Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 10 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur MLC Result : सोलापुरात कमळ फुलले! भाजपचे राजेंद्र राऊत यांना 483 मते, देशमुखांचा पराभव

सोलापूर विधान परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी 483 मते मिळवत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे उमेदवार वसंत नाना देशमुख यांचा 385 मतांनी पराभव केला. देशमुख यांना 118 मते मिळाली, तर 16 मते अवैध ठरली. निकालानंतर भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला असून राष्ट्रवादीचा विजयाचा दावा फोल ठरला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 22, 2026 | 11:19 AM
सोलापुरात कमळ फुलले! भाजपचे राजेंद्र राऊत यांना 483 मते, देशमुखांचा पराभव

सोलापुरात कमळ फुलले! भाजपचे राजेंद्र राऊत यांना 483 मते, देशमुखांचा पराभव

Follow Us
Follow Us:
  • सोलापूर विधान परिषदेत भाजपची बाजी
  • राजेंद्र राऊत 385 मतांनी विजयी
  • राष्ट्रवादीचा दावा फोल
सोलापूर : महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या ११ जागांच्या निकालांमुळे राज्यात नव्या राजकीय उलथापालथीला सुरुवात झाली आहे. विधान परिषदेच्या १७ रिक्त जागांपैकी सहा जागांवर आधीच बिनविरोध निवड झाली होती, तर उर्वरित ११ जागांवर आज अटीतटीची लढत पाहायला मिळाली. विशेषतः ‘ऑपरेशन टायगर’ आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांच्याभोवती सुरू असलेल्या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर हे निकाल राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण मानले जात आहेत.

या निवडणुकीतील सोलापूर विधान परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार माजी आमदार राजेंद्र राऊत हे विजयी झाले आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार वसंत नाना देशमुख यांचा पराभव झाला आहे. विधानपरिषद निवडणुकीसाठी 18 जून रोजी मतदान घेण्यात आले होते .सोमवारी सकाळी आठ वाजल्यापासून सोलापुरातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात मतमोजणी पूर्ण करण्यात आली.

खासदार उदयनराजे आणि शशिकांत शिंदेंची मतदान केंद्रावर गळाभेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

भाजपचे राजेंद्र राऊत यांना 483 मते मिळाली असून त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार देशमुख यांना 118 मते मिळाले आहेत. 16 मते अवैध ठरवण्यात आले आहे. निवडणूक निकालानंतर भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने विजयाचा दावा केला होता ,मात्र त्यांना अपयश आले आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी किमान 500 मते राजेंद्र राऊत यांना पडतील असे सांगितले होते ,मात्र त्यांचाही अंदाज चुकला आहे .राजेंद्र राऊत हे 385 मतांनी आघाडी घेत विजयी झाले.

भारतीय जनता पक्षाने (भाजप) या निवडणुकीत सुरुवातीपासूनच विजयाचा दावा केला होता. भाजपने नगरपालिका, पालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये एकूण ३०७ मते मिळवून बहुमत मिळवले. भाजपला महायुतीतील मित्रपक्ष, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) यांचाही पाठिंबा मिळाला.

भाजपच्या उमेदवाराला करमाळा, माढा आणि माळशिरस येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट) आमदारांचा, तसेच सांगोला येथील शेतकरी कामगार पक्षाच्या (शेकाप) आमदारांचा पाठिंबा मिळाला. याशिवाय, जिल्ह्यातील स्थानिक आघाडीनेही भाजपला पाठिंबा देऊन आपली स्थिती आणखी मजबूत केली. मात्र, माढा लोकसभा मतदारसंघाच्या खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे, निधी वाटप आणि भाजपविरोधी वातावरण यांसारखे मुद्दे उपस्थित करून निवडणूक अधिक तीव्र करण्याचा प्रयत्न केला.

विधान परिषद निवडणुकीसाठी राज्यभरात विक्रमी मतदान, नाशिक, भंडाऱ्यात सर्वाधिक 100% मतदान

Web Title: Solapur mlc election result bjp rajendra raut wins by 385 votes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2026 | 11:19 AM

Topics:  

  • BJP
  • MLC Election Result 2026
  • Solapur

संबंधित बातम्या

‘जवान सीमेवर रक्त सांडतोय; महाराष्ट्र रक्तदानातून त्यांच्या पाठीशी उभा’; एकनाथ शिंदेंचा दिल्लीतील संदेश
1

‘जवान सीमेवर रक्त सांडतोय; महाराष्ट्र रक्तदानातून त्यांच्या पाठीशी उभा’; एकनाथ शिंदेंचा दिल्लीतील संदेश

NEET पेपरफुटीनंतर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा; पहिल्यांदाच व्यक्त केली भूमिका, म्हणाले ‘माझ्यासाठी पद महत्त्वाचं नाही’
2

NEET पेपरफुटीनंतर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा; पहिल्यांदाच व्यक्त केली भूमिका, म्हणाले ‘माझ्यासाठी पद महत्त्वाचं नाही’

‘विकसित भारतासाठी जातीव्यवस्थेच्या पलीकडे जाऊन राष्ट्रभक्तीचा धागा जपा’; रविंद्र चव्हाण यांचं आवाहन
3

‘विकसित भारतासाठी जातीव्यवस्थेच्या पलीकडे जाऊन राष्ट्रभक्तीचा धागा जपा’; रविंद्र चव्हाण यांचं आवाहन

Jarange Patil : कॅमेऱ्यासमोर कागदपत्रे दाखवत जरांगे पाटलांनी सरकारला घेरले!
4

Jarange Patil : कॅमेऱ्यासमोर कागदपत्रे दाखवत जरांगे पाटलांनी सरकारला घेरले!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.