
Solapur News, PM Kisan, Farmers News, e-KYC,
२५ मे २०२६ पर्यंतच्या आकडेवारीनुसार सोलापूर जिल्ह्यातील तब्बल ९९ टक्के पात्र शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. जिल्ह्यातील ११ तालुक्यांमध्ये एकूण ५ लाख १८ हजार ५६२ नोंदणीकृत लाभार्थी शेतकरी आहेत. त्यापैकी ५ लाख १३ हजार २२७ शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे. या मोहिमेत करमाळा तालुक्याने आघाडी घेतली असून येथे जवळपास १०० टक्के ई-केवायसी पूर्ण झाली आहे. तालुक्यात केवळ २६३ शेतकरी प्रलंबित आहेत. दुसरीकडे पंढरपूर तालुक्यात सर्वाधिक १ हजार ४५४ शेतकऱ्यांची ई-केवायसी बाकी आहे.
माळशिरस तालुक्यात ५५६. सांगोला तालुक्यात ५०६ आणि मंगळवेढा तालुक्यात ४६७ शेतकरी प्रलंबित आहेत. सोलापूर उत्तर तालुक्यात सर्वांत कमी म्हणजे १४१ शेतक-यांची प्रक्रिया बाकी असल्याची माहिती कृर्षी विभागाने दिली आहे. दरम्यान, पीएम-किसान योजनेच्या निकषांनुसार लाभाथ्यांचे आधार प्रमाणीकरण, भूमी अभिलेख नोंदणी, आधारशी बैंक खाते जोडणी आणि इं केवायसी या सर्व प्रक्रिया पूर्ण असणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील ५ लाख ५२६ शेतक-यांनी या सर्व अटीची पूर्तता केली असून त्यानाच पुढील हप्त्याचा लाभ मिळणार आहे.
जवळच्या ग्राहक सेवा केंद्रात भेट द्या
पीएम-किसानच्या अधिकृत पोर्टलवर लॉगिन करा
आधार क्रमांक व मोबाईल नंबर आवश्यक
बैंक खाते आधारशी लिंक असणे बंधनकारक
बायोमेट्रिक किंवा ओटीपीद्वारे प्रक्रिया पूर्ण करता येते
यांचा हप्ता अडकू शकतो
ई-केवायसी अपूर्ण असलेले लाभार्थी
आधारशी बैंक खाते लिंक नसलेले शेतकरी
चुकीची माहिती किंवा अपूर्ण कागदपत्रे असलेले खातेधारक
ज्या शेतक-यांचे ई-केवायसी किवा बैंक खाते आधारशी लिंक नाही, त्याना पुढील हप्ता मिळण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात, त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी तातडीने जवळच्या ग्राहक सेवा केंद्रावर, सेतू सुविचा केंद्रावर किया पीएम-किसानच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन केले आहे.
पंढरपूर १,४५४
माळशिरस ५५६
सांगोला ५०६
मंगळवेढा ४६७
करमाळा २६३
उ. सोलापूर १४१