
कल्याण ग्रामीणमध्ये शिवसेना शिंदे गटाला धक्का, उपतालुका प्रमुख विकास देसले यांचा भाजपात प्रवेश
डोंबिवलीतील कार्यक्रमात निवडणूक प्रमुख नरेंद्र सूर्यवंशी, भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब, तसेच भाजप नेते दीपेश म्हात्रे ,मंदार हळबे, राहुल दामले, शशिकांत कांबळे यांच्या उपस्थितीत देसले यांनी भाजपची मफलर गळ्यात घालून प्रवेश केला. या प्रवेशानंतर ग्रामीण भागातील शेकडो कार्यकर्त्यांनीही देसले यांच्या सोबतच भाजपा प्रवेश करून पक्षाला मोठी ताकद दिली.
विकास देसले यांनी प्रवेशानंतर बोलताना सांगितले की, भाजपच्या विकासकामांवर विश्वास ठेवून आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर श्रद्धा ठेवून हा निर्णय घेतला आहे. कल्याण ग्रामीणचा विकास हा माझा प्राथमिक उद्देश आहे.
भाजप नेत्यांनी देसले यांच्या प्रवेशाचे स्वागत करत, आगामी निवडणुकांमध्ये भाजप अधिक बळकट होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. दुसरीकडे शिंदे सेनेत या गळतीमूळ अस्वस्थता पसरल्याचे समजते.
कल्याण ग्रामीणमधील राजकारण अधिक चुरशीचे झाले असून, या प्रवेशामुळे भाजपला निश्चितच नवीन ऊर्जा मिळाल्याचे दिसते. या पक्षप्रवेश कार्यक्रमात मनसेचे काही पदाधिकारी देखील भाजप प्रवेश केला आहे.
भाजप पक्ष प्रवेश कार्यक्रमानंतर शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे संतापले आहे. एकदा ठरल्यानंतर महायुतीमधील पक्षांनी एकमेकांचे पदादिकारी घ्यायेच नाही तरी पण भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याकडून पक्ष प्रवेश सुरुच.रविंद्र चव्हाण हे अतिशय चुकीचे करीत आहेत . दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे यांनी रविंद्र चव्हाण यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे.
आगामी निवडणुकांमध्ये भाजप अधिक बळकट होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. तर दुसरीकडे शिंदे सेनेत या गळतीमूळे अस्वस्थता पसरल्याचे समजते. कल्याण ग्रामीणमधील राजकारण अधिक चुरशीचे झाले असून, या प्रवेशामुळे भाजपला निश्चितच नवीन ऊर्जा मिळाल्याचे दिसते.