
Sharad Pawar, Baramati Politics, Inflation,
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला असून, पक्षातील संभाव्य फूट रोखण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार स्वतः सक्रिय झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमधील तब्बल २२ आमदार हे शरद पवार यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, या आमदारांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांची गुप्त भेट घेतली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा गटबाजी आणि संभाव्य फुटीच्या चर्चांना उधाण आले आहे. महायुती सरकारमधील महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या अंतर्गत अस्वस्थता वाढत असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी नुकतीच शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर राजकीय हालचालींना अधिक वेग आला आहे. त्यातच आमदार रोहित पवार यांनी पक्षातील काही नेते आगामी निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर लढण्याच्या तयारीत असल्याचा दावा केल्याने चर्चांना आणखी उधाण आले आहे.
राष्ट्रवादीतील फूट थांबणार?
या पार्श्वभूमीवर नाराज आमदारांना एकत्र ठेवण्यासाठी आणि पक्षातील फूट थांबवण्यासाठी शरद पवार स्वतः पुढाकार घेत असल्याचे बोलले जात आहे. आगामी निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमधील या हालचालींना विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, पुढील काही दिवसांत पक्षातील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आमदार रोहित पवार आता नाराज; कारण काय तर…
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये सध्या अंतर्गत बऱ्याच घडामोडी सुरू आहेत. कधी दोन्ही राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या, तर कधी नाराजीनाट्याच्या. दिवंगत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे दोन्ही नेते नाराज असल्याच्या चर्चा सध्या राजकारणात सुरू आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीत नावे नसल्यामुळे दोन्ही नेते नाराज आहेत. त्यातच या दोन्ही नेत्यांना पक्षात डावललं जात असल्याच्याही चर्चा सुरू आहेत. या चर्चा ताज्या असतानाच आता शरद पवार यांच्याही राष्ट्रवादीतून नाराजीची चर्चा समोर आली आहे.
अजितदादांच्या अपघात प्रकरणात भोंदू खरातचे कनेक्शन समोर? रोहित पवार यांचा मोठा खुलासा