(Photo - X)
राज्याच्या राजकारणात सध्या घडामोडीना वेग आला आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विविध कारणांवरून संघर्ष होताना दिसत आहे. अश्यातच आता राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चाना जोर आला आहे. कारण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाबाबत मोठे विधान केले आहे. त्यामुळे, राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. (NCP Merger)
सुनील तटकरे यांनी याबाबत केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. ‘अजित पवार हयात असते तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आज एकत्र दिसल्या असत्या,’ असं तटकरे यांनी म्हटलं आहे.
सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं की, सध्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत कोणतीही चर्चा सुरू नाही. मात्र, अजित पवार असते तर चित्र वेगळं असतं. त्यांच्या निधनामुळे विलिनीकरणाची चर्चा मागे पडली. अजितदादा असते तर दोन्ही पक्ष एकत्र आलेले पाहायला मिळाले असते, असं तटकरे म्हणाले.
Raj Thackeray: ‘…स्वतःच लोकशाहीचा गळा आवळतील’, गोकुळवरून राज ठाकरेंची खोचक टीका; भाजपला सुनावले
एवढंच नाही तर 12 फेब्रुवारी ही तारीखही निश्चित झाली असती, असा महत्त्वाचा दावा त्यांनी केला. अजित पवारांचे आपण जवळचे सहकारी असल्याने त्यांनी याबाबत आपल्याला सांगितलं होतं, असंही तटकरेंनी नमूद केलं.
राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांनी शरद पवार यांची काल (गुरुवार, 5 नोव्हेंबर) रुग्णालयात जाऊन भेट घेतली होती. या भेटीनंतर पटेल यांनी राजकीयदृष्ट्या आम्ही दूर असलो तरी मनाने दूर नाही, असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार का, असा प्रश्न उपस्थित झाला होता.
दरम्यान, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनीही तटकरेंच्या विधानावर प्रतिक्रिया दिली. अजित पवार असताना दोन्ही पक्षांच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू होती. आम्ही याबाबत आधीपासून बोलत होतो, मात्र त्यावेळी आमच्या विधानांना फारसं महत्त्व दिलं जात नव्हतं. आता तटकरे यांनीच याबाबत सांगितल्यामुळे वस्तुस्थिती स्पष्ट झाली आहे, असं शिंदे म्हणाले. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या असत्या तर जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकांचं राजकीय चित्र वेगळं दिसलं असतं, असंही त्यांनी सांगितलं.
एकंदरीत, अजित पवारांच्या निधनानंतर रखडलेला विलिनीकरणाचा मुद्दा आता पुन्हा ऐरणीवर आला आहे. मात्र, सध्या तरी दोन्ही पक्ष एकत्र येण्याबाबत कोणताही अधिकृत निर्णय किंवा चर्चा सुरू असल्याचं स्पष्ट झालेलं नाही.
Ans: अजित पवार हयात असते तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण झालं असतं आणि दोन्ही पक्ष आज एकत्र दिसले असते, असं सुनील तटकरे यांनी म्हटलं.
Ans: सुनील तटकरे यांच्या दाव्यानुसार, अजित पवार हयात असते तर 12 फेब्रुवारी ही तारीख निश्चित झाली असती.
Ans: अजित पवारांच्या काळात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू होती आणि दोन्ही पक्षांनी एकत्र यावं, अशी अपेक्षा होती, असं शशिकांत शिंदे यांनी म्हटलं.






