Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इथेनॉल आले नसते तर साखर कारखाने बंद पडले असते- नितीन गडकरी

जर इथेनॉल आले नसते तर राज्यातील आणि देशातील अनेक साखर कारखाने बंद पडले असते असे स्पष्ट मत केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

  • By विवेक गायकवाड
Updated On: May 15, 2026 | 09:18 PM
Nitin Gadkari,

Nitin Gadkari,

Follow Us
Follow Us:

सातारा दि १५ ( प्रतिनिधी ): भविष्यात उसापासून ऊर्जा निर्मितीवर भर द्यावा लागणार आहे. दिवसेंदिवस साखर कारखानदारीला विविध समस्या व अडचणींना सामोरे जावे लागत आहे.सर्वांना गोड असणारी साखर कारखान्यांसाठी मात्र कडू ठरत आहे. जर इथेनॉल आले नसते तर राज्यातील आणि देशातील अनेक साखर कारखाने बंद पडले असते असे स्पष्ट मत केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

साताऱ्यातील किसन वीर साखर कारखाना येथे रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते आबासाहेब वीर पुरस्कार स्वीकारल्यानंतर गडकरी बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले खासदार उदयनराजे भोसले खासदार नितीन पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजू भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. सन्मानपत्र रुपये एक लाख रोख व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. उपाध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी प्रास्ताविक, कारखान्याचे अध्यक्ष मकरंद पाटील यांनी स्वागत केले.

आज इथेनॉल’ची निर्मिती झाल्यामुळे साखर कारखान्यांना नवसंजीवनी मिळत आहे. इंधनामध्ये इथेनॉलचा वापर वाढविण्यासाठी मी आग्रही आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात परकीय चलन वाचविले जाईल. खाजगी इंधनाच्या कंपन्यांनाही इथेनॉल वापर करण्यासाठी सांगण्यात आले आहे. इथेनॉल चा शोध लागला नसता तर आज राज्यासह देशातील अनेक साखर कारखाने बंद पडले असते. इथेनॉलची गरज खूप जास्त असल्यामुळे साखरेपेक्षा इथेनॉल उत्पादनावर भर द्यावा लागेल असे देखील त्यांनी म्हटले आहे.

“गडकरी मुख्यमंत्री असते तर…” प्रणिती शिंदे यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चा

इथेनॉल उत्पादनाला प्रोत्साहन मिळावे यासाठी आम्ही खूप उपाय केले आहेत . बायो इथेनॉलवर चालणाऱ्या पावर जनरेटर सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून इथेनॉलची गरज भागवण्यासाठी नियोजन करण्याची उद्योगासाठी वेळ असल्याचे देखील त्यांनी म्हटले. तसेच भारतामध्ये फॅक्स इंजिन सुरू करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी देताना म्हटले की, दुचाकी निर्मिती कंपन्यांना आधीच फ्लेक्स इंजिन बनवायला सुरुवात केली आहे.

महाराष्ट्राच्या सहकारी चळवळीबद्दल दिल्लीत चांगले बोलले जात नाही. मात्र आता केंद्र सरकारचे धोरण बदलले जात असून शेतकरी हा अन्नदाता न राहता ऊर्जादाता ही होत आहे. तंत्रज्ञान आणि ए आय च्या माध्यमातून शेतकऱ्यांनीही नवीन उत्पादने घेण्याबरोबरच शेतीतील उत्पादन खर्च कमी करून जास्तीत जास्त उत्पादन घेण्यावर भर द्यायला हवा असे त्यांनी सांगितले. एकरी किमान शंभर टन ऊस उत्पादित व्हायला हवा. शेती उत्पादनांबरोबरच इतर टाकाऊ वस्तु पासून ही आपण नवनवीन शोध लावत आहोत. पाणी हे भविष्य आहे.पाणी संवर्धनाची गरज त्यांनी व्यक्त केली.

हायड्रोजन सीएनजी आदी अनेक उपपदार्थ निर्मिती करून साखर कारखान्यांना नव संजीवनी द्यावी लागेल असेही त्यांनी सांगितलं. शेती उत्पादनात आपण अग्रेसर असतो तरी कोणताही शेतीचा भाव आपण ठरवत नाही. इतर देश तो भाव ठरवतात. भारताचे धोरण ही शेतकऱ्यांच्या बाजूने नाही तर ते शहरी करणाच्या बाजूने असल्याने आपल्या शेती उत्पादनाला भाव मिळण्यास मर्यादा येत असल्याचे त्यांनी सांगितले.पुणे कोल्हापूर आणि पुणे बेंगलोर हे नवीन रस्ते आपण प्रस्तावित करत आहोत. पुण्याहून एक तासात साताऱ्याला पोहोचता येईल. पुण्यात लवकरच तीन वर्ष उड्डाणपूल बांधण्यात येतील असे त्यांनी सांगितले.

SIR अभियानासाठी ‘या’ काँग्रेस नेत्याची राज्य समन्वयकपदी नियुक्ती

Web Title: Sugar factories will closed if ethenol didnt made says nitin gadkari

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2026 | 09:18 PM

Topics:  

  • Nitin Gadkari
  • Union Minister Nitin Gadkari

संबंधित बातम्या

E-20 पेट्रोल भरलं तर जबाबदारी तुमची, सरकारकडून हाथ वरती? पेट्रोल पंपावर लागले होर्डिंग्ज, नेमकं प्रकरण काय?
1

E-20 पेट्रोल भरलं तर जबाबदारी तुमची, सरकारकडून हाथ वरती? पेट्रोल पंपावर लागले होर्डिंग्ज, नेमकं प्रकरण काय?

‘गडकरींप्रमाणेच फडणवीसांचे पंतप्रधानपदाचे पंख…’, उद्धव ठाकरे यांचा मोठा दावा, तर आता देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…
2

‘गडकरींप्रमाणेच फडणवीसांचे पंतप्रधानपदाचे पंख…’, उद्धव ठाकरे यांचा मोठा दावा, तर आता देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.