Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा वाद; कपिल सिब्बलांचा निवडणूक आयोगावर थेट निशाणा, सर्वोच्च न्यायालयात जोरदार युक्तिवाद

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी अंतिम टप्प्यात आली आहे. कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करत विधिमंडळातील फूट आणि राजकीय पक्षातील फूट यामध्ये फरक असल्याचा युक्तिवाद केला.

  • By विवेक
Updated On: Aug 11, 2026 | 04:26 PM
Kapil Sibal shivsena argument

Kapil Sibal shivsena argument

Follow Us
Follow Us:
  • विधिमंडळ गटातील फूट म्हणजे राजकीय पक्षातील फूट नाही, असा ठाकरे गटाचा युक्तिवाद.
  • 1999 च्या शिवसेना पक्षघटनेत ‘मुख्य नेता’ पदाचा उल्लेख नसल्याचे कपिल सिब्बल यांनी सांगितले.
  • पक्षाची घटना लोकशाहीवादी आहे की नाही, हे ठरवणे निवडणूक आयोगाच्या अधिकारात नसल्याचा दावा.
 

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्हावरील वादाची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी आता निर्णायक टप्प्यात पोहोचली आहे. उद्धव ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी पुन्हा एकदा जोरदार युक्तिवाद करत निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

कपिल सिब्बल यांच्या मते, शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेली फूट ही प्रत्यक्षात विधिमंडळ पक्षातील होती. ती मूळ राजकीय पक्षातील फूट म्हणून ग्राह्य धरता येणार नाही. केवळ आमदारांच्या संख्येच्या आधारे राजकीय पक्षावर दावा करता येत नाही, असा युक्तिवाद त्यांनी केला.

विधिमंडळातील फूट आणि पक्षातील फूट वेगळी

सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकारक्षेत्रावरही प्रश्न उपस्थित केला. चिन्ह आदेशातील तरतुदींनुसार पक्षात प्रत्यक्ष फूट पडणे आणि दोन प्रतिस्पर्धी गट निर्माण होणे आवश्यक असल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

Supreme Court SIR Hearing: पश्चिम बंगाल SIR प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस

विधिमंडळ पक्षाने स्वतंत्र बैठक घेतली किंवा आमदारांच्या पातळीवर गट तयार झाला, म्हणजे संपूर्ण राजकीय पक्षात फूट पडली, असा निष्कर्ष काढता येणार नाही, असे सिब्बल यांनी स्पष्ट केले. त्यामुळे निवडणूक आयोगाने विधिमंडळातील फूट आणि राजकीय पक्षातील फूट यांची सांगड घालणे योग्य नसल्याचा दावा त्यांनी केला.

‘मुख्य नेता’ पदावरूनही सवाल

शिवसेनेच्या 1999 च्या पक्षघटनेचा दाखला देत कपिल सिब्बल यांनी ‘मुख्य नेता’ या पदावरही प्रश्न उपस्थित केला. या पदाचा पक्षघटनेत उल्लेख नसताना एकनाथ शिंदे यांनी स्वतःला हे पद कोणत्या आधारावर बहाल केले, असा सवाल त्यांनी केला.

तसेच 2018 च्या पक्षघटनेवर शिंदे गटाने उपस्थित केलेल्या आक्षेपावरही सिब्बल यांनी निशाणा साधला. त्याच पक्षघटनेच्या आधारे अनेकांना पक्षातील पदे आणि राजकीय लाभ मिळाले होते. त्यामुळे गरजेनुसार त्याच घटनेला वैध किंवा अवैध ठरवणे ही सोयीची भूमिका असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला.

झारखंड विद्यार्थी आंदोलनावर राहुल गांधी आक्रमक; ‘अमित शाह यांनी राजीनामा द्यावा’

सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकारांच्या मर्यादेवरही भर दिला. एखाद्या पक्षाची घटना लोकशाहीवादी आहे की नाही, याचा निर्णय घेण्याचा व्यापक अधिकार आयोगाला नाही. पक्षाच्या अंतर्गत रचनेबाबत आयोगाने हस्तक्षेप करताना आपल्या अधिकारक्षेत्राचा विचार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाचे, यावर सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय काय असणार, याकडे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या निकालाचा आगामी राज्याच्या राजकारणावरही मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

Web Title: Shiv sena symbol case kapil sibal election commission supreme court hearing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2026 | 04:26 PM

Topics:  

  • Election Commission
  • kapil sibal
  • shivsena
  • Shivsena UBT
  • Supreme Court of India

संबंधित बातम्या

Dyanesh Kumar Impeachment: १३ कोटी मतदारांची नावे वगळल्याचा आरोप! ज्ञानेश कुमार राजीनाम्याच्या दबावात
1

Dyanesh Kumar Impeachment: १३ कोटी मतदारांची नावे वगळल्याचा आरोप! ज्ञानेश कुमार राजीनाम्याच्या दबावात

Election Commission Clarification: निवडणूक आयोग आणि ज्ञानेश कुमारांसमोरील पेच कसा सुटणार? आता उरले’हे’ पर्याय
2

Election Commission Clarification: निवडणूक आयोग आणि ज्ञानेश कुमारांसमोरील पेच कसा सुटणार? आता उरले’हे’ पर्याय

Supreme Court News: सत्र न्यायालयांच्या अधिकारांना सर्वोच्च न्यायालयाची कात्री! जन्मठेपेच्या शिक्षेबाबत दिला ऐतिहासिक निकाल
3

Supreme Court News: सत्र न्यायालयांच्या अधिकारांना सर्वोच्च न्यायालयाची कात्री! जन्मठेपेच्या शिक्षेबाबत दिला ऐतिहासिक निकाल

Congress Protest against ECI: ज्ञानेश कुमारांविरोधात महाभियोगाची तयारी! काँग्रेसचा देशव्यापी मोर्चा, विरोधी पक्ष आक्रमक
4

Congress Protest against ECI: ज्ञानेश कुमारांविरोधात महाभियोगाची तयारी! काँग्रेसचा देशव्यापी मोर्चा, विरोधी पक्ष आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.