Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News: लोकप्रतिनिधींनी स्वेच्छेने निवृत्तीवेतनाचा त्याग करावा; सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरेंचे आवाहन

Satara News: या मागणीची सुरुवात करताना सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना निवेदन देण्यात आले. निवेदन वाचल्यानंतर त्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याची माहिती मोरे यांनी दिली.

  • By anuradha sagar
Updated On: May 23, 2026 | 03:59 PM
Satara News, Sushant More, RTI Optimist, MLA Pension,

Satara News, Sushant More, RTI Optimist, MLA Pension,

Follow Us
Follow Us:
  • सर्वसामान्य नागरिकांबरोबरच लोकप्रतिनिधींनीही बचतीचा मार्ग स्वीकारणे गरजेचे
  • आजी-माजी लोकप्रतिनिधींच्या निवृत्तीवेतनावर दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च
  • लोकसेवेचा मार्ग निवडलेल्या लोकप्रतिनिधींनी राज्याच्या हितासाठी असा निर्णय घेणे ही काळाची गरज
Satara News:  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच सर्वांनी प्रत्येक स्तरावर काटकसरीचा मार्ग अवलंबावा, असे आवाहन केले होते. सर्वसामान्य नागरिकांबरोबरच लोकप्रतिनिधींनीही बचतीचा मार्ग स्वीकारणे गरजेचे असल्याचे मत सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी व्यक्त केले आहे.

ताफ्याचा वापर कमी करणे, इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करणे याबरोबरच आर्थिक बचतीसाठी आजी-माजी लोकप्रतिनिधींनी स्वेच्छेने निवृत्तीवेतनाचा त्याग करून समाजापुढे आदर्श निर्माण करावा, असे आवाहन त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. आजी-माजी लोकप्रतिनिधींच्या निवृत्तीवेतनावर दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च होत असून, तो खर्च वाचल्यास राज्याच्या विकासकामांना मोठी मदत होऊ शकते, असेही त्यांनी म्हटले आहे.

MLC Election 2026: विधान परिषदेसाठी काय आहे महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला? सर्वाधिक जागांसाठी भाजपकडून रस्सीखेच ?

लोकसेवा ही सेवेचे माध्यम, विशेषाधिकाराचे नाही

लोकप्रतिनिधींना दिलेल्या पत्रात सुशांत मोरे म्हणाले की, “मतदारसंघाच्या विकासासाठी आणि जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आपण करत असलेल्या कार्याबद्दल आम्हाला आदर आहे. मात्र, सध्याच्या आर्थिक परिस्थितीत सामान्य जनता महागाई आणि विविध आर्थिक अडचणींना सामोरे जात आहे. अशा वेळी लोकशाहीत लोकप्रतिनिधी म्हणून आपले कार्य हे सेवेचे माध्यम असले पाहिजे.” तसेच, “सध्या आमदारांना मिळणारे निवृत्तीवेतन आणि प्रत्येक कार्यकाळानंतर त्यात होणारी वाढ हा चर्चेचा आणि चिंतेचा विषय ठरत आहे. यामुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा आर्थिक भार पडत आहे.” असंही त्यांनी नमुद केलं.

वाचणारा निधी शिक्षण-आरोग्यासाठी वापरा

मोरे यांनी आपल्या पत्रात लोकप्रतिनिधींना स्वेच्छेने पेन्शन नाकारण्याचे आवाहन केले आहे. “आपल्यासारख्या लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतल्यास त्यातून वाचणारा निधी राज्यातील आरोग्य, शिक्षण आणि गरीबांच्या कल्याणासाठी राबविल्या जाणाऱ्या योजनांमध्ये वापरता येईल. हा निर्णय केवळ आर्थिक नसून समाजासमोर त्याग आणि निष्ठेचे मोठे उदाहरण ठरेल,” असे त्यांनी म्हटले आहे.

“लोकसेवेचा मार्ग निवडलेल्या लोकप्रतिनिधींनी राज्याच्या हितासाठी असा निर्णय घेणे ही काळाची गरज आहे. जनतेच्या हितासाठी आपण या विषयावर गांभीर्याने विचार करून सकारात्मक निर्णय घ्यावा,” अशी कळकळीची विनंतीही त्यांनी केली आहे.

विधानपरिषदेसाठी दीपक मानकर यांनी ठोकला शड्डू; भाजपकडे केली ‘ही’ आग्रही मागणी

मंत्री शिवेंद्रसिंहराजेंना निवेदन

या मागणीची सुरुवात करताना सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना निवेदन देण्यात आले. निवेदन वाचल्यानंतर त्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याची माहिती मोरे यांनी दिली.

शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले की, “मी मंत्रीपद स्वीकारल्यापासून गाड्यांचा ताफा कमी केला असून बॉडीगार्डचाही त्याग केला आहे. जनतेच्या सेवेसाठी मी कायम उपलब्ध आहे. स्वेच्छेने निवृत्तीवेतनाचा त्याग करण्याबाबत निश्चितच विचार करू.” आता या पत्राला इतर आजी-माजी लोकप्रतिनिधींकडून कसा प्रतिसाद मिळतो, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

 

Web Title: Satara social activist sushant more appeal mla pension waiver demand maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2026 | 03:55 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • MLA Shivendra Raje Bhosale
  • Satara News

संबंधित बातम्या

‘5 हजार कोटींचा दावा करा, कोर्टात काय करायचं ते आम्ही पाहू’; शिवराज मोरेंना नवनाथ बन यांचं थेट आव्हान
1

‘5 हजार कोटींचा दावा करा, कोर्टात काय करायचं ते आम्ही पाहू’; शिवराज मोरेंना नवनाथ बन यांचं थेट आव्हान

Satara News: सातारा-लोणंद मार्गावर जनक्षोभ!; NHAI च्या निष्काळजीपणाविरोधात ‘सगळी गावे’ उतरणार रस्त्यावर
2

Satara News: सातारा-लोणंद मार्गावर जनक्षोभ!; NHAI च्या निष्काळजीपणाविरोधात ‘सगळी गावे’ उतरणार रस्त्यावर

Maharashtra Live Breaking News in Marathi:  काँग्रेससह विरोधी पक्षातील खासदारांचे आज पुन्हा आंदोलन
3

Maharashtra Live Breaking News in Marathi: काँग्रेससह विरोधी पक्षातील खासदारांचे आज पुन्हा आंदोलन

MLC Election 2026 : पुणे ते संभाजीनगर… पाचही जागांवर राजकीय आखाडा तापला; पाहा कोण कुठून लढणार!
4

MLC Election 2026 : पुणे ते संभाजीनगर… पाचही जागांवर राजकीय आखाडा तापला; पाहा कोण कुठून लढणार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.