Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara ZP Budget 2026-27 : ४५ कोटींच्या बजेटला प्रशासकीय हिरवा कंदील; विकासकामांना मिळणार गती

सन २०२६-२७ साठी जिल्हा परिषदेचा एकूण अर्थसंकल्प ६४ कोटी ३२ लाख रुपयांचा असून, त्यामध्ये महसुली जमा ४५.४० कोटी व भांडवली जमा १८.९२ कोटी रुपयांचा समावेश आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Mar 20, 2026 | 10:59 AM
Satara News, Maharashtra ZP, District Council, Budge t2026, Yashni Nagarajan,

Satara News, Maharashtra ZP, District Council, Budge t2026, Yashni Nagarajan,

Follow Us
Follow Us:
  • सातारा जिल्हा परिषदेच्या ४५ कोटी ४० लाख रुपयांच्या अर्थसंकल्पास प्रशासकीय मान्यता
  • बांधकाम विभागासाठी ८००.०० लाख रुपयांची भरीव तरतूद
  • संकीर्ण ग्रामपंचायत’ विभागासाठी सर्वाधिक १७७४.०० लाख रुपये प्रस्तावित
Satara ZP Budget 2026-27: जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आवश्यक नोटीस कालावधी उपलब्ध न झाल्याने, सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी सातारा जिल्हा परिषदेच्या ४५ कोटी ४० लाख रुपयांच्या अर्थसंकल्पास बुधवारी (दि. १८) प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीनंतर होणाऱ्या पहिल्या सर्वसाधारण सभेत या अर्थसंकल्पाला अंतिम मंजूरी दिली जाणार आहे. सातारा जिल्हा परिषदेचे सदरचे बजेट मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्याकडे सुपूर्द केले. त्यानतंर त्यांनी ते सभागृहासमोर सादर केले.

Rupali Thombare Patil Post: ‘बजाव ताली… चाकणकर फरार!’ रुपाली ठोंबरेंच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?

यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर. एन. गावडे, प्रकल्प संचालक विश्वास सिद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले, ग्रा. पं. उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, बांधकाम अभियंता मोहसिन मोदी, अमर नलवडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी अंनिस नायकवडी, माध्यमिक शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे, समाजकल्याण अधिकारी विद्यानंद चल्लावार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद पवार, जिल्हा कृषी विकास अधिकारी गजानन ननावरे आदींची यावेळी उपस्थिती होती.

एकूण अर्थसंकल्प ६४ कोटी ३२ लाख रुपये

सन २०२६-२७ साठी जिल्हा परिषदेचा एकूण अर्थसंकल्प ६४ कोटी ३२ लाख रुपयांचा असून, त्यामध्ये महसुली जमा ४५.४० कोटी व भांडवली जमा १८.९२ कोटी रुपयांचा समावेश आहे.याच प्रमाणे महसुली व भांडवली खर्च ठेवण्यात आला असून १ लाख रुपयांची शिल्लक राखण्यात आली आहे.दरम्यान, सन २०२५-२६ च्या सुधारित अंदाजपत्रकात महसुली जमा ११३.१२ कोटी ६७ हजार रुपये व भांडवली जमा २०.९२ कोटी रुपये गृहीत धरून १ लाख रुपयांची शिल्लक ठेवण्यात आली होती.

सततच्या हल्ल्यांमुळे इराणही आक्रमक; एक-दोन नाहीतर 7 देशांवर एकाचवेळी जोरदार हल्ले

पहिल्या सर्वसाधारण सभेत अर्थसंकल्प सादर होईल

महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती (अर्थसंकल्पीय अंदाज) नियम, १९६६ नुसार निश्चित कालावधीत अर्थसंकल्प मंजूर होणे अपेक्षित असते. मात्र, शुक्रवारी (दि. २० मार्च रोजी) अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणूक होणार असल्याने आवश्यक १२ दिवसांचा नोटीस कालावधी मिळू शकला नाही. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याचे याशनी नागराजन यांनी यावेळी सांगितले. तसेच, नव्याने स्थापन होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत हा अर्थसंकल्प अवलोकनार्थ सादर केला जाणार असून त्यानंतर अंतिम मंजुरी दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पदाधिकारी मानधन

अध्यक्ष-उपाध्यक्षांसाठी २.४० लाख, सभापती-उपसभापतींसाठी ३२.७६ लाख, सदस्य प्रवास भत्त्यासाठी स्वतंत्र तरतूद. शिक्षण विभाग गुणवत्ता विकास, क्रीडा स्पर्धा, प्रज्ञाशोध परीक्षा, मॉडेल स्कूल व शाळा दुरुस्तीसाठी निधी. बांधकाम विभाग ग्रामीण रस्ते, इमारती, निवासस्थाने व विश्रामगृह दुरुस्तीसाठी तरतूद. आरोग्य विभाग औषध पुरवठा, प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वीज देयक व सार्वजनिक आरोग्य योजना कृषी व पशुसंवर्धन ताडपत्री, एचडी पाईप, यांत्रिकीकरण, शेळी गट वाटप व पशुवैद्यकीय सेवा समाजकल्याण: जोडरस्ते, समाजमंदिरे, दिव्यांग योजना व घरकुलासाठी निधी, महिला व बालकल्याण संगणक प्रशिक्षण, महिलांसाठी व्यवसायिक प्रशिक्षण, सायकल योजना व अंगणवाडी साहित्य.

 

विभाग / तपशील तरतूद (रुपये लाखात)
संकीर्ण ग्रामपंचायत १७७४.००
बांधकाम विभाग ८००.००
संकीर्ण अर्थ विभाग ३५५.००
समाजकल्याण विभाग ३२२.००
शिक्षण विभाग १८०.००
महिला बाल कल्याण १६१.००
सामान्य प्रशासन १५०.००
आरोग्य विभाग १४०.००
कृषि विभाग ११०.००
पशुसंवर्धन विभाग ११०.००
समाजकल्याण (५% दिव्यांग) ८२.००
शिक्षण (प्राथमिक देखभाल व दुरुस्ती) ८१.००
मानधन ८०.००
संकीर्ण (२०५३/२२३५/३६०४) ६७.००
सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी ५०.००
लघु पाटबंधारे विभाग ४०.००
आयुर्वेद २०.००
एकात्मिक बाल विकास प्रकल्प १४.००
वने २.००
सामूहिक विकास २.००
एकूण बजेट ४५ कोटी ४० लाख रुपये

 

 

Web Title: Satara zps 4540 crore financial plan key highlights of the 2026 27 budget

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2026 | 10:59 AM

Topics:  

  • Satara News
  • Satara Politics
  • Zilla Parishad Election 2026

संबंधित बातम्या

आरटीआय कार्यकर्ते सुशांत मोरे यांच्या तक्रारीला नगराध्यक्ष अमोल मोहितेंचे प्रत्युत्तर; साताऱ्यात अतिक्रमण हटाव मोहीम लवकरच
1

आरटीआय कार्यकर्ते सुशांत मोरे यांच्या तक्रारीला नगराध्यक्ष अमोल मोहितेंचे प्रत्युत्तर; साताऱ्यात अतिक्रमण हटाव मोहीम लवकरच

Satara Political News: नगराध्यक्ष अमोल मोहिते यांचे पद धोक्यात, स्वत:चे घर पाडून रस्ता रुंद करुन दाखवा – सुशांत मोरे
2

Satara Political News: नगराध्यक्ष अमोल मोहिते यांचे पद धोक्यात, स्वत:चे घर पाडून रस्ता रुंद करुन दाखवा – सुशांत मोरे

Satara Politics: सातारकरांच्या स्वाभिमानासाठी अभयसिंह जगतापांना साथ द्या; महाविकास आघाडीची मतदारांना साद
3

Satara Politics: सातारकरांच्या स्वाभिमानासाठी अभयसिंह जगतापांना साथ द्या; महाविकास आघाडीची मतदारांना साद

Satara ZP CEO Yashini Nagarajan: सातारा जिल्हा परिषदेच्या सीईओ याशिनी नागराजन यांच्या वाहनावरील दिव्यावरून वादाची ठिणगी
4

Satara ZP CEO Yashini Nagarajan: सातारा जिल्हा परिषदेच्या सीईओ याशिनी नागराजन यांच्या वाहनावरील दिव्यावरून वादाची ठिणगी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.