Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऑपरेशन टायगरची ठाकरेंना धास्ती? खासदार फुटीबाबत संजय राऊतांचे मोठे विधान

ठाकरे गटातील काही खासदार फुटून स्वतंत्र गट स्थापन करणार असल्याच्या चर्चांवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत सर्व खासदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे.

  • By विवेक
Updated On: Jun 15, 2026 | 06:32 PM
ऑपरेशन टायगरची ठाकरेंना धास्ती? खासदार फुटीबाबत संजय राऊतांचे मोठे विधान

ऑपरेशन टायगरची ठाकरेंना धास्ती? खासदार फुटीबाबत संजय राऊतांचे मोठे विधान

Follow Us
Follow Us:

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील काही खासदार फुटणार असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून ‘ऑपरेशन टायगर’ राबवले जात असल्याचा दावा केला जात असून, याच ‘ऑपरेशन टायगर‘ च्या अंतर्गत ठाकरे गटातील काही खासदार वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चाना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटातील खासदार लोकसभा अध्यक्षांकडे स्वतंत्र गटाची मान्यता मिळवण्यासाठी पत्र देणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. या घडामोडींमुळे पक्षात हालचाली वाढल्या असून, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी १४ जून रोजी सर्व खासदारांची बैठक बोलावली होती. मात्र, या बैठकीस पाच खासदार अनुपस्थित राहिल्याने चर्चांना आणखी बळ मिळाले.

काय म्हणाले संजय राऊत?

यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, “शिवसेनेचा एकच गट असून तो खासदार अरविंद सावंत यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. खासदार फुटू शकतात, अशा चर्चा आम्ही गेल्या दोन वर्षांपासून ऐकत आहोत. काल सर्व खासदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात होते. आज सकाळीदेखील आमचे खासदारांशी बोलणे झाले आहे.”

Maharashtra Politics: राजकारणात पुन्हा मोठा भूकंप? ठाकरे गटाचे ५ खासदार मुख्यमंत्री शिंदेंच्या संपर्कात असल्याच्या चर्चांना उधाण

लोकसभा अध्यक्षांकडे पत्र सादर करण्याच्या चर्चांबाबत विचारले असता राऊत म्हणाले, “आज उद्धव ठाकरे आणि संजय देशमुख यांच्यात काही कामानिमित्त चर्चा झाली. आणखी दोन खासदारांशीही ठाकरे यांनी संवाद साधला आहे. तरीही काही खासदार अध्यक्षांना पत्र द्यायला गेले असतील असे वाटत असेल, तर त्या पत्राचा मसुदा समोर आल्यावरच त्याबाबत बोलू.”

दरम्यान, ठाकरे गटातील संभाव्य फुटीच्या चर्चांमुळे पक्षातील हालचाली वाढल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी संजय राऊत दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, ठाकरे गटातील काही खासदारांनी शिंदे गटाचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची भेट घेतल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरू आहे. या सर्व घडामोडींमुळे ठाकरे गटातील खासदार नेमकी कोणती भूमिका घेणार आणि पुढील काही दिवसांत राजकीय समीकरणांमध्ये कोणते बदल होणार, याकडे राज्याच्या राजकारणाचे लक्ष लागले आहे.

Maharashtra Politics: राजकारणात पुन्हा मोठा भूकंप? ठाकरे गटाचे ५ खासदार मुख्यमंत्री शिंदेंच्या संपर्कात असल्याच्या चर्चांना उधाण

Web Title: Sanjay raut reacts on rumours of shivsena uddhav thackeray camp mp split operation tiger

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2026 | 06:32 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Operation Tiger
  • sanjay raut
  • shivsena
  • Shivsena UBT
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Maratha Reservation : ‘मोर्चात गोळ्या घालण्याचा डाव,’ मनोज जरांगे पाटलांचा खळबळजनक दावा, फडणवीस – शिंदे यांच्यावर निशाणा
1

Maratha Reservation : ‘मोर्चात गोळ्या घालण्याचा डाव,’ मनोज जरांगे पाटलांचा खळबळजनक दावा, फडणवीस – शिंदे यांच्यावर निशाणा

‘अमित शहा मुंबईत आले की…’; मुंबई दौऱ्यावरून संजय राऊत यांची टीका
2

‘अमित शहा मुंबईत आले की…’; मुंबई दौऱ्यावरून संजय राऊत यांची टीका

Maratha Reservation: राज्य सरकारने चर्चेचे दरवाजे बंद केल्यानेच जरांगे मुंबईत; संजय राऊत यांचा सरकारवर हल्लाबोल!
3

Maratha Reservation: राज्य सरकारने चर्चेचे दरवाजे बंद केल्यानेच जरांगे मुंबईत; संजय राऊत यांचा सरकारवर हल्लाबोल!

लंडनमध्ये विराट कोहली थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; क्रिकेटपासून महाराष्ट्राच्या विकासापर्यंत रंगली खास चर्चा!
4

लंडनमध्ये विराट कोहली थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; क्रिकेटपासून महाराष्ट्राच्या विकासापर्यंत रंगली खास चर्चा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.