एकनाथ शिंदे यांचा समाजस्नेह पुरस्कराने सन्मान (फोटो- ट्विटर)
ब्राह्मण जागृती सेवा संघातर्फे एकनाथ शिंदे यांना समाजस्नेह पुरस्कार
रचना रानडेंचा युवा गौरव पुरस्काराने सन्मान
पुण्यातील टिळक स्मारक मंदिरात पार पडला कार्यक्रम
Pune News: पुण्यातील टिळक स्मारक मंदिरात ‘ब्राह्मण जागृती सेवा संघा’चा 11 वा वर्धापन दिन पार पडला. या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुप्रसिद्ध अभिनेते ‘पद्मश्री’ मनोज जोशी, फायनान्स इनफ्ल्यून्सर सीए रचना रानडे आणि गाडगीळ ज्वेलर्सचे सिद्धार्थ गाडगीळ उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्षपद ही माणिकप्रभू संस्थानचे पिठाधीश द्यानराज माणिकप्रभू महाराज यांनी भूषविले.
ब्राह्मण जागृती सेवा संघाच्या 11 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “ब्राह्मण समाजाने आपले शास्त्र आणि संस्कृती जपण्याचे काम केले. ब्राह्मण समाजासाठी सुरू करण्यात आलेल्या परशुराम आर्थिक विकास महामंडळाला निधी कमी पडू दिला जाणार नाही. सध्याच्या काळात जातीच्या भिंती उभ्या राहत असताना ब्राह्मण समाज जातोय सलोखा राखण्यात कायम पुढे असतो.”
पुढे बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “जिथे संकट असेल तिथे मी जातो, मग ते इर्शाळवाडीचे संकट असो, कोल्हापूर-महाड-चिपळूणचा महापूर असो, उत्तराखंड, केरळमधील मदतकार्य असो, मी तिथे जाऊन आपतगग्रस्तांना मदत करण्याचे कर्तव्य केले आहे. पहेलगाम हल्ल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक लोक जम्मू आणि काश्मीरमध्ये अडकले होते, त्यांच्या मदतीसाठी मी तिथे पोहोचलो आणि त्यांना सुरक्षितपणे महाराष्ट्रात आणले, त्याचा त्यांना आधार वाटला.
जिथे संकट असेल तिथे मी जातो, मग ते इर्शाळवाडीचे संकट असो, कोल्हापूर-महाड-चिपळूणचा महापूर असो, उत्तराखंड, केरळमधील मदतकार्य असो, मी तिथे जाऊन आपतगग्रस्तांना मदत करण्याचे कर्तव्य केले आहे. पहेलगाम हल्ल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक लोक जम्मू आणि काश्मीरमध्ये अडकले होते, त्यांच्या… https://t.co/Gt4HfCKVtL pic.twitter.com/r5eLbtzFiz — Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 12, 2025
सर्वसामान्य शाखाप्रमुख ते मुख्यमंत्री असा माझा प्रवास सोपा नव्हता, तो संघर्षमय होता. शेतकरी-वारकरी कुटुंबात माझा जन्म झाला. शेतकऱ्यांवर आलेल्या आपत्तीच्या काळात त्यांच्या पाठीशी उभे राहिलो. पूरग्रस्तांचे दुःख दूर करण्याचे काम महायुती सरकारने केले आहे. काही दिवसांपूर्वी ३२ हजार कोटी रुपयांचे पॅकेज आम्ही जाहीर केले.
शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, हे दिलेले अभिवचन आम्ही पूर्ण केले असल्याचे याप्रसंगी अधोरेखित केले. स्वातंत्र्याच्या चळवळीत ब्राह्मण समाजाचे योगदान कुणालाही विसरता येणार नाही. राज्यात जातीपातीच्या भिंती उभ्या राहता कामा नयेत. ब्राम्हण समाजासाठी सुरू केलेल्या परशुराम आर्थिक विकास मंडळाला चालना देण्यासाठी यापुढेही सर्व प्रयत्न करू असे यावेळी सांगितले.
ब्राह्मण जागृती सेवा संघाच्या 11 व्या वर्धापन दिनानिमित माणिकप्रभू संस्थानचे पिठाधीश द्यानराज माणिकप्रभू महाराज यांच्या हस्ते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समाजस्नेह पुरस्काराने गौरवण्यात आले. तसेच सीए रचना रानडे यांना युवा गौरव पुरस्कार, ‘पद्मश्री’ मनोज जोशी यांना समाजभूषण पुरस्कार आणि गाडगीळ ज्वेलर्सचे सिद्धार्थ गाडगीळ यांना उद्योगरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ब्राह्मण जागृती सेवा संघाचे अध्यक्ष अंकित काणे यांनी या वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन केले होते. तर पंडित अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.