Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘गद्दारांना गद्दारचं म्हणणार, पत्रकारांना धमक्या देणाऱ्यांवर कारवाई करा’; संजय दिना पाटील प्रकरणावरून संजय राऊतांचा संताप

पत्रकारांना धमकी दिल्याच्या वादग्रस्त प्रकरणावरून खासदार संजय दिना पाटील यांच्यावर संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. राज्यात धमक्या, खून आणि गुंडगिरीला संरक्षण मिळत असल्याचा आरोप करत त्यांनी सरकार आणि पोलिसांवरही प्रश्न उपस्थित केले.

  • By विवेक
Updated On: Jun 25, 2026 | 06:04 PM
संजय दिना पाटील प्रकरणावरून संजय राऊतांचा संताप

संजय दिना पाटील प्रकरणावरून संजय राऊतांचा संताप

Follow Us
Follow Us:
  • पत्रकारांना धमकी दिल्याप्रकरणी संजय दिना पाटील यांच्यावर संजय राऊत यांची जोरदार टीका
  • मुंबई पोलिसांनी आणि गृहमंत्रालयाने तातडीने कारवाई करावी, अशी राऊत यांची मागणी
  • राज्यात गुंडगिरी आणि धमक्यांना संरक्षण मिळत असल्याचा आरोप करत सरकारवर निशाणा
 

शिंदे गटाचे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना शिवीगाळ करत मारहाणीची धमकी दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर आणि संबंधितांवर जोरदार टीका केली.

संजय राऊत म्हणाले की, “राज्यात सध्या धमक्या, खंडणी, हत्या आणि गुंडगिरीचे प्रकार वाढले आहेत. पत्रकारांना उघडपणे धमक्या दिल्या जात असताना मुख्यमंत्री त्याकडे गांभीर्याने पाहत नाहीत. ते हसत हसत ते उडवून देतात,” असा आरोप त्यांनी केला. देशभरातील पत्रकार संघटनांनी याविरोधात आवाज उठवावा, असे आवाहनही त्यांनी केले.

पत्रकारांवरील हल्ल्यांविरोधात कारवाईची मागणी

राऊत यांनी भूतकाळातील पत्रकार निखिल वागळे प्रकरणाचा संदर्भ देत सांगितले की,” काही वर्षांपूर्वी पत्रकार निखिल वागळे आणि शिवसेना यांच्यामध्ये वाद झाला होता. त्यावेळी आम्ही त्यांना ठार मारण्याची धमकी दिली नव्हती. पण त्यावेळेला देशभरातील पत्रकार शिवसेना भवनासमोर आले होते. पत्रकारांवर हल्ला झाला म्हणून कारवाईची मागणी त्यांनी केली होती. आत ते पत्रकार कुठे आहेत? पत्रकार या देशाच्या लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, पण केंद्रातले मोदी आणि अमित शहा मनात नाहीत.”

‘सत्ता डोक्यात गेली का?’ पत्रकारांना धमकी प्रकरणावरून सुषमा अंधारेंचा संजय दिना पाटील यांच्यावर हल्लाबोल

“मुंबई पोलिसांनी तातडीने कारवाई करावी”

पत्रकारांना दिलेल्या धमकीबाबत मुंबई पोलिसांनी आणि गृहमंत्रालयाने कोणताही राजकीय पक्षपात न करता कारवाई करावी, अशी मागणी राऊत यांनी केली. कॅमेऱ्यासमोर हत्या आणि स्मशानाची भाषा करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, असे ते म्हणाले. मुंबईचे पोलीस आयुक्त सक्षम आहेत, मात्र एखादा लोकप्रतिनिधी त्यांना जुमानत नसेल तर त्याला कायद्याची जाणीव करून द्यावी, असे राऊत म्हणाले. महाराष्ट्रातील परिस्थितीची तुलना बिहारशी करत त्यांनी कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

“गद्दारांना गद्दारच म्हणणार”

स्वतः शिवीगाळ केल्याच्या आरोपांबाबत बोलताना राऊत म्हणाले की, एखाद्याला राजकीय टीका करणे आणि थेट जीवे मारण्याची धमकी देणे यात मोठा फरक आहे. गद्दारी करणाऱ्यांना गद्दार म्हणणे चुकीचे नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याबाबत ते म्हणाले कि , “मी जर शिवी दिली असेल तर दाखवा. एखाद्याला शिवी देणं आणि एखाद्याला हत्येची धमकी देणं, यामधील फरक उपमुख्यमंत्र्यांना समजत नसेल तर त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यांची अक्कल नेमकी कुठे हरवली? त्यासाठी एसआयटी स्थापन करावी,” असे ते म्हणाले.

‘अरे काही बोलू दे.. तुझ्या XXX…’, संजय दिना पाटलांकडून पत्रकारांना शिवीगाळी प्रकरणावर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

“मी गद्दारांना शिवी दिली. गद्दारांना गद्दारचं म्हंटलं पाहिजे, त्यांच्यासाठी महात्मा किंवा आचार्य हे पर्यायी शब्द होऊ शकत नाहीत,” असे ते म्हणाले. संजय दिना पाटील यांना अप्रत्यक्ष टोला लगावत ते पुढे म्हणाले, “कुणी कोणाला ठार मारले आणि कोणत्या कारणावरून मारले याच रेकॉर्ड आमच्याकडे आहे. तो शिवसेनेचा वाद नव्हता. तो दोन दारू गुत्तेदारांचा वाद होता आणि त्यामध्ये हत्त्या झाली,” असेहि ते म्हणाले.

Web Title: Sanjay raut reaction on sanjay dina patil threat to journalists

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 06:04 PM

Topics:  

  • Sanjay Dina Patil
  • sanjay raut
  • shivsena

संबंधित बातम्या

महायुतीत पुन्हा खदखद? ‘आम्ही बंडखोरीचे बादशाह’ म्हणत उमेदवारीसाठी ‘बंडखोरी’चा इशारा
1

महायुतीत पुन्हा खदखद? ‘आम्ही बंडखोरीचे बादशाह’ म्हणत उमेदवारीसाठी ‘बंडखोरी’चा इशारा

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम
2

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम

महायुतीत नवा ट्विस्ट! मुंबईत शिंदे गट मैदानात; पुण्यात भाजपच्या स्वबळाचे संकेत
3

महायुतीत नवा ट्विस्ट! मुंबईत शिंदे गट मैदानात; पुण्यात भाजपच्या स्वबळाचे संकेत

Sanjay Raut : संजय राऊत यांनी लिहले आयुक्तांना पत्र ? घडलेल्या घटने मागे राजकीय पाठबळ ….
4

Sanjay Raut : संजय राऊत यांनी लिहले आयुक्तांना पत्र ? घडलेल्या घटने मागे राजकीय पाठबळ ….

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.