्ही तुमची आश्वासने पूर्ण केली नाहीत आणि अटक सोनम वांगचूक यांना केली. हे भाजपचं धोरण आहे. पण बेंबीच्या देठापासून ओरडत बसायचं. प्रश्न मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा आहे. तीन चार वर्षांपूर्वी कोविडमध्ये काय झाले. ते नाही. ते खोटं बोलत आहेत. ते मुख्यमंत्री असतील पण आम्हीपण काहीतरी आहोत. आम्हालाही माहिती आहेत. पीएम केअर फंड यात किती पैसे आहेत, हे फडणवीसांना माहिती आहेत का, नसेल तर मी सांगतो.
मुसळधार पावसामुळे पिकांना फटका; शेतीपिके पाण्याखाली, खरीप हंगामही धोक्यात
महाराष्ट्रातून किती रक्कम दिली गेली. मुंबईतील फार्मा कंपन्या यांनी किती लाख दिले माहिती आहेत का, नसेल तर मी त्यांना आकडा देतो. महाराष्ट्रातून शेकडो कोटी रुपये पीएम केअर फंडात आहेत. ते पैसे आता आमच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्राण वाचवण्यासाठी, त्यांच्या मदतीसाठी दिले जावेत , अशी मागणी करत आहोत. पण १९४७ मध्ये नेहरूंनी हे केल. ते केलं करत आहात. बाळासाहेबांनी हे केलं ते केलं. काय झालं की १९५० सालचं काढायचं, अरे तुमचं बोला ना, तुम्ही शेण खाताय ते बोला, आता तुमच्यावर जबाबदारी आहे.
तुम्ही पंजाब सरकारकडे पाहा, त्यांच कार्य पाहा त्यांनी ५० हजार हेक्टरी नुकसान भरपाई, पडलेलं घर बांधून देण्याचं आश्वासन दिलं आहे.’ त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची योजना आखली आहे. तुम्ही काय करताय, हे राज्य करण्याची पद्धत नाही फडणवीसजी, आणि भाजपवाल्यांनो. आधी राज्य करायला शिका. प्रशासन म्हणजे सुडबुद्धी नाही. तुम्हाला ट्रेनिंगची गरज आहे. तुमचं ट्रेनिंग घ्यायचं असेल तर सांगा. आम्ही योग्य माणसं पाठवू किंवा आम्ही तुम्हाला ट्रेनिंग देऊ. तुम्ही वर्तमान काळात बोला. भूतकाळ कशाला उकरून काढत आहात, अशी टिकाही त्यांनी यावेळी केली.
तुम्ही वर्तमान काळात बोला, भविष्यावर बोला, तुम्ही शेतकऱ्यांशी बोला, पण तुम्ही त्यांचीही तोंडे बंद केली. हक्क मागणे म्हणजे राजकारण आहे का,जे भ्रष्टाचारी तुमच्या बाजूला बसलेत. ईडीच्या भितीने तुमच्याकडे आलेत त्यांचे खिसे झटकले तरी पन्नास हजार कोटी तिथे कॅबिनेटमध्येच पडतील, अशा शब्दांत संजय राऊतांनी पुन्हा निशाणा साधला.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करावी
तसेच, मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांशी एक मिनीट चर्चा करावी, किंवा एक तास चर्चा करावी, पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करावी, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई मिळावी, शेतकऱ्यांची घरेदारे वाहून गेलीत ती सरकारच्या मदतीने पुन्हा उभी राहावीत, एवढीच आमची मागणी आहे. यात राजकारण कुठे आहे. देवेंद्र फडणवीस ज्यावेळी विरोधी पक्षात होते त्यावेळी त्यांनी अशा आपत्तींबाबत कोणत्या मागण्या केल्या आहेत. त्या एकदा त्यांनी कानाला लावून नक्की ऐकाव्यात.