Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘धर्मेंद्र प्रधान नव्हे, आता सरकारच बदलायचं’; सोनम वांगचुक आंदोलनाला पाठिंबा देत उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर हल्लाबोल

सोनम वांगचुक आणि अभिजित दीपके यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ मुंबईतील आझाद मैदानात आयोजित कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर तीव्र टीका केली. केवळ शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा नव्हे, तर सरकार बदलण्यासाठी व्यापक जनआंदोलन उभे करण्याचे आवाहन त्यांनी केले.

  • By विवेक
Updated On: Jul 19, 2026 | 05:58 PM
'धर्मेंद्र प्रधान नव्हे, आता सरकारच बदलायचं'; सोनम वांगचुक आंदोलनाला पाठिंबा देत उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर हल्लाबोल

'धर्मेंद्र प्रधान नव्हे, आता सरकारच बदलायचं'; सोनम वांगचुक आंदोलनाला पाठिंबा देत उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Follow Us
Follow Us:
  • उद्धव ठाकरेंनी सोनम वांगचुक आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला
  • ‘धर्मेंद्र प्रधान नव्हे, सरकारच बदलायचं’ अशी भूमिका मांडली
  • आझाद मैदानातील आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती
 

दिल्लीत सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या अन्नत्याग आंदोलनाला देशभरातून पाठिंबा वाढत असताना मुंबईतही या आंदोलनाच्या समर्थनार्थ मोठे आंदोलन आयोजित करण्यात आले. आझाद मैदानात झालेल्या या आंदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सहभाग घेत केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी केवळ केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी न करता केंद्रातील सरकार बदलण्याचे आवाहन केले.

या आंदोलनाला आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, उपनेत्या सुषमा अंधारे आणि पक्षाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. आंदोलनस्थळी सोनम वांगचुक आणि अभिजित दीपके यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. दिल्लीतील आंदोलनाला अधिक बळ देण्यासाठी राज्यभरातून नागरिकांनी एकत्र यावे, असे आवाहनही करण्यात आले.

“सरकारविरोधात व्यापक लढा उभा राहणे गरजेचे”

भाषणादरम्यान उद्धव ठाकरे म्हणाले की, “आंदोलनात दिसलेले “धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या” हे फलक अपुरे आहेत. त्यांच्या मते, केवळ एका मंत्र्याचा राजीनामा हा उपाय नसून रोजगार, शिक्षण आणि तरुणांच्या प्रश्नांवर उत्तर देण्यात अपयशी ठरलेल्या सरकारविरोधात व्यापक लढा उभा राहणे गरजेचे आहे.”

Uddhav Thackeray Protest : उद्धव ठाकरेंवर गुन्हा दाखल करा! आंदोलनावरून ठाकरे विरुद्ध सदावर्ते वाद

ते पुढे म्हणाले की, “हा संघर्ष केवळ सोनम वांगचुक किंवा अभिजित दीपके यांच्यापुरता मर्यादित नाही. देशातील विद्यार्थी, बेरोजगार युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी हा लढा आहे.” सरकारमध्ये बदल होईपर्यंत हा जनआक्रोश कायम ठेवण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

उद्धव ठाकरेंची संघर्ष अधिक व्यापक करण्याची भूमिका

उद्धव ठाकरे यांनी आपण या आंदोलनाचे नेतृत्व करण्यासाठी नव्हे, तर प्रत्येक नागरिकाने स्वतः नेतृत्व स्वीकारावे, हा संदेश देण्यासाठी आल्याचे स्पष्ट केले. लोकशाहीच्या मार्गाने जनतेचा आवाज बुलंद करण्याचे आवाहन करत त्यांनी संघर्ष अधिक व्यापक करण्याची भूमिका मांडली.

दरम्यान, दिल्लीत सोनम वांगचुक यांच्यावर उपचार सुरू असताना आंदोलनाचे नेतृत्व अभिजित दीपके यांनी स्वीकारले असून विविध राज्यांतून त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय वातावरणही अधिक तापले असून या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

‘हे तर लोकशाहीचे सीरियल रेपिस्ट’; सहा खासदारांच्या विलिनीकरणावरून संजय राऊतांचा शिंदे गटावर घणाघात

Web Title: Uddhav thackeray support sonam wangchuk protest modi government attack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2026 | 05:58 PM

Topics:  

  • Abhijeet Deepke
  • CJP
  • Shivsena UBT
  • Sonam Wangchuk
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Uddhav Thackeray : मतदारयादीवरून महाराष्ट्रात रणकंदन; बीडचे 250 BLA उद्धव ठाकरेंच्या भेटीला, भाजपवर गंभीर आरोप
1

Uddhav Thackeray : मतदारयादीवरून महाराष्ट्रात रणकंदन; बीडचे 250 BLA उद्धव ठाकरेंच्या भेटीला, भाजपवर गंभीर आरोप

कॉकरोच जनता पार्टीत मोठी फूट; विरोधात उभी राहणार ‘CJP डेमोक्रॅटिक’, केजरीवालांवर केले गंभीर आरोप
2

कॉकरोच जनता पार्टीत मोठी फूट; विरोधात उभी राहणार ‘CJP डेमोक्रॅटिक’, केजरीवालांवर केले गंभीर आरोप

Uddhav Thackeray Sambhajinagar Visit: मराठवाड्यात राजकीय धुरळा; ठाकरे पिता-पुत्रांचे सलग दौरा
3

Uddhav Thackeray Sambhajinagar Visit: मराठवाड्यात राजकीय धुरळा; ठाकरे पिता-पुत्रांचे सलग दौरा

Shiv Sena Symbol Case: शिवसेना कुणाची? ‘आम्हीच मूळ शिवसेना’; शिंदे गटाचा दावा, विधिमंडळातील बहुमताचा निकष योग्य असल्याचा युक्तिवाद
4

Shiv Sena Symbol Case: शिवसेना कुणाची? ‘आम्हीच मूळ शिवसेना’; शिंदे गटाचा दावा, विधिमंडळातील बहुमताचा निकष योग्य असल्याचा युक्तिवाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.