Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘विश्वगुरू झुरळांना घाबरतात’; दिल्लीतील आंदोलनावरून सुषमा अंधारेंचा मोदी सरकारवर घणाघात, ‘लोकशाही शेवटचा घटका मोजत आहे’

दिल्लीतील CJP आंदोलनादरम्यान पोलिसांच्या कारवाईवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांच्या आंदोलनाला पक्षाचा पाठिंबा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

  • By विवेक
Updated On: Jul 20, 2026 | 04:57 PM
Sushma Andhare

Sushma Andhare

Follow Us
Follow Us:
  • आंदोलन चर्चेतून सोडवण्याऐवजी सरकार दडपशाही करत असल्याचा सुषमा अंधारेंचा आरोप
  • ‘विश्वगुरू झुरळांना घाबरतात’: आंदोलनावरून मोदी सरकारवर उपरोधिक हल्लाबोल.
  • अभिजित दिपके आणि सोनम वांगचुक यांच्याशी उद्धव ठाकरे सातत्याने संपर्कात
 

राजधानी दिल्लीमध्ये कॉकरोच जनता पार्टी (CJP)च्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनावरून महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली संसदेकडे मोर्चा काढण्यात आला. आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलकांना रोखण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्याची माहिती समोर आली. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.

‘लोकशाही शेवटचा घटका मोजत आहे’

सुषमा अंधारे म्हणाल्या की, “भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाहीवादी देश असल्याचा दावा केला जातो. अशा परिस्थितीत आंदोलकांच्या मागण्यांवर संवाद साधण्याऐवजी आंदोलन मोडून काढण्यावर भर दिला जात असल्याचे चित्र दिसत आहे.” सोनम वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून हटवण्यासाठी वापरण्यात आलेल्या पांढऱ्या चादरींचा उल्लेख करत त्यांनी, “पांढऱ्या चादरी शेवटच्या क्षणी वापरल्या जातात. लोकशाहीचाच शेवट करण्याचा प्रयत्न सुरू आहे,” असा आरोप केला.

Ram Kadam on Uddhav Thackeray: ‘कॉकरोच’ पक्षाला पाठिंबा देऊन ठाकरेंनी स्वतःचीच प्रतिष्ठा कमी केली’; भाजप नेते राम कदम यांचा घणाघात

‘विश्वगुरू झुरळांना घाबरतात’

केंद्र सरकारवर टीका करताना अंधारे म्हणाल्या की, पाकिस्तानशी चर्चा करण्याचा सल्ला देणारे सत्ताधारी आपल्या देशातील नागरिकांशी संवाद साधण्यास तयार नाहीत. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी हा वेगळा मुद्दा असला, तरी सरकार चर्चेलाही तयार नसल्याचे त्यांनी म्हटले. “याचा अर्थ विश्वगुरू झुरळांना घाबरतात,” अशी उपरोधिक टीका करत त्यांनी लोकशाही धोक्यात असल्याचा दावा केला.

CJP आंदोलनाला ठाकरे गटाचा पाठिंबा

सुषमा अंधारेंनी स्पष्ट केले की, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आंदोलनाशी सातत्याने संपर्कात आहेत. अभिजित दिपके, सोनम वांगचुक आणि आंदोलनातील अन्य सहभागींसोबत पक्षाचे नेते नियमित चर्चा करत असल्याचे त्यांनी सांगितले. आंदोलनाला पक्षाचा पूर्ण पाठिंबा कायम राहील, असेही त्यांनी नमूद केले.

‘अरे मोदीजींच्या चमच्या, देश काय बापाची जाहगीर वाटली काय ?’; रोहिणी खडसेंचा अतुल भातखळकरांवर घणाघात

दिल्लीतील आंदोलनामुळे केंद्र सरकार आणि विरोधकांमधील संघर्ष अधिक तीव्र होताना दिसत असून, येत्या काही दिवसांत या आंदोलनाचे राजकीय पडसाद आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Web Title: Sushma andhare slams modi government over cjp delhi protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2026 | 04:57 PM

Topics:  

  • Cockroach Janata Party
  • Shivsena UBT
  • sushma andhare
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Abhijeet Dipke on Saurav Das: ‘सौरव, आता तुझी वेळ येणार!’; अभिजीत दीपकेंचा सहकाऱ्याला गमतीशीर इशारा
1

Abhijeet Dipke on Saurav Das: ‘सौरव, आता तुझी वेळ येणार!’; अभिजीत दीपकेंचा सहकाऱ्याला गमतीशीर इशारा

Sushma Andhare News:  जिल्हा शल्यचिकित्सकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का नाही? ; सुषमा अंधारे आक्रमक
2

Sushma Andhare News:  जिल्हा शल्यचिकित्सकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का नाही? ; सुषमा अंधारे आक्रमक

विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद धोक्यात; सदा सरवणकरांची आयुक्तांकडे धाव
3

विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद धोक्यात; सदा सरवणकरांची आयुक्तांकडे धाव

CJP Protest: NEET आंदोलन पुन्हा पेटणार? 5 सप्टेंबरला दिल्लीत CJP चा मोर्चा; देशभरातील तरुणांना सहभागी होण्याचे आवाहन
4

CJP Protest: NEET आंदोलन पुन्हा पेटणार? 5 सप्टेंबरला दिल्लीत CJP चा मोर्चा; देशभरातील तरुणांना सहभागी होण्याचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.