Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कलंकित नेत्यांच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर कोण? उपनेत्या सुषमा अंधारे यांनी स्पष्टच सांगितलं

शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी महायुतीमधील कलंकित मंत्र्यांच्या नावाची यादी जाहीर केली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jul 28, 2025 | 05:16 PM
shivsena leader sushma andhare target mahayuti over political leader case

shivsena leader sushma andhare target mahayuti over political leader case

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : सत्ताधारी महायुतीमधील अनेक नेते हे सध्या चर्चेमध्ये आले आहेत. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे विधीमंडळाच्या सभागृहामध्ये जंगली रमी खेळताना दिसून आले. तर शिंदे गटाचे नेते व आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीन चालकाला मारहाण केली आहे. यावरुन राज्याचे राजकारण तापले आहे. या संदर्भात शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेतली आहे. यानंतर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.

सुषमा अंधारे यांनी माध्यमांशी संवाद साधून महायुतीवर जोरदार निशाणा साधला आहे. सुषमा अंधारे यांनी अनेक राजकीय विषयांवरुन महायुतीला घेरण्याचा प्रयत्न केला. त्या म्हणाल्या की, “राज्याच्या गृहराज्यमंत्र्यांच्या नावे जर डान्सबार असेल आणि तो डान्सबार आईच्या नावे चालवला जात असेल, ज्यावर आतापर्यंत तीनदा रेड पडलेली आहे, असा माणूस गृहमंत्रीपदावर कसा राहू शकेल. एकीकडे आर आर पाटील यांनी गृहमंत्री असताना डान्सबार बंद केले होते आणि आता हे नवे गृहराज्यमंत्री ज्यांच्या आईच्या नाव डान्सबार आहेत. तर अशा व्यक्तीला मंत्रि‍पदावर राहण्याचा अधिकार नाही, अशा शब्दांत सुषमा अंधारे यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर निशाणा साधला.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

पुढे सुषमा अंधारे यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा खरपूस समाचार घेतला. त्या म्हणाल्या की, “माणिकराव कोकाटेंसारख्या मंत्र्यांनी ज्या प्रकराची असंवेदनशील वक्तव्य केली, हे अत्यंत वाईट आहे. त्याबद्दलही चर्चा झाली आहे. अत्यंत बेशिस्त, बेताल आणि उर्मटपणे बोलणं असणारे संजय शिरसाट या मंत्र्यांचा पायउतार होणं गरजेचे आहे. याही मुद्द्यावर चर्चा झाली. योगेश कदम, संजय शिरसाट यांसह इतर लोकांशी संबंधित अनेक कागदपत्र आणि पुरावे त्यासोबतच पेन ड्राईव्हची फार मोठी फाईल अनिल परब यांनी राज्यपालांना दिली”, अशी माहिती शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दिली आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

कलंकित मंत्र्यांच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर कोण?

महाराष्ट्रातील कलंकीत मंत्र्यांचा राजीनामा घेण्याची मागणी ठाकरे गटाने केली आहे. याबाबत सुषमा अंधारे म्हणाल्या की, “या यादीत पहिल्या क्रमांकावर योगेश कदम, दुसऱ्या क्रमांकावर गिरीश महाजन, तिसऱ्या क्रमांकावर संजय शिरसाट, चौथ्या क्रमांकावर माणिकराव कोकाटे, पाचव्या क्रमांकावर संदीपान भूमरे आणि सहाव्या क्रमांकावर नितेश राणे यांचे नाव आहे. आम्ही या अनुक्रमाने यांच्या राजीनाम्याची थेट मागणी केली आहे,’ असे सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.

Web Title: Shivsena leader sushma andhare target mahayuti over political leader case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2025 | 05:16 PM

Topics:  

  • Manikrao Kokate
  • political news
  • Sanjay Shirsat
  • sushma andhare

संबंधित बातम्या

महापौर व स्थायी समिती अध्यक्षपद न मिळाल्यानेच अमोल बालवडकरांनी सोडला पक्ष; BJP चा दावा
1

महापौर व स्थायी समिती अध्यक्षपद न मिळाल्यानेच अमोल बालवडकरांनी सोडला पक्ष; BJP चा दावा

कोथरुड-बाणेरमध्ये राजकीय रणकंदन! “अमोल बालवडकर, बाबुराव चांदेरेंचा नॅरेटिव्ह खोटा”; लहू बालवडकर-गणेश कळमकर यांचा पलटवार
2

कोथरुड-बाणेरमध्ये राजकीय रणकंदन! “अमोल बालवडकर, बाबुराव चांदेरेंचा नॅरेटिव्ह खोटा”; लहू बालवडकर-गणेश कळमकर यांचा पलटवार

पुण्यात भाजपला बसणार धक्का; माजी शहर उपाध्यक्ष अमराळे आज करणार राष्ट्रवादीत प्रवेश
3

पुण्यात भाजपला बसणार धक्का; माजी शहर उपाध्यक्ष अमराळे आज करणार राष्ट्रवादीत प्रवेश

Congress Politics : काँग्रेसही तरुण राष्ट्रीय कार्याध्यक्षाच्या शोधात? ‘या’ नावांची जोरदार चर्चा सुरु
4

Congress Politics : काँग्रेसही तरुण राष्ट्रीय कार्याध्यक्षाच्या शोधात? ‘या’ नावांची जोरदार चर्चा सुरु

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.