Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mira Bhayandar News: पर्युषणात कांदा-लसूण खाऊ नका! शाळेच्या व्हॉट्सॲप मेसेजवरून वाद; मनसे आक्रमक

Mira Bhayandar News : पर्युषण काळात कांदा-लसूण न खाण्याचे आवाहन करणारा सेवेन स्क्वेअर अकॅडमीच्या पालकांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवरील मेसेज वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘विद्यार्थ्यांनी काय खावे हे ठरवणारे शाळा कोण?’ असा सवाल करत मनसेचे सचिन पोपळे यांनी आक्षेप घेतला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 10, 2026 | 12:01 PM
पर्युषणात कांदा-लसूण खाऊ नका! शाळेच्या व्हॉट्सॲप मेसेजवरून वाद; मनसे आक्रमक

पर्युषणात कांदा-लसूण खाऊ नका! शाळेच्या व्हॉट्सॲप मेसेजवरून वाद; मनसे आक्रमक

Follow Us
Follow Us:
  • ‘विद्यार्थ्यांनी काय खावे हे ठरवणारी शाळा कोण?’
  • कांदा-लसूण बंदीच्या आवाहनावर मनसेचा संताप
  • पर्युषणातील कांदा-लसूण वाद पेटला!
विजय  काते, मिरा रोड : जैन धर्मातील पवित्र पर्युषण पर्वाच्या पार्श्वभूमीवर मिरा रोड (Mira Bhayandar News) पूर्वेतील सेवेन स्क्वेअर अकॅडमीच्या पालकांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर पाठवण्यात आलेल्या एका संदेशावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. पर्युषण काळात विद्यार्थ्यांनी डब्यात कांदा, लसूण, बटाटा, बीट यांसारखे कंदमूळ पदार्थ आणू नयेत, अशी पालकांना विनंती करण्यात आल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. विद्यार्थ्यांनी काय खावे आणि काय खाऊ नये, हे ठरवण्याचा अधिकार शाळेला कोणी दिला, असा सवाल मनसेचे सचिन पोपळे यांनी उपस्थित केला आहे.

कंदमूळ पदार्थ न आणण्याची विनंती

सेवेन स्क्वेअर अकॅडमीच्या पालकांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर पर्युषण पर्वाच्या निमित्ताने हा संदेश प्रसारित करण्यात आला. पर्युषण काळात विद्यार्थ्यांच्या डब्यामध्ये कांदा, लसूण, बटाटा, बीट यांसारखे कंदमूळ पदार्थ न आणण्याची विनंती करण्यात आली. याशिवाय, या कालावधीत शाळेच्या कॅन्टीनमध्येही कांदा, लसूण आणि बटाटा न वापरता खाद्यपदार्थ उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे संदेशात नमूद करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

MBMC Schools: शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार? शाळांची धक्कादायक आकडेवारी, 9,613 वरून विद्यार्थी संख्या थेट 5,042 वर

पर्युषणातील कांदा-लसूण वाद पेटला!

काही पालकांनी हा संदेश नाव न सांगण्याच्या अटीवर मनसेचे सचिन पोपळे यांच्याकडे पाठवला. त्यानंतर मनसेने शाळेच्या या आवाहनावर तीव्र आक्षेप घेतला. “विद्यार्थ्यांनी काय खावे, हे ठरवणारी शाळा कोण?” असा थेट सवाल पोपळे यांनी उपस्थित केला. एखाद्या विशिष्ट धर्माच्या धार्मिक परंपरेचा आदर करणे वेगळी बाब आहे; मात्र त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक आहारावर होऊ नये, अशी भूमिका मनसेकडून मांडण्यात आली.

मटण किंवा अंडी आणण्याचे आवाहन

ही शाळा भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्याशी संबंधित असल्याचा दावा करत मनसेने या मुद्द्यावरून राजकीय सवालही उपस्थित केला. उद्या एखाद्या मराठी उद्योजकाने शाळा सुरू केली आणि गटारी अमावस्येच्या वेळी विद्यार्थ्यांना चिकन, मटण किंवा अंडी आणण्याचे आवाहन केले, तर ते शाळेच्या माध्यमातून मान्य केले जाईल का? असा प्रतिप्रश्न मनसेकडून करण्यात आला.

दरम्यान, या वादावर आमदार नरेंद्र मेहता यांनी स्पष्टीकरण दिले आहे. शाळेकडून कोणत्याही प्रकारची सक्ती करण्यात आलेली नसून, पालकांना केवळ विनंती करण्यात आली आहे, असे मेहता यांनी स्पष्ट केले. पर्युषण हा जैन समाजासाठी पवित्र काळ असून, या काळात पशू-पक्षी व प्राण्यांवर अन्याय होऊ नये, त्यांची कत्तल टाळली जावी, या भावनेतून पालकांना ही विनंती करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

व्हॉट्सॲप ग्रुपवर पाठवण्यात आलेल्या संदेशातही ‘विनंती’ करण्यात आली असून कोणतीही सक्ती किंवा नियम लादण्यात आलेला नाही, असे मेहता यांनी स्पष्ट केले. या विषयाला वेगळे राजकीय स्वरूप देऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले. त्यामुळे धार्मिक भावना, विद्यार्थ्यांच्या आहाराचे स्वातंत्र्य आणि शाळेच्या अधिकारांची मर्यादा या तीन मुद्द्यांभोवती हा वाद केंद्रित झाला आहे. शाळेचे आवाहन हे केवळ पर्युषण पर्वाचा आदर म्हणून करण्यात आले की त्यातून विद्यार्थ्यांवर अप्रत्यक्ष दबाव निर्माण होतो, यावर आता पालक आणि राजकीय पक्षांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.

Pratap Sarnaik: ‘आमदार मोठा की कायदा?’ बेकायदा बांधकामांवरून प्रताप सरनाईकांचा नरेंद्र मेहतांवर निशाणा

Web Title: Paryushan onion garlic ban appeal seven square academy whatsapp message mns sachin popale narendra mehta

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2026 | 12:01 PM

Topics:  

  • mira bhayandar
  • MNS
  • School

संबंधित बातम्या

KDMC Politics: मोदींच्या फोटोवरून KDMC महासभेत राडा; सभा तहकूब, ‘एवढाच विरोध तर सत्तेतून बाहेर पडा’ मनसेचा भाजपला टोला
1

KDMC Politics: मोदींच्या फोटोवरून KDMC महासभेत राडा; सभा तहकूब, ‘एवढाच विरोध तर सत्तेतून बाहेर पडा’ मनसेचा भाजपला टोला

MBMC Schools: शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार? शाळांची धक्कादायक आकडेवारी, 9,613 वरून विद्यार्थी संख्या थेट 5,042 वर
2

MBMC Schools: शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार? शाळांची धक्कादायक आकडेवारी, 9,613 वरून विद्यार्थी संख्या थेट 5,042 वर

Zilla Parishad School: भिंतींना तडे, छताला गळती; धोकादायक इमारतीत ६८ विद्यार्थ्यांचे भविष्य, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी
3

Zilla Parishad School: भिंतींना तडे, छताला गळती; धोकादायक इमारतीत ६८ विद्यार्थ्यांचे भविष्य, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी

Raj Thackeray: ‘रावणाला 1 लाख मुलं, दीड लाख नातवंडं; मग तो कधी जेवत होता की नाही?’ राज ठाकरेंचा हटके प्रश्न अन् एकच हशा पिकला
4

Raj Thackeray: ‘रावणाला 1 लाख मुलं, दीड लाख नातवंडं; मग तो कधी जेवत होता की नाही?’ राज ठाकरेंचा हटके प्रश्न अन् एकच हशा पिकला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.