Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Abhijeet Dipke on Saurav Das: ‘सौरव, आता तुझी वेळ येणार!’; अभिजीत दीपकेंचा सहकाऱ्याला गमतीशीर इशारा

Abhijeet Dipke: सध्या दीपके या मोहिमेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या (ZP) शाळांमधील विद्यार्थ्यांच्या बिकट समस्यांकडे आणि शिक्षणाच्या दर्जाकडे सरकारचे लक्ष वेधून घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपल्या सहकाऱ्यांबद्दलचा एक रंजक किस्सा शेअर केला.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 27, 2026 | 05:04 PM
Abhijeet Dipke, CJP, Cockroach Janata Party

Abhijeet Dipke, CJP, Cockroach Janata Party

Follow Us
Follow Us:
  • कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके ‘स्कूल ठीक करो’ मोहिमेमुळे देशभरात चर्चेत.
  • आशुतोष रांका आणि सौरव दास या सहकाऱ्यांसह जिल्हा परिषदेच्या शाळांच्या मुद्द्यांवर सरकारला घेरले.
  • मुलाखतीत सौरव दासला मारहाणीचा किस्सा सांगत दीपके यांनी दिला गमतीशीर सूचक इशारा.
Abhijeet Dipke CJP: कॉकरोच जनता पार्टीच्या अभूतपूर्व आंदोलनानंतर सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके सातत्याने चर्चेत आहेत. जंतरमंतरवरील आंदोलन आणि त्यानंतर आता सुरू करण्यात आलेली स्कूल ठिक करो मोहिमेमुळे देशभरात अभिजीत दिपकेंसह त्यांच्या इतर दोन सहकारी आशुतोष रांका आणि सौरव दास चर्चेचा विषय बनले आहेत. अभिजीत दिपके सध्या स्कूल ठिक करो मोहिमेअंतर्गत ते जिल्हा परिषदेच्या शाळेत जे विद्यार्थी शिकतात त्यांना उदभवणाऱ्या समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधताना दिसत आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर नुकतीच अभिजीत दिपके यांनी एका वृत्त वाहिनीला एक मुलाखत दिली.

या मुलाखतीत अभिजीत दिपके यांनी त्यांचे सहकारी सौरव दासबद्दल एक किस्सा सांगितला आहे. मुलाखतीवेळी बोलताना अभिजीत दिपके म्हणतात की, “आम्ही मार खाऊनही उभारी घेणारे लोक आहोत. जयपूरमध्ये मला मारहाण झाली, गेल्या आठवड्यात आशुतोष रांकाला मारहाण झाली. आता फक्त सौरव उरला आहे. सौरव तुझी पण वेळ येणार आहे.” असा गंमतीशीर शब्दांत अभिजीत दिपके यांनी सौरव दास यांना सूचक इशारा दिला आहे.

सुप्रिया सुळेंबाबतचं ‘ते’ वक्तव्य विजय वडेट्टीवारांनी घेतलं मागे; म्हणाले, ‘अनावधानाने उल्लेख झाला…’

जयपूरमध्ये अभिजीत दीपके यांच्यावर हल्ला

अभिजीत दिपके अमेरिकेतून भारतात दाखल झाल्यानंतर वेगवेगळ्या राज्यात दौऱ्यावर होते. जूनमध्ये राजस्थानमधील जयपूर येथे एका आंदोलनादरम्यान अभिजीत दीपके यांच्यावर हल्ला झाला होता. दीपके जयपूरमध्ये जमलेल्या आंदोलकांना संबोधित करण्यासाठी जात असताना, त्यांच्या एका समर्थकाने त्यांना खांद्यावर उचलले. यावेळी जमावातील एका व्यक्तीने त्यांना थप्पड मारली आणि खाली खेचण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. या हल्ल्यामागे आरएसएसशी संबंधित काही लोक असल्याचा आरोप दीपके यांनी केला. विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्याचा हा एक प्रयत्न असल्याचा दावा त्यांनी केला.

Amit Thackeray : ‘अमित साटम यांना भुंकायलाच ठेवलंय, तेच काम उत्तम करत आहेत,’ अमित ठाकरे यांची जहरी टीका

आशुतोष रांका यांच्यावर जमावाकडून हल्ला

तर चार दिवसांपूर्वीच राजस्थानमध्ये सीजेपीचे सह-संयोजक आशुतोष रांका आणि काही कार्यकर्त्यांवर हल्ला झाला. रांका आणि सीजेपीचे कार्यकर्ते जयपूरच्या बागरू विधानसभा मतदारसंघातील एका सरकारी शाळेची पाहणी करण्यासाठी जात असताना त्यांच्यावर हल्ला झाला. रांका यांनी सांगितले की, या हल्ल्यात सीजेपीच्या एका कार्यकर्त्याचा हात फ्रॅक्चर झाला आहे. रांका यांनी या घटनेत भाजप कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याचा आरोप केला होता.

या घटनांच्या आधारे, न्यूज 24ला दिलेल्या मुलाखतीत दीपके गंमतीने सौरव दास यांना, आता फक्त दासच उरले आहेत आणि त्यांचाही नंबर लागणार आहे, असा गंमतीशीर इशारा दिला आहे.

 

 

Web Title: National newsabhijeet dipke cjp school theek karo campaign interview funny warning to sourav das

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2026 | 05:04 PM

Topics:  

  • abhijeet dipke
  • CJP
  • Cockroach Janata Party

संबंधित बातम्या

CJP Leaders Breach Jantar Mantar: आशुतोष रांका-सौरव दास यांचा गनिमी कावा; दिल्ली पोलिसांची तटबंदी भेदून थेट जंतरमंतरवर घोषणाबाजी
1

CJP Leaders Breach Jantar Mantar: आशुतोष रांका-सौरव दास यांचा गनिमी कावा; दिल्ली पोलिसांची तटबंदी भेदून थेट जंतरमंतरवर घोषणाबाजी

New Delhi : आता जंतर-मंतर नाही, तर ‘या’ ठिकाणी करावं लागणारं आंदोलन, दिल्ली पोलिसांकडून मार्गदर्शक सूचना जाहीर
2

New Delhi : आता जंतर-मंतर नाही, तर ‘या’ ठिकाणी करावं लागणारं आंदोलन, दिल्ली पोलिसांकडून मार्गदर्शक सूचना जाहीर

CJP protest: CJP आंदोलन अन् थेट UN ची एंट्री! भारताने संयुक्त राष्ट्रसंघाला कसं खडसावलं?
3

CJP protest: CJP आंदोलन अन् थेट UN ची एंट्री! भारताने संयुक्त राष्ट्रसंघाला कसं खडसावलं?

CJP Ajinkya Shinde: अभिजीत दिपकेंच्या अटकेनंतर सूत्रे हाती घेणारे अजिंक्य शिंदे नेमके कोण? किती शिकलेत? जाणून घ्या
4

CJP Ajinkya Shinde: अभिजीत दिपकेंच्या अटकेनंतर सूत्रे हाती घेणारे अजिंक्य शिंदे नेमके कोण? किती शिकलेत? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.