Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘अमित ठाकरेपेक्षा आमच्या आंबेडकरवादी चळवळीतील कार्यकर्ता प्रभावी,’ विसरलेल्या भाषणावरून सुजात आंबेडकरांचा अमित ठाकरेंवर निशाणा !

अमित ठाकरे यांच्या भाषणादरम्यान घडलेल्या घटनेनंतर सुजात आंबेडकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या गुणवत्तेचा उल्लेख करत मुख्य प्रवाहातील माध्यमांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

  • By विवेक
Updated On: Aug 03, 2026 | 06:27 PM
विसरलेल्या भाषणावरून सुजात आंबेडकरांचा अमित ठाकरेंवर निशाणा !

विसरलेल्या भाषणावरून सुजात आंबेडकरांचा अमित ठाकरेंवर निशाणा !

Follow Us
Follow Us:
  • अमित ठाकरेंच्या भाषणानंतर सुजात आंबेडकरांची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत
  • चळवळीतील कार्यकर्त्यांच्या गुणवत्तेचा उल्लेख करत मेरिटचा मुद्दा उपस्थित
  • मुख्य प्रवाहातील माध्यमांच्या कव्हरेजवरही सुजात आंबेडकरांचा सवाल
 

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या (मनविसे) 20 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे यांना भाषण विसरल्यामुळे चालू भाषणातून व्यासपीठ सोडावे लागले होते. त्यानंतर थोड्या वेळात पुन्हा व्यासपीठावर येत त्यांनी आपले भाषण पूर्ण केले. यावरूनच आता वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी निशाणा साधत मोठे विधान केले आहे.

आपल्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून पोस्ट करत त्यांनी, “अमित ठाकरेपेक्षा आमच्या आंबेडकरवादी चळवळीतील कार्यकर्ता प्रभावीपणे आपली मते मांडू शकतो तरीही मीडिया स्पेस काहीच लोकांसाठी ‘Reserved’ असते,” असे विधान केले. या वक्तव्यातून त्यांनी आरक्षण, मेरिट आणि माध्यमांच्या भूमिकेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

ठाकरेंना आणखी एक धक्का! कल्याणच्या बड्या महिला पदाधिकाऱ्याचा राजीनामा; नव्या राजकीय चर्चांना उधाण

नेमकं काय म्हणाले सुजात आंबेडकर ?

सुजात आंबेडकर आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून म्हणाले, “मी कोणाची खिल्ली उडवत नाही पण, आज देशभरात आरक्षण आणि मेरिट या मुद्द्यावर बोलले जात आहे. त्यामुळे अमित ठाकरे यांच्या भाषणावर बोलावसे वाटते. आंबेडकरवादी चळवळीतून व्याख्याने ऐकणारा, चळवळीचे कार्यक्रम, उपक्रम आपल्या गाव-खेड्यात, गल्लीत राबवणारा एक कार्यकर्ता अगदी स्पष्टपणे, निर्भीडपणे, सामाजिक भान जपत अन्याय-अत्याचाराविरुद्ध आणि समाज परिवर्तनावर परखड मत मांडू शकतो.”

“बहुजनवादी, आदिवासी, कामगार, डाव्या चळवळीतील विद्यार्थी त्यांच्या प्रश्नांवर ठाम भूमिका मांडतात. आताच CJP च्या आंदोलनातील मुले अत्यंत प्रभावीपणे बोलताना, सरकारला जाब विचारताना दिसले. ही सर्व मुले अमित ठाकरे यांच्यापेक्षा अधिक प्रभावीपणे मुद्दे मांडताना दिसली आहेत. त्यांना कोणी लिहून देईल, मग ते बोलतील, मग ते मांडतील, अशी वेळ त्यांच्यावर कधीही येत नाही. प्रश्नांचे आकलन, मते निर्भीडपणे मांडण्याचा, व्यक्त होण्याचा अभ्यास चळवळीतील कार्यकर्त्यांना आहे.”

मी कोणाची खिल्ली उडवत नाही पण, आज देशभरात आरक्षण आणि मेरिट या मुद्द्यावर बोलले जात आहे. त्यामुळे अमित ठाकरे यांच्या भाषणावर बोलावसे वाटते. आंबेडकरवादी चळवळीतून व्याख्याने ऐकणारा, चळवळीचे कार्यक्रम, उपक्रम आपल्या गाव-खेड्यात, गल्लीत राबवणारा एक कार्यकर्ता अगदी स्पष्टपणे,… pic.twitter.com/Nx1g6QMJ1X — Sujat Ambedkar (@Sujat_Ambedkar) August 3, 2026

मीडियावरदेखील प्रश्नचिन्ह केले उपस्थित

“तथाकथित मेनस्ट्रीम मीडिया विसरलेली भाषणे, मांडता न आलेले मुद्दे कव्हर करणे आणि त्याला महत्त्व देण्याचे काम करतात. पण याच्यापेक्षा कित्येक पटीने सक्षम असलेल्या चळवळीतील आणि आंदोलनातील लोकांना दाखवण्याची हिंमत का करत नाही? त्यांच्या योग्यतेचे श्रेय त्यांना कधीच दिले जात नाही.”

“आरक्षण आणि मेरिटवर बोलणाऱ्यांना हे का दिसत नाही? अमित ठाकरेपेक्षा आमच्या आंबेडकरवादी चळवळीतील कार्यकर्ता प्रभावीपणे आपली मते मांडू शकतो आणि मांडत आहे. फरक फक्त एवढाच आहे की, जरी या मुलांकडे खूप जास्त टॅलेंट, क्षमता आणि मेरिट असलं तरी मीडिया स्पेस काहीच लोकांसाठी ‘Reserved’ असते,” असे ते म्हणाले.

Abhijeet Dipke Challenge To PM Modi: पंतप्रधानांनी आधी पदवी जाहीर करावी; अभिजित दिपकेंचे पंतप्रधानांना थेट आव्हान

दरम्यान, मनविसेच्या कार्यक्रमात अमित ठाकरे यांना भाषणादरम्यान काही क्षण व्यासपीठ सोडावे लागले होते. त्यानंतर त्यांनी पुन्हा व्यासपीठावर येत आपले भाषण पूर्ण केले. या घटनेनंतर विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत असून, सुजात आंबेडकर यांच्या सोशल मीडिया पोस्टने या चर्चेला आणखी वेग दिला आहे. मात्र, त्यांच्या टीकेवर मनसे किंवा अमित ठाकरे यांच्याकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

Web Title: Sujat ambedkar criticizes amit thackeray speech media space marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2026 | 06:24 PM

Topics:  

  • amit thackeray
  • MNS
  • Vanchit Bahujan Aghadi

संबंधित बातम्या

Navarashtra Impact: शेवगावातील अतिक्रमणांवर चालणार हातोडा! ‘नवराष्ट्र’च्या वृत्तानंतर प्रशासनाची बैठक; मोजणीसाठी अर्ज दाखल
1

Navarashtra Impact: शेवगावातील अतिक्रमणांवर चालणार हातोडा! ‘नवराष्ट्र’च्या वृत्तानंतर प्रशासनाची बैठक; मोजणीसाठी अर्ज दाखल

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवण्यावरून वाद; ‘दादासाहेब फाळकेंच्या महाराष्ट्रात सोहळा का नाही?’ राज ठाकरेंचा सवाल
2

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवण्यावरून वाद; ‘दादासाहेब फाळकेंच्या महाराष्ट्रात सोहळा का नाही?’ राज ठाकरेंचा सवाल

Mira Bhayandar News: पर्युषणात कांदा-लसूण खाऊ नका! शाळेच्या व्हॉट्सॲप मेसेजवरून वाद; मनसे आक्रमक
3

Mira Bhayandar News: पर्युषणात कांदा-लसूण खाऊ नका! शाळेच्या व्हॉट्सॲप मेसेजवरून वाद; मनसे आक्रमक

KDMC Politics: मोदींच्या फोटोवरून KDMC महासभेत राडा; सभा तहकूब, ‘एवढाच विरोध तर सत्तेतून बाहेर पडा’ मनसेचा भाजपला टोला
4

KDMC Politics: मोदींच्या फोटोवरून KDMC महासभेत राडा; सभा तहकूब, ‘एवढाच विरोध तर सत्तेतून बाहेर पडा’ मनसेचा भाजपला टोला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.