Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोरेगावात शंभूराज देसाईंची ‘चाल’ सुरु; महेश शिंदेंसमोर पर्याय उभा करण्याची रणनिती तापली

कोरेगाव नगरपंचायतीत अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने ऐनवेळी प्रियाताई शिंदे यांना उमेदवारी देत खेळी केली. त्यानंतर दोन सदस्यांनी भाजपला साथ दिल्याने ३-३ चा अंक गाठताना शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीला अडचणीत यावे लागले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 16, 2026 | 11:20 AM
कोरेगावात शंभूराज देसाईंची 'चाल' सुरु; महेश शिंदेंसमोर पर्याय उभा करण्याची रणनिती तापली

कोरेगावात शंभूराज देसाईंची 'चाल' सुरु; महेश शिंदेंसमोर पर्याय उभा करण्याची रणनिती तापली

Follow Us
Follow Us:

सातारा : सातारा जिल्ह्यातील कोरेगाव मतदारसंघात सध्या राजकीय हालचालींना वेग आला असून, पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी थेट मैदानात उतरून मोर्चेबांधणी सुरू केल्याची जोरदार चर्चा आहे. शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांना पर्याय उभा करण्याच्या हालचालींमुळे येथील राजकीय समीकरणे ढवळून निघण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत.

जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने साधलेल्या बहुमतासाठी केलेल्या राजकीय ‘तोडफोडी’मुळे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेबाहेर राहावे लागले. विशेष म्हणजे, शिवसेनेचेच आमदार असलेल्या महेश शिंदे यांनी भाजपच्या बाजूने सत्ता समीकरणे फिरवण्याचा प्रयत्न केल्याची भावना शिवसेना गोटात तीव्र आहे. ही बाब पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या जिव्हारी लागल्याचे मानले जात आहे.

कोरेगाव नगरपंचायतीत अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने ऐनवेळी प्रियाताई शिंदे यांना उमेदवारी देत खेळी केली. त्यानंतर दोन सदस्यांनी भाजपला साथ दिल्याने ३-३ चा अंक गाठताना शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीला अडचणीत यावे लागले. सध्या सदस्य अपात्रता आणि अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड प्रक्रियेवर न्यायालयीन स्थगिती असल्याने संपूर्ण सत्तासंघर्ष कचाट्यात अडकला आहे.

दरम्यान, या सर्व घडामोडींना ‘राजकीय प्रत्युत्तर’ देण्याच्या भूमिकेतून पालकमंत्री देसाई यांनी कोरेगाववर विशेष लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून येत आहे. अलीकडेच त्यांनी कोरेगाव शहर, तालुका आणि विधानसभा मतदारसंघाचा सखोल आढावा घेतल्याची माहिती पुढे आली आहे.

कोरेगावचे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या शिष्टमंडळाने साताऱ्यात देसाई यांची भेट घेतली. या बैठकीत नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘कराड पॅटर्न’नुसार रणनीती आखण्याचा सल्ला देण्यात आल्याचे समजते. स्थानिक निष्ठावंत शिवसैनिकांना बळ देऊन स्वतंत्र ताकद उभी करण्यावरही भर देण्यात आला.

या भेटीमुळे कोरेगावच्या राजकारणात नवा ‘टर्निंग पॉइंट’ येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेषतः, बर्गे गटाला दिलेले महत्त्व आणि देसाईंची थेट हस्तक्षेपाची भूमिका पाहता आमदार महेश शिंदे यांच्यासाठी ही घडामोड धोक्याची घंटा मानली जात आहे. एकूणच, कोरेगावात आता ‘मित्र की प्रतिस्पर्धी’ हा प्रश्न अधिक गडद झाला असून आगामी काळात शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष अधिक उफाळण्याची चिन्हे आहेत. पालकमंत्री देसाई यांच्या हालचाली आणि शिंदे यांची पुढील रणनीती यावरच कोरेगावच्या राजकारणाचा पुढचा अंक ठरणार आहे.

Web Title: Shambhuraj desais move begins in koregaon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2026 | 11:20 AM

Topics:  

  • political news
  • Satara Politics
  • Shambhuraj Desai

संबंधित बातम्या

‘मागे दिले नाही, आता तरी मंत्रिपद द्या’; एकनाथ शिंदेंच्या ‘या’ आमदाराची जाहीरपणे नाराजी
1

‘मागे दिले नाही, आता तरी मंत्रिपद द्या’; एकनाथ शिंदेंच्या ‘या’ आमदाराची जाहीरपणे नाराजी

राज्यातील तब्बल 2.07 कोटी मतदारांची नावे यादीतून वगळली; तुमचंही नाव नसेल तर ‘हे’ नक्की करा…
2

राज्यातील तब्बल 2.07 कोटी मतदारांची नावे यादीतून वगळली; तुमचंही नाव नसेल तर ‘हे’ नक्की करा…

‘जात पडताळणी समिती रद्द केली तर…’; छगन भुजबळ यांचा जरांगेंच्या मागणीला विरोध
3

‘जात पडताळणी समिती रद्द केली तर…’; छगन भुजबळ यांचा जरांगेंच्या मागणीला विरोध

चाफ्याच्या फुलाने राजकीय ‘गुलदस्ता’; उदयनराजे-रामराजेंच्या भेटीने जिल्हा बँक सभेला रंग
4

चाफ्याच्या फुलाने राजकीय ‘गुलदस्ता’; उदयनराजे-रामराजेंच्या भेटीने जिल्हा बँक सभेला रंग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.