Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tarun Tejpal: 2013 च्या लैंगिक अत्याचार प्रकरणात तरुण तेजपालांच्या अडचणी वाढल्या; सुप्रीम कोर्टाचे सरेंडरचे आदेश

Tarun Tejpal: माजी तहलका संपादक तरुण तेजपाल यांना सुप्रीम कोर्टाने दोन आठवड्यांच्या आत आत्मसमर्पण करण्याचे निर्देश दिले आहेत. 2013 मधील महिला सहकाऱ्याच्या लैंगिक अत्याचार प्रकरणात बॉम्बे हायकोर्टाने सुनावलेल्या 10 वर्षांच्या शिक्षेला तेजपाल यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 25, 2026 | 04:10 PM
2013 च्या लैंगिक अत्याचार प्रकरणात तरुण तेजपालांच्या अडचणी वाढल्या; सुप्रीम कोर्टाचे सरेंडरचे आदेश

2013 च्या लैंगिक अत्याचार प्रकरणात तरुण तेजपालांच्या अडचणी वाढल्या; सुप्रीम कोर्टाचे सरेंडरचे आदेश

Follow Us
Follow Us:
  • तरुण तेजपाल यांना सुप्रीम कोर्टाचा धक्का
  • दोन आठवड्यांत आत्मसमर्पण करण्याचे आदेश
  • 2013 च्या लैंगिक अत्याचार प्रकरणात तरुण तेजपालांच्या अडचणी वाढल्या
 

Tarun Tejpal: माजी तहलका संपादक तरुण तेजपाल यांना सुप्रीम कोर्टाकडून मोठा धक्का बसला आहे. 2013 मधील महिला सहकाऱ्याच्या लैंगिक अत्याचार प्रकरणात बॉम्बे हायकोर्टाने सुनावलेल्या 10 वर्षांच्या शिक्षेला आव्हान देणाऱ्या तेजपाल यांना सुप्रीम कोर्टाने दोन आठवड्यांच्या आत आत्मसमर्पण करण्याचे निर्देश दिले आहेत.

तेजपाल यांनी आत्मसमर्पण केल्यानंतर 22 सप्टेंबर रोजी त्यांच्या याचिकेवर सुनावणी करण्यात येईल, असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात गेलेल्या तेजपाल यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

काय आहे 2013 चे प्रकरण?

हे प्रकरण नोव्हेंबर 2013 मधील आहे. गोव्यातील एका लक्झरी हॉटेलच्या लिफ्टमध्ये तरुण तेजपाल यांनी आपल्या कनिष्ठ महिला सहकाऱ्याचे लैंगिक शोषण आणि तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला होता. महिलेच्या तक्रारीनंतर गोवा पोलिसांनी तेजपाल यांच्याविरोधात बलात्कारासह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर नोव्हेंबर 2013 मध्ये तेजपाल यांना अटक करण्यात आली होती.

लोणी काळभोरमध्ये सव्वा किलोचा गांजा जप्त; 95 हजारांचा मुद्देमालही हस्तगत, दोघांना अटक

2021 मध्ये सत्र न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता

या प्रकरणाची दीर्घकाळ न्यायालयीन प्रक्रिया सुरू होती. मे 2021 मध्ये मापुसा येथील सत्र न्यायालयाने पुराव्यांचा अभाव असल्याचे नमूद करत तरुण तेजपाल यांची सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता केली होती. मात्र, सत्र न्यायालयाच्या या निर्णयाला गोवा सरकारने विरोध केला. त्यानंतर सरकारने तेजपाल यांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात बॉम्बे हायकोर्टात अपील दाखल केले.

बॉम्बे हायकोर्टाने निर्णय फिरवला

6 ऑगस्ट 2026 रोजी बॉम्बे हायकोर्टाने सत्र न्यायालयाचा निर्णय उलटवत तरुण तेजपाल यांना प्रकरणात दोषी ठरवले. हायकोर्टाने विविध कलमांनुसार दोषी ठरवत त्यांना 10 वर्षांच्या कठोर कारावासाची शिक्षा आणि दंड सुनावला. या निर्णयामुळे 2021 मध्ये मिळालेला दिलासा संपुष्टात आला आणि तेजपाल यांनी हायकोर्टाच्या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली.

20 ऑगस्टला सुप्रीम कोर्टात याचिका

तरुण तेजपाल यांनी 20 ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करत बॉम्बे हायकोर्टाच्या दोषसिद्धीच्या निर्णयाला आणि 10 वर्षांच्या शिक्षेला आव्हान दिले. दुसरीकडे, गोवा सरकारनेही 18 ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल केला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता हायकोर्टाने सुनावलेली शिक्षा अपुरी असल्याचा दावा करत ती वाढविण्याची मागणी सरकारने केली आहे.

दोन आठवड्यांत सरेंडर करण्याचे आदेश

आता सुप्रीम कोर्टाने तेजपाल यांना दोन आठवड्यांच्या आत आत्मसमर्पण करण्यास सांगितले आहे. तेजपाल यांनी या आदेशाचे पालन करून आत्मसमर्पण केल्यास 22 सप्टेंबर रोजी प्रकरणाची पुढील सुनावणी केली जाणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. त्यामुळे या प्रकरणात आता तेजपाल आत्मसमर्पण केल्यानंतर सुप्रीम कोर्ट त्यांच्या दोषसिद्धी आणि 10 वर्षांच्या शिक्षेविरोधातील याचिकेवर काय भूमिका घेते, तसेच शिक्षा वाढविण्याच्या गोवा सरकारच्या मागणीवर काय निर्णय देते, याकडे लक्ष लागले आहे.

भाजप आमदाराच्या मुलीचा मंदिरात राडा; पीएसआय च्या कानशिलात लगावल्याचा व्हिडीओ व्हायरल

Web Title: Supreme court orders tarun tejpal to surrender within two weeks sexual assault case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2026 | 04:10 PM

Topics:  

  • Bombay High Court
  • Supreme Court

संबंधित बातम्या

‘लिव्ह इन’ हे विवाहाच्या समकक्ष, पालकसुद्धा त्यात हस्तक्षेप करू शकत नाहीत; दिल्ली हायकोर्टाचा मोठा निर्णय
1

‘लिव्ह इन’ हे विवाहाच्या समकक्ष, पालकसुद्धा त्यात हस्तक्षेप करू शकत नाहीत; दिल्ली हायकोर्टाचा मोठा निर्णय

Shiv Sena Symbol Case : ‘शिवसेना ठाकरेंची, शिंदेंची होऊ शकत नाही’; धनुष्यबाण गोठवण्याची कपिल सिब्बलांची सुप्रीम कोर्टात मागणी
2

Shiv Sena Symbol Case : ‘शिवसेना ठाकरेंची, शिंदेंची होऊ शकत नाही’; धनुष्यबाण गोठवण्याची कपिल सिब्बलांची सुप्रीम कोर्टात मागणी

Supreme Court on CJP Protest:जंतरमंतरवरील आंदोलन, महिला, मुलींचे लैंगिक छळ…; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
3

Supreme Court on CJP Protest:जंतरमंतरवरील आंदोलन, महिला, मुलींचे लैंगिक छळ…; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.