Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ladki Bahin Yojana : एका महिन्यात तब्बल 5 लाख लाडक्या बहिणी झाल्या योजनेतून बाद; संजय राऊतांचा घणाघात

राज्यामध्ये लाडकी बहीण योजना अवघ्या काही अवधीमध्ये लोकप्रिय झाली. मात्र त्यानंतर लाभार्थी महिलांच्या अर्जाची छाननी केली जात असून यामुळे लाभार्थ्यांची संख्या घटत आहे. यावरुन विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 07, 2025 | 12:33 PM
sanjay raut target mahayuti for decreasing number of ladki bahin yojana

sanjay raut target mahayuti for decreasing number of ladki bahin yojana

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : महायुती सरकारकडून निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली होती. ही योजना अल्पावधीमध्ये अत्यंत लोकप्रिय ठरली. तसेच निवडणुकीच्या प्रचारामध्ये देखील ती महायुतीसाठी मास्टर स्ट्रोक ठरली होती. या योजनेंतर्गत महिलांना दर महिना दीड हजार रुपये दिले जात आहेत. निवडणुकीनंतर ही रक्कम 2100 रुपये करण्यात येईल असे आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी दिले होते. मात्र निवडणुकीनंतर या योजनेमधील अपात्र महिलांच्या अर्जाची छाननी केली जात आहे. यामुळे आता विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे.

निवडणुकीनंतर महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेमधील लाभार्थी महिलांवर करडी नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. लाभार्थी महिलांच्या अर्जाची छाननी केली जात आहे. तसेच चुकीच्या पद्धतीने अर्ज भरलेल्या किंवा निकषांमध्ये न बसणाऱ्या महिलांचे अर्ज बाद केले जात असल्याची माहिती महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. यामुळे लाडक्या बहिणींवर अर्ज बाद होण्याची टांगती तलवार आहे. तसेच महिलांच्या घरी चारचाकी गाडी आहे का हे देखील अंगणवाडी सेविका घरी जाऊन तपासणी करणार आहेत. यामुळे लाभार्थी महिलांची संख्या एका महिन्यामध्ये पाच लाखांनी कमी झाली आहे. यावरुन आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेवरुन महायुती सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, “हळूहळू बऱ्याच लाडक्या बहिणी या योजनेतून गाळल्या जातील. सरकारच्या तिजोरीत पैसे नाहीत. निवडणुका संपलेल्या आहेत. बहि‍णींनी मतं दिलेली आहेत. दर महिन्याचे 1500 रुपये असे तीन महिने त्यांना पैसे पोहोचले आहेत. आता पैसे नाही. त्यामुळे त्यांना जेवढं ओझं कमी करता येईल, तेवढं ते करतील. नीती आयोगापासून अनेक वित्तीय संस्थांकडून या योजनेवर कठोर भाष्य करण्यात आले आहे”, असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.

दिल्लीमध्ये लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार संजय राऊत यांची एकत्रितपणे पत्रकार परिषद होणार आहे. याबाबत माहिती देताना खासदार राऊत म्हणाले की, महाराष्ट्रातील निवडणुकीचे घोटाळे हे या पत्रकार परिषदेमध्ये मांडणार आहे. पुराव्यासह ते हा घोटाळा मांडणार आहेत, अशी माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

लाडक्या बहीणींची संख्या झाली कमी

गेल्या महिन्याभरात लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलेच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. या योजनेतील तब्बल 5 लाखांनी लाभार्थी घटले आहेत. डिसेंबर 2024 मध्ये लाभार्थी महिलांची संख्या 2.46 कोटी इतकी होती. मात्र जानेवारी 2025 मध्ये लाभार्थी महिलांचा आकडा 2.41 कोटीवर पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे.

 

Web Title: Sanjay raut target mahayuti for decreasing number of ladki bahin yojana beneficiary

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2025 | 12:33 PM

Topics:  

  • Ladki Bahin Yojana
  • Mahayuti Governmet
  • sanjay raut

संबंधित बातम्या

Ladki Bahin Yojana Update: …तर लाडकी बहीण योजेनेचे  पैसे मिळणे बंद होणार; राज्य सरकारचा इशारा
1

Ladki Bahin Yojana Update: …तर लाडकी बहीण योजेनेचे  पैसे मिळणे बंद होणार; राज्य सरकारचा इशारा

Sanjay Raut on Bihar Election: ‘१० हजारात लोकशाही विकली जाते…’; बिहारच्या निकालावर संजय राऊतांनी तोफ डागली
2

Sanjay Raut on Bihar Election: ‘१० हजारात लोकशाही विकली जाते…’; बिहारच्या निकालावर संजय राऊतांनी तोफ डागली

Sanjay Raut On Bihar Elections : “हा तर ‘एकदम महाराष्ट्र पॅटर्न! बिहार निवडणुकीच्या निकालावर खासदार संजय राऊतांची टीका
3

Sanjay Raut On Bihar Elections : “हा तर ‘एकदम महाराष्ट्र पॅटर्न! बिहार निवडणुकीच्या निकालावर खासदार संजय राऊतांची टीका

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना मिळणाऱ्या 1500 रुपयांबाबत सरकारचा महत्त्वाचा निर्णय, ‘त्या’ महिलांसाठी बदल…
4

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना मिळणाऱ्या 1500 रुपयांबाबत सरकारचा महत्त्वाचा निर्णय, ‘त्या’ महिलांसाठी बदल…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.