Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘शरद पवार गटाने दोनवेळा दगा दिला,’ पुणे विधानपरिषद निवडणूक माघारीवरून वसंत मोरे भडकले

ण्यातील शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर गंभीर आरोप केले आहेत. "राष्ट्रवादीने आम्हाला दोनवेळा दगा दिला," असे वक्तव्य त्यांनी यावेळी केले.

  • By विवेक
Updated On: Jun 06, 2026 | 03:23 PM
Shivsena UBT leader Vasant More, NCP Sharad Pawar, Pune Vidhan Parishad Election, Congress,

Shivsena UBT leader Vasant More, NCP Sharad Pawar, Pune Vidhan Parishad Election, Congress,

Follow Us
Follow Us:
  • विधानपरिषद निवडणुकांआधीच महायुतीने १७ पैकी ८ जागांवर बिनविरोध विजय
  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर गंभीर आरोप
  • राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि भाजपची आतून छुपी युती होती का? वसंत मोरे यांचा सवाल
राज्यात विधानपरिषद निवडणुकांचे वारे आता वेगाने वाहू लागले आहेत. १८ जून रोजी होणाऱ्या निवडणुकांआधीच महायुतीने १७ पैकी ८ जागांवर बिनविरोध विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी या ८ जागांवरून निवडणूक अर्ज माघारी घेतल्याने महायुतीच्या उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या पुणे विधानपरिषद मतदारसंघातही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विक्रम काकडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. राष्ट्रवादीचेच बंडखोर सुनील टिंगरे, भाजपचे प्रदीप कंद आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे श्रीकांत पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने पुण्यातील निवडणूक बिनविरोध पार पडली. यावरूनच आता पुण्यातील शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर गंभीर आरोप केले आहेत. “राष्ट्रवादीने आम्हाला दोनवेळा दगा दिला,” असे वक्तव्य त्यांनी यावेळी केले.

काय म्हणाले वसंत मोरे?

वसंत मोरे यांनी याबाबत बोलताना नाराजी व्यक्त केली. ते यावेळी म्हणाले, “विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराने माघार घेण्याबाबत चर्चा झाली असेल तर ती आमच्यापर्यंत का पोहोचली नाही. आमच्या वरिष्ठांना देखील याबाबत काहीही माहिती नव्हती. राष्ट्रवादीने आम्हाला दोन वेळा दगा दिला. एकदा महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळी आणि आता विधानपरिषद निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादीने दगा दिला. त्यामुळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि भाजपची आतून छुपी युती होती का?” असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

राष्ट्रवादी शरद पवार गटाविरुद्ध काँग्रेसही नाराज

पुणे विधानपरिषद निवडणुकीतून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवाराने माघार घेतल्याने काँग्रेससुद्धा शरद पवार गटावर नाराज असल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादीचेच बंडखोर सुनील टिंगरे, भाजपचे प्रदीप कंद आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे श्रीकांत पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने पुण्यातील निवडणूक बिनविरोध पार पडली. त्यानंतर, काँग्रेसने शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर विश्वासघात केल्याचा आरोप केला. बुधवारी (३ जून) राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांच्याशी मुबंईत भेट घेतली. त्यानंतर निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एकीकडे काँग्रेसने राष्ट्रवादी शरद पवार गटाविरुद्ध संताप व्यक्त केला असून आता शिवसेना ठाकरे गटाकडूनही याबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

Solapur Politics: सोलापुरात राजकीय वातावरण तापले! ‘६०० मतदारांची अदृश्य शक्ती आमच्या पाठीशी’; खा. धैर्यशील मोहिते-पाटलांचा दावा

१५० कोटींचा घोडेबाजार, संजय राऊतांचे आरोप

संजय राऊत म्हणाले, “मी आधीपासूनच सांगत होतो कि आपल्याकडे संख्याबळ नाही. तरीही काही कार्यकर्त्यांनी पक्षाच्या आदेशाने निवडणुका बिनविरोध होऊ नयेत यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले. हे उमेदवारी अर्ज शेवटपर्यंत टिकायला हवे होते. पण, निवडणुका बिनविरोधच करायच्या या सरकारच्या अट्टाहासापायी अनेक मार्गांचा अवलंब झाला. त्यात मोठ्या प्रमाणात विरोधी पक्षांच्या उमेदवारांना विकत घेण्याचा प्रयत्न झाला. हा प्रयत्न काही ठिकाणी यशस्वी झाला. आज दिवसभरात निवडणुका बिनविरोध व्हाव्यात, महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी माघार घ्यावी यासाठी जवळपास दीडशे कोटी रुपये खर्च करण्यात आले. प्रमुख उमेदवारांना किमान २५ कोटी रुपये दिले आहेत. मुंबईतील सोफीटेल हॉटेलमध्ये हा व्यवहार झाला,” असे ते म्हणाले.

बिनविरोधची धडपड, माघारनाट्य आणि १५० कोटींचा घोडेबाजार, संजय राऊतांचे महायुतीवर गंभीर आरोप; भाजपचा पलटवार

Web Title: Shivsena ubt leader vasant more slams ncp sharad pawar over pune vidhan parishad election nomination form withdrawal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2026 | 03:23 PM

Topics:  

  • Congress
  • NCP Sharad Pawar
  • Shivsena UBT
  • Vasant more
  • Vidhan Parishad Election

संबंधित बातम्या

CJP Protest: जंतर-मंतरवरील आंदोलन म्हणजे राजकीय कटकारस्थान, काँग्रेसकडून विद्यार्थ्यांचा वापर; शिंदे नेत्यांचा घणाघाती आरोप
1

CJP Protest: जंतर-मंतरवरील आंदोलन म्हणजे राजकीय कटकारस्थान, काँग्रेसकडून विद्यार्थ्यांचा वापर; शिंदे नेत्यांचा घणाघाती आरोप

‘विश्वगुरू झुरळांना घाबरतात’; दिल्लीतील आंदोलनावरून सुषमा अंधारेंचा मोदी सरकारवर घणाघात, ‘लोकशाही शेवटचा घटका मोजत आहे’
2

‘विश्वगुरू झुरळांना घाबरतात’; दिल्लीतील आंदोलनावरून सुषमा अंधारेंचा मोदी सरकारवर घणाघात, ‘लोकशाही शेवटचा घटका मोजत आहे’

‘पक्षाची रक्षा करण्यासाठीच रामरक्षा’; उद्धव ठाकरेंच्या आंदोलनावर एकनाथ शिंदेंचा जोरदार टोला
3

‘पक्षाची रक्षा करण्यासाठीच रामरक्षा’; उद्धव ठाकरेंच्या आंदोलनावर एकनाथ शिंदेंचा जोरदार टोला

‘मी अंधभक्त नाही, देशभक्त आहे’; अभिजीत दिपके यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ उद्धव ठाकरेंचा भाजपला थेट इशारा
4

‘मी अंधभक्त नाही, देशभक्त आहे’; अभिजीत दिपके यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ उद्धव ठाकरेंचा भाजपला थेट इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.