विविध कामांमुळे सतत ब्लॉक आहेत. उड्डाणपूल आणि रस्ते कामांचा थेट परिणाम नागरिकांवर होत आहे. कामे करताना नागरिकांना केंद्रस्थानी ठेवले गेले नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. २४ बाय ७ पाणीपुरवठ्याची घोषणा अपयशी ठरल्याचा दावा करीत त्यांनी कचरा व्यवस्थापनावरही टीका केली. दोन कचरा संकलन एजन्सी असूनही, अनेक भागांत दोन-दोन, तीन-तीन दिवस गाड्या येत नाही, असा आरोप त्यांनी केला, शहराच्या ज्येष्ठ नेत्यांनी फटकार लावल्यानंतरही एसंजीजवर कारवाई झालेली नसल्याचे त्यांनी अधोरेखीत केले, अतिक्रमण सुरुवातीला रोखले जात नाही आणि ते वाढल्यानंतर सामाजिक प्रश्न बनतो, ही मोठी समस्या बनली आहे. सीताबर्डीतील हॉकर्सच्या प्रश्नावरही त्यांनी प्रशासनावर थेट हल्ला चढवला. प्रशासक राजवटीवर टीका करताना त्या चार वर्षांत अधिकाऱ्यांच्या “अंगातच आली होती असा टोला त्यांनी लगावला. आगामी काळात नागपूरकरांना न्याय मिळवून देण्यासाठी सभागृहात आणि बाहेरही लढा देऊ, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
तीन दिवस एकही उपायुक्त नाही : सत्ताधाऱ्यांच्या स्वागतासाठी उपायुक्तांमध्ये चढाओढ लागली होती. मात्र, विरोधी पक्षनेते झाल्यानंतर तीन दिवस एकही उपायुक्त भेटीस आला नाही, याची खंत संजय महाकाळकर यांनी व्यक्त केली. प्रशासनाची ही भूमिका लोकशाही व्यवस्थेला शोभणारी नसल्याचे त्यांनी नमूद केले, गुंड अजीमवर एमपीडीए नागपूर, पोलिस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांनी सीताबडीं ठाण्यांतर्गत गंभीर गुन्ह्यात सक्रिय गुंड अजीम कादिर बेग (२७, रा. वसंतराव नाईक झोपडपट्टी) याच्यावर एमपीडीए लावून स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले.
त्याला अटक करून मध्यवर्ती कारागृहात टाकले. लवकरच छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृह, हर्सल येथे दाखल केले जाईल. अजीमविरुद्ध सीताबर्डी, सोनेगाव, कळमना, बजाजनगर, पारडी, सदर आणि गणेशपेठ पोलिसांत अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. २०१७ मध्ये त्याच्यावर प्रतिबंधक कारवाईही केल्यावरही झोन २ च्या पोलिस उपायुक्तांनी त्याला एक वर्षासाठी तडीपार केले होते. २०२४ मध्येही त्याच्याकडून २ वर्षासाठी चांगल्या वागणुकीचे बंधपत्र लिहून घेतले होते. मात्र, तो सतत गुन्हेगारीत सक्रिय होता.
हातठेला चोरला नागपूर, चना-पोहा विक्री करणाऱ्याचा हातठेलाच चोरांनी लंपास केल्याची घटना सक्करदरा पोलिस ठाण्यांतर्गत उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी राहुल अमृत खरे (३०, रा. नेहरूनगर) याच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला असून पुढील तपास सुरु आहे.
आरडाओरड नव्हे, नियमाने लढा
संजय महाकाळकर शांत आहे, विरोधी पक्षनेते आक्रमक असावा लागतो, अशी चर्चा महानगरपालिकेच्या वर्तुळात आहे. याबाबत प्रश्न विचारला असता, महाकाळकर म्हणाले, केवळ आरडाओरड करूनच कामे होत नाही. शांतपणे, नियमांच्या चौकटीत राहूनही प्रश्न सोडवता येतात. मात्र, गरज भासल्यास ‘आक्रमकता ही दाखवून देऊ, असे म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांना एकप्रकारे इशाराच दिला.
…तर गडकरी-फडणवीसांकडेही धाव
शहराचा विकास आणि समस्यामुक्त नागपूर हा आमचा अजेंडा आहे. सभागृहात प्रश्न मांडूनही न सुटल्यास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्याकडेही पाठपुरावा करू, असे महाकाळकर यांनी स्पष्ट केले, पक्षीय राजकारणापेक्षा नागपूरकरांचा प्रश्न महत्वाचा असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
Pandharpur Crime: पंढरपुरातील मायलेकाच्या दुहेरी हत्येचा अखेर उलगडा; 8 महिन्यांनंतर आरोपी गजाआड
Ans: अधिकाऱ्यांच्या राजवटीत आणि कोरोनामुळे कामे ठप्प राहिल्याने नागपूरची दूरवस्था झाल्याचा आरोप.
Ans: शहराच्या स्थितीवर श्वेतपत्रिका जाहीर करण्याची मागणी.
Ans: रस्ते कामे, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन आणि अतिक्रमणाचे प्रश्न.






