
Shinde group candidate Lalit Kolhe wins from jail in the Jalgaon Municipal Corporation election 2026
जळगाव महापालिका निवडणुकीमध्ये माजी महापौर ललित कोल्हे यांनी शिवसेना शिंदे गटाकडून निवडणूक लढवली. ललित कोल्हे यांनी चक्क कारागृहामधून निवडणूक लढवली. मात्र फक्त निवडणूक न लढवता ती जिंकली देखील आहे. कोल्हे कुटुंबातील तिन्ही सदस्यांनी ही निवडणूक लढवली असून तिघेही विजयी झाले आहेत. त्यामुळे जळगावमधील कोल्हे पॅटर्न हा जोरदार चर्चेत आला आहे. कारागृहामध्ये असून देखील निवडणुकीमध्ये यश मिळवल्याने सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
हे देखील वाचा : नितेश राणे भाजपच्या विजयाने हरखला! हसूच थांबेना, आदित्य ठाकरेला डिवचले, ‘जय श्रीराम’ म्हणत शेअर केला व्हिडिओ
ललित कोल्हे हे नाशिकमधील कारागृहामध्ये आहेत. बोगस कॉल प्रकरणी त्यांना शिक्षा मिळाली आहे. मात्र महापालिका निवडणुकीमध्ये ललित कोल्हे उतरण्याचा निर्णय घेत नामनिर्देशन पत्र दाखल केले, ललित कोल्हे यांनी जळगावमधील प्रभाग क्रमांक 11 मधून निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. शिंदे गटाचे उमेदवार असलेल्या ललित कोल्हे यांच्यासमोर महाविकास आघाडीचे आव्हान होते. मात्र तरीही कोल्हे कुटुंबाच्या जोरदार प्रचारानंतर ललित कोल्हे यांनी विजय मिळवला आहे.
कोल्हे कुटुंबातील तिघांचा विजय
शिंदे गटाचे ललित कोल्हे यांनी नाशिक कारागृहातून निवडणूक लढवत विजय मिळवला. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा पियुष कोल्हे यांनी देखील निवडणूक लढवली. प्रभाग क्रमांक 4 मधून पियुष कोल्हे यांचा विजय झाला आहे. त्यांचबरोबर कोल्हे कुटुंबातील तिसऱ्या सदस्य सिंधू कोल्हे यांचा देखील विजय झाला आहे.
हे देखील वाचा : मुंबईत सर्वात धक्कादायक विजय! BMC मध्ये पहिला उत्तर भारतीय उमेदवार विजयी, ठाकरे बंधूंना धक्का
कोल्हे कुटुंबामध्ये जोरदार विजय झाल्यानंतर जळगावमध्ये कोल्हे समर्थकांनी एकच विजय साजरा केला. ललित कोल्हे यांचा कारागृहामध्ये असून विजय झाल्यानंतर त्यांच्या पत्नी सरिता कोल्हे यांनी विजयाचा आनंद व्यक्त केला. यावेळी त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू आल्याचे देखील दिसून आले आहे. हा विजय कामाची पोहचपावती असल्याच्या भावना कोल्हे कुटुंबाकडून व्यक्त करत आल्या आहेत.