Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Politics: महायुतीला रवींद्र धंगेकर पडणार भारी? युतीच्या पक्षातील नेत्याची करतायेत पोलखोल, पुण्यात राजकारण रंगलं

शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. महायुतीमध्ये वाकयुद्ध सुरु आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Oct 13, 2025 | 02:41 PM
'...तर मला पक्षातून काढा'; रविंद्र धंगेकरांचं थेट उपमुख्यमंत्री शिंदेंनाच आव्हान

'...तर मला पक्षातून काढा'; रविंद्र धंगेकरांचं थेट उपमुख्यमंत्री शिंदेंनाच आव्हान

Follow Us
Close
Follow Us:

Ravindra Dhangekar On Chandrakant Patil : पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका तोंडावर आलेल्या असताना पुण्यामध्ये राजकीय वांदग निर्माण झाला. महायुतीमध्ये अंतर्गत कलह वाढला असून जोरदार वाद-विवाद सुरु आहे. निलेश घायवळ प्रकरणामुळे शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. पूर्वी कॉंग्रेसमध्ये असलेल्या रवींद्र धंगेकर यांनी विकासाच्या मुद्द्यावरुन अनेकदा भाजप नेत्यांवर निशाणा साधला. मात्र आता शिवसेना शिंदे गटामध्ये असताना देखील रवींद्र धंगेकर टीका करत असल्यामुळे धंगेकर हे महायुतीला पुण्यात भारी पडत असल्याच्या चर्चा आहेत.

माजी आमदार असलेले रवींद्र धंगेकर यांनी पुण्यातील विकास, गुन्हेगारी यासारख्या अनेक मुद्द्यांवरुन आक्रमक भूमिका घेतली आहे. निलेश घायवळ प्रकरणामध्ये जे जे दोषी लोक आहेत,जे आजबाजूला सपोर्टिंगला आहेत, ज्यांच्यामुळे वर्षानुवर्ष कोथरुड परिसरात गुन्हेगारी वाढतेय, त्यावर मी बोलत होतो, असे म्हणत पुन्हा एकदा रवींद्र धंगेकरांनी निशाणा साधला आहे.

ते या भागाचे आमदार आणि मंत्री आहेत त्यांनाच प्रश्न आम्ही विचारणार ना!

रवींद्र धंगेकर माध्यमांसमोर म्हणाले की, निलेश घायवळ प्रकरणात जे जे दोषी आहेत, हे पाठीशी घालत आहेत. त्या विषयी मी बोलत आहेत. पुणे भयमुक्त झालं पाहिजे आणि पोलिसांवर नामुष्की आली आहे. याला जबाबदार हे चंद्रकात पाटील यांच्या आजूबाजूला जे लोक आहेत ते जबाबदार आहेत. त्या भागात आमदार आणि मंत्री आहेत त्यांनाच प्रश्न आम्ही विचारणार ना! मी पुणेकर म्हणून त्यांना प्रश्न विचारतो आहे, अशा शब्दांत रवींद्र धंगेकर यांनी भाजप मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरील आरोपाचे स्पष्टीकरण दिले.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

पुढे ते म्हणाले की, निलेश घायवळ आणि मी वाऱ्याला पण एकत्र येणार नाही . चंद्रकात पाटील यांना प्रश्न विचारल्यावर समीर पाटलांना राग आला . सांगलीत समीर पाटील याच्यावर काय काय गुन्हे दाखल आहेत ते मी दाखवले. घायवळ टोळीला पोषक वातावरण समीर पाटील तयार करत असतो. भाजप माझ्यावर टिकेचा भडिमार करत आहे. गुन्हेगारी कमी व्हावी यासाठी कुणी माझ्याशी बोलत नाही. पोलीस म्हणाले की तुमच्यावर गुन्हे दाखल करायची तयारी झाली आहे. पोलीस म्हणाले की तुमच्यावर गुन्हे दाखल करायची तयारी झाली आहे, असे शिंदे गटाचे रवींद्र धंगेकर म्हणाले आहेत.

भाजपच्या सोशल मीडियावरून मला ट्रोल

पुण्यामध्ये महायुतीमध्ये वाकयुद्ध सुरु झाल्यामुळे रवींद्र धंगेकर यांना पक्षश्रेष्ठींकडून तंबी देण्यात आली. प्रकरणाची जोरदार चर्चा सुरु असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रवींद्र धंगेकरांसोबत संवाद साधला. याबाबत धंगेकर म्हणाले की, एकनाथ शिंदे म्हणाले तुम्ही वाद होईल असे बोलू नका. पण मी फक्त प्रश्न विचारले आहेत. भाजपच्या सोशल मीडियावरून मला ट्रोल केल जात आहे. तुम्ही माझ्या कुटुंबावर आला आहात, मी कधी तुमच्या कुटुंबावर आलो नाही. मग तसे करणार नाही कधी कारण ती आमची संस्कृती नाही. माझ्या लहान मुलावर हल्ला केला जातो आहे पण माझ्यावर जी कारवाई होईल, ती भोगायला तयार आहे. मी कधी बेरजेचे राजकारण केले नाही. माझ्या कुटुंबाच नुकसान झालं अन् ते भाजपच्या लोकांनी हे सगळं केलं आहे. माझं घर उध्वस्त झालेले आहे, पण मागे हटलो नाही. माझी भूमिका मी त्यांना काल सांगितली आहे. ते म्हणाले गुन्हेगारी संपली पाहिजे, यात लक्ष घालेल असे ते (एकनाथ शिंदे) म्हणाले. त्यांच्या बोलण्याने मला अभिमान आहे, अशा भावना रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केल्या.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

अजित पवारांचं कोण ऐकतं का? 

पुढे रवींद्र धंगेकर म्हणाले की, “चंद्रकात पाटील यांच्या मार्फत माझ्यावर मोक्का लावण्यासाठी समीर पाटील हा पोलिसांसोबत तयारी करतो आहे.माझ्या मुलाच्या हातात खेळण्याची बंदूक होती. पुणे गुन्हेगारी मुक्त झालं पाहिजे, ही माझी भूमिका माझ्या भूमिकेला एकनाथ शिंदे यांचा पाठिंबा आहे. अजित पवार माझे नेते आहेत पण त्यांचं कोण ऐकत का. चंद्रकांत पाटील यांना एकदा सगळं कुटुंब घेऊन जाऊन भेटणार आणि आमच्यावर अन्याय का केला? असं विचारणार. भाजप मधला स्वाभिमानी गट मला मदत करत आहेत. त्यांना वाटतं की, मी त्यांची भाषा बोलतो म्हणून ते मदत करतात, असे धक्कादायक विधान रवींद्र धंगेकर यांनी केले.

Web Title: Shinde group ravindra dhangekar target bjp chandraknat patil over nilesh ghaywal gun license

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2025 | 02:39 PM

Topics:  

  • chandrakant patil
  • political news
  • Ravindra Dhangekar

संबंधित बातम्या

Local Body Elections : परभणी जिल्ह्यात ७५ टक्के मतदान; पूर्णा येथे ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याने गोंधळ
1

Local Body Elections : परभणी जिल्ह्यात ७५ टक्के मतदान; पूर्णा येथे ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याने गोंधळ

Maharashtra Politics : निवडणूक आयोगाच्या अकलेचं दिवाळं निघालंय…; निकाल लांबणीवरुन वडेट्टीवार आक्रमक
2

Maharashtra Politics : निवडणूक आयोगाच्या अकलेचं दिवाळं निघालंय…; निकाल लांबणीवरुन वडेट्टीवार आक्रमक

‘निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातचा बाहुला, रावणापेक्षाही जास्त सत्ताधाऱ्यांना अहंकार’; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची टीका
3

‘निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातचा बाहुला, रावणापेक्षाही जास्त सत्ताधाऱ्यांना अहंकार’; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची टीका

बिहारनंतर पश्चिम बंगालसह ‘या’ राज्यांत होणार निवडणुका; अमित शहांकडे येणार मोठी जबाबदारी
4

बिहारनंतर पश्चिम बंगालसह ‘या’ राज्यांत होणार निवडणुका; अमित शहांकडे येणार मोठी जबाबदारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.