Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राष्ट्रवादीमध्ये चाललंय तरी काय? अजित पवारांच्या उमेदवाराला शरद पवारांचा पाठिंबा?

विधानसभा निवडणुक जाहीर करण्यात आल्यामुळे नेत्यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये शरद पवार व अजित पवार या दोन्ही गटाची मतांची जुळवा जुळवी आणि उमेदवारांची चाचपणी सुरु केली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Oct 18, 2024 | 10:41 AM
atul benke said about sharad pawar

atul benke said about sharad pawar

Follow Us
Follow Us:

जुन्नर : राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहेत. येत्या नोव्हेंबर महिन्यामध्ये मतदान आणि मतमोजणी होणार आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरु आहे. बंडखोरीचे राजकारण झाल्यानंतर ही पहिलीच विधानसभा असल्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या दोन्ही गटामध्ये चुरशीची लढत होणार आहे. दरम्यान, पुण्यातील राष्ट्रवादीच्या उमेदवारांने शरद पवारांबाबत सूचक वक्तव्य केले आहे. जुन्नर तालुक्यात विद्यमान आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते अतुल बेनके यांच्या वक्तव्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

निवडणुकीमध्ये अजित पवार व शरद पवार गटाचे नेते व पदाधिकाऱ्यांमध्ये अनेकदा कलगीतुरा रंगत आहे. टीका टिप्पणी आणि आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. दोन्ही गट पूर्ण ताकदीने विधानसभेला सामोरे जात आहेत. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये जोरदार लढत आहे. जुन्नरमध्ये देखील राष्ट्रवादीच्या दोन्ही गटामध्ये लढत वाढली आहे. पण अजित पवार गटाच्या जुन्नरच्या उमेदवाराच्या वक्तव्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. महाराष्ट्रात कुठं असं घडलं नाही. मात्र, जुन्नर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक संघपणाने पुढे जाणार कारण पवार साहेबांचा हात माझ्या पाठीमागे आहे, असं वक्तव्य अतुल बेनके यांनी केलं आहे.

नेमकं काय म्हणाले अतुल बेनके?

आपले मत मांडताना अतुल बेनके यांनी उद्यापासून सुरुवात करणार असल्याचे सांगितले आहे. अतुल बेनके म्हणाले की, उद्या पहाटे ओझरला पहाटे अभिषेक करून आपण प्रचाराला सुरूवात करत आहोत. आता मागे हटायचं नाही. आपण एका दिलाने आणि एका विचाराने राष्ट्रवादी काँग्रेस पुढे घेऊन जायचं आहे. राज्यात कुठेही असं घडलं नाही, मात्र जुन्नर तालुक्यात एकसंघपणाने पुढे जाण्यात यश प्राप्त केलं आहे. मला काल प्रश्न केला, तुम्ही फार खुललेले दिसत आहात दोन तीन दिवस झाले, त्यावर मी म्हटलं. त्याचं कारण देखील तसं आहे. जुन्नर तालुक्यात सब एक है. आम्ही एक विचाराने पुढे जाणार आहोत. अजित पवार यांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ म्हणून हा पक्ष पुढे जाणारच आहे. मात्र, शरद पवार यांचा हात आणि आशिर्वीद माझ्या पाठीमागे उभा आहे. तो कसा आहे, तो मी आत्ता सांगणार नाही, ते वेळ आल्यावर कळेल, असे सूचक वक्तव्य अतुल बेनके यांनी केले आहे.

Web Title: Sharad pawar back support with me said by ajit pawar junnar candidates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2024 | 10:41 AM

Topics:  

  • ajit pawar
  • Atul Benke
  • Nationalist Congress Party

संबंधित बातम्या

Someshwar Election : ‘अजितदादांचे विचार पुढे न्यायचे असतील तर कारखाना माझ्या हातात द्या’; युगेंद्र पवारांचे आवाहन
1

Someshwar Election : ‘अजितदादांचे विचार पुढे न्यायचे असतील तर कारखाना माझ्या हातात द्या’; युगेंद्र पवारांचे आवाहन

सोमेश्वर कारखाना कोणा एकाची प्रॉपर्टी नाही, अजितदादांचा फोटो का वापरता? सुनेत्रा पवारांचा पुरुषोत्तम जगतापांवर निशाणा
2

सोमेश्वर कारखाना कोणा एकाची प्रॉपर्टी नाही, अजितदादांचा फोटो का वापरता? सुनेत्रा पवारांचा पुरुषोत्तम जगतापांवर निशाणा

जगतापांच्या पॅनेलला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा दणका; निवडणुकीत अजितदादांचे नाव, फोटो वापरण्यास बंदी
3

जगतापांच्या पॅनेलला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा दणका; निवडणुकीत अजितदादांचे नाव, फोटो वापरण्यास बंदी

District Bank Election: शिवसेना-राष्ट्रवादीला खिंडीत गाठत भाजपची ‘तिरकी चाल’; जिल्हा बँकेच्या आखाड्यात चार मंत्री आमनेसामने
4

District Bank Election: शिवसेना-राष्ट्रवादीला खिंडीत गाठत भाजपची ‘तिरकी चाल’; जिल्हा बँकेच्या आखाड्यात चार मंत्री आमनेसामने

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.