Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : साताऱ्यात महायुतीतच चुरस; जिल्हा परिषद राजकारण तापले

सातारामध्ये महायुतीतीलच अंतर्गत चुरस वाढल्याने जिल्हा परिषद राजकारण तापले आहे. स्थानिक पातळीवरील सत्तासंघर्ष आणि मतभेद उघड होत असून, आगामी निर्णयांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 11, 2026 | 05:09 PM
साताऱ्यात महायुतीतच चुरस; जिल्हा परिषद राजकारण तापले

साताऱ्यात महायुतीतच चुरस; जिल्हा परिषद राजकारण तापले

Follow Us
Follow Us:

सातारा : विधानसभा निवडणुकांनंतर सातारा जिल्ह्यातील नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजपने निर्माण केलेल्या वर्चस्वामुळे महायुतीच्या घटक पक्षांमध्येच जोरदार राजकीय चुरस निर्माण झाली आहे. एकीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांनी जिल्ह्यात आपापले राजकीय बस्तान मजबूत करण्यासाठी जोर लावला असताना, दुसरीकडे स्थानिक पातळीवर महायुतीतील तणाव उघडपणे समोर येऊ लागला आहे.

राज्यात सत्तेत एकत्र असलेले पक्ष जिल्हा परिषद पातळीवर मात्र परस्परविरोधी भूमिका घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीत भाजपने संख्याबळाचे गणित बिघडवत सत्ता हस्तगत केल्याचा आरोप राष्ट्रवादी आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी केला आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी भाजपवर “दडपशाहीचे राजकारण” केल्याचा आरोप करत समन्वय बैठकींना भाजपकडून प्रतिसाद मिळाला नसल्याची तक्रार पुन्हा एकदा नोंदवली आहे.

काँग्रेस भूमिकेवर ठाम, बारामतीतून उमेदवारी अर्ज माघारी घेतला पण…; हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टच सांगितलं

दुसरीकडे, राष्ट्रवादी व शिवसेना यांचा प्री-पोल अलायन्स आधीच जाहीर झाल्याने भाजपला एकाकी पाडण्याचा प्रयत्न झाला, असा आरोप भाजप नेत्यांकडून केला जात आहे. मात्र, “भाजपने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्यामुळेच आम्हाला एकत्र यावे लागले,” असा दावा देसाई यांनी केला आहे.

सभापती निवडीतही मतभेद ठळकपणे समोर आले. भाजपच्या भूमिकेचा निषेध म्हणून काही सदस्यांनी बहिष्कार टाकल्याचा दावा करण्यात आला, तर भाजपने मात्र आपल्या आक्रमक रणनीतीमुळेच सत्ता टिकवून ठेवली असल्याचे संकेत दिले. दरम्यान, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या आक्रमक धोरणामुळे स्थानिक राजकारणात नवे समीकरण निर्माण होत असून ते पालकमंत्री देसाई यांना रुचत नसल्याची चर्चा आहे. भाजपच्या या आक्रमक तंत्रामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांना जिल्हा परिषदेत सत्ता मिळवता आली नाही, परिणामी महायुतीतील अंतर्गत संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

राष्ट्रवादीकडून “सुरुवात त्यांनी केली, शेवट आम्ही करू” असा इशारा देण्यात येत असला, तरी प्रत्यक्षात राजकीय समीकरणे जुळवण्यात अपयश आल्याबाबत वरिष्ठ पातळीवर नाराजी असल्याची चर्चा रंगली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही साताऱ्याकडे विशेष लक्ष केंद्रित केले असून संघटनात्मक फेरबदलांची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या निवडणुकांमुळे शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि जयकुमार गोरे यांच्या राजकीय प्रभावाला अधिक अधोरेखित झाले आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यासमोर अस्तित्वाची लढाई उभी ठाकली आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी ‘सृजन यात्रा’च्या माध्यमातून पक्षाला बळ देण्याचा प्रयत्न सुरू ठेवला असला तरी जिल्ह्यात ठोस नेतृत्वाच्या अभावामुळे काँग्रेसची स्थिती अजूनही कमकुवत असल्याचे दिसते.

महायुतीत ‘अलबेल’ की ‘अंतर्गत संघर्ष’?

राज्यात महायुतीतील सत्तासमीकरणे स्थिर असल्याचे चित्र निर्माण केले जात असले, तरी साताऱ्यातील वास्तव वेगळेच आहे. स्थानिक पातळीवर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात समन्वयाचा अभाव स्पष्टपणे दिसून येत आहे. विशेषतः जिल्हा परिषद निवडणुकीनंतर आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण तापले असून महायुतीत अंतर्गत स्पर्धा अधिक तीव्र झाल्याचे संकेत मिळत आहेत.

भाजपची आक्रमक रणनीती की विरोधकांची विस्कळीतता?

भाजपने स्वबळावर लढत आक्रमक राजकीय डावपेच राबवले आणि त्याचा फायदा घेत सत्ता मिळवली, असे भाजपचे म्हणणे आहे. मात्र, विरोधकांच्या मते हे “दडपशाहीचे राजकारण” असून पारंपरिक ‘यशवंत विचार’ बाजूला ठेवून नव्या पद्धतीची राजकीय संस्कृती रुजवली जात आहे. प्रत्यक्षात मात्र विरोधकांतील विस्कळीतपणा आणि अंतर्गत मतभेदही भाजपच्या यशाला कारणीभूत ठरल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

Bombay High Court : “ऑफिसमध्ये महिलांकडे एकटक बघणं गुन्हा…”, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Web Title: Satara mahayuti internal rift zilla parishad politics heats up

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2026 | 05:09 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • Mahayuti
  • Satara

संबंधित बातम्या

Pune Election Department: पुण्यातील २२ लाख मतदारांवर टांगती तलवार! जिल्हा निवडणूक शाखेचा मोठा निर्णय
1

Pune Election Department: पुण्यातील २२ लाख मतदारांवर टांगती तलवार! जिल्हा निवडणूक शाखेचा मोठा निर्णय

Marathi Language: परिवहन सभापतींच्या निमंत्रण पत्रिकेत मराठी हद्दपार; नावांमध्येही चुका, भाजप प्रोटोकॉलला बगल!
2

Marathi Language: परिवहन सभापतींच्या निमंत्रण पत्रिकेत मराठी हद्दपार; नावांमध्येही चुका, भाजप प्रोटोकॉलला बगल!

Rohit Pawar on Congress: रोहित पवार काँग्रेसच्या वाटेवर? राहुल गांधींसोबतच्या वाढत्या जवळीकतेमुळे राजकीय चर्चांना उधाण
3

Rohit Pawar on Congress: रोहित पवार काँग्रेसच्या वाटेवर? राहुल गांधींसोबतच्या वाढत्या जवळीकतेमुळे राजकीय चर्चांना उधाण

Maharashtra Breaking News Today 2026:उत्तर नेपाळच्या काही भागात पुरामुळे हाहाकार, पुरस्थितीमुळे 132 जणांचा मृत्यू
4

Maharashtra Breaking News Today 2026:उत्तर नेपाळच्या काही भागात पुरामुळे हाहाकार, पुरस्थितीमुळे 132 जणांचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.