राष्ट्रीय महामार्गावरील टोलसाठी वार्षिक आणि महिन्याचा पास काढण्याचा निर्णय (फोटो - टीम नवराष्ट्र)
नवी दिल्ली : देशातील वाहतूक व्यवस्था सुधरवण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे प्रयत्न करत आहे. रस्ते बांधण्यासह वाहतूक सुरळीत पार पडण्यासाठी नवीन उपाययोजना आखल्या जात आहेत. आता गाड्यांवर लावण्यात येणाऱ्या टोलबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय महामार्गांवरून प्रवास करणाऱ्या खाजगी कार मालकांसाठी आणि मध्यमवर्गीय प्रवाशांसाठी ही दिलासादायक बातमी असणार आहे. केंद्र सरकार लवकरच वार्षिक आणि कायमस्वरुपी टोल पासची सुविधा सुरू करणार आहे.
केंद्रीय रस्ते व वाहतूक विभागाच्या प्रस्तावानुसार, प्रवाशांना यापुढे गाडीचा टोल भरण्यासाठी प्रत्येकवेळी पैसे देण्याची गरज राहणार आहे. गाडी चालकांना टोलसाठी खास पास खरेदी करता येणार आहे. यामध्ये वार्षिक पास आणि कायमस्वरुपी पास असे प्रकार असणार आहे. यामुळे प्रत्येक टोल नाक्यावर थांबून वेगवेगळे पैसे देण्याची गरज नाही. यामुळे मध्यमवर्गीय चालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. ज्यांचा प्रवास जास्त आहे त्यांना या नवीन सुविधेचा फायदा होणार आहे. यामुळे टोलवर खर्च होणारे त्यांचे अधिकचे पैसे वाचणार आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
केंद्र सरकारकडून प्रस्ताव असलेल्या या टोलच्या नवीन प्रस्तावामध्ये दोन प्रकारचे टोल असणार आहे. यामध्ये वार्षिक पास खरेदी करता येणार आहे. हा वार्षिक पास तीन हजार रुपये असणार आहे. या पासमुळे त्यांना वर्षभर राष्ट्रीय महामार्गांवर अमर्यादित प्रवास करता येणार आहे. त्याच वेळी, आजीवन टोल पास देखील उपलब्ध करण्यात येणार आहे. हा आजीवन पास १५ वर्षांसाठी असणार असून तो तीस हजार रुपयांमध्ये उपलब्ध असणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीनंतर, राष्ट्रीय महामार्गांवरून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना थेट फायदा होईल आणि टोल प्लाझावरील गर्दी देखील कमी होईल.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मीडिया रिपोर्टनुसार, हा प्रस्ताव रस्ते वाहतूक मंत्रालयाकडे अंतिम टप्प्यात आहे. माहितीनुसार, मंत्रालय खाजगी कारसाठी प्रति किलोमीटर टोल दर कमी करण्याचा विचार करत आहे, जेणेकरून महामार्ग वापरकर्त्यांना अधिक दिलासा मिळू शकेल. या पाससाठी कोणतेही नवीन कार्ड खरेदी करण्याची आवश्यकता राहणार नाही कारण ही सुविधा FASTag मध्येच एकत्रित केली जाईल.
मासिक पास सध्या उपलब्ध
सध्या, स्थानिक आणि नियमित प्रवाशांना एकाच टोल प्लाझा ओलांडण्यासाठी मासिक पास दिले जातात. त्यांची किंमत 340 रुपये प्रति महिना आहे. ही रक्कम एका वर्षासाठी 4080 रुपये आहे. अशा परिस्थितीत, संपूर्ण राष्ट्रीय महामार्ग नेटवर्कवर अमर्यादित प्रवासासाठी तीन हजार चा वार्षिक पास हा अधिक फायदेशीर पर्याय ठरू शकतो. ही योजना पूर्णपणे ऐच्छिक असेल आणि सरकारच्या म्हणण्यानुसार, ती लोकांमध्ये लोकप्रिय होऊ शकते. त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा टोल संबंधात घेतलेला निर्णय हा महत्त्वाचा ठरत आहे.