Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 2 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sushma Andhare: अंबादास दानवेंना उमेदवारी जाहीर होताच सुषमा अंधारेची पोस्ट व्हायरल, म्हणाल्या, ‘आमदारकी-खासदारकी…’

विधानपरिषदेसाठी ठाकरे गटाने अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. उद्धव ठाकरे यांच्याऐवजी दानवे रिंगणात उतरल्याने राजकीय चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 29, 2026 | 05:53 PM
अंबादास दानवेंना उमेदवारी जाहीर होताच सुषमा अंधारेची पोस्ट व्हायरल (Photo Credit- X)

अंबादास दानवेंना उमेदवारी जाहीर होताच सुषमा अंधारेची पोस्ट व्हायरल (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • विधानपरिषदेसाठी ठाकरे गटाकडून अंबादास दानवे रिंगणात
  • उद्धव ठाकरेंनी सस्पेन्स संपवला
  • सुषमा अंधारेंची पहिली प्रतिक्रिया
Sushma Andhare News: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील सर्वात महत्त्वाची घोषणा अखेर झाली आहे. शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वतः निवडणूक लढवणार की अन्य कोणाला संधी देणार, यावर गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला सस्पेन्स आता संपला आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार असतील, अशी घोषणा आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

उद्धव ठाकरेंनी दानवेंच्या पारड्यात टाकले वजन

विधानपरिषदेसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांनीच पुन्हा एकदा परिषदेत जावे, असा आग्रह धरला होता. मात्र, आगामी विधानसभा निवडणुका आणि पक्ष बांधणीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी स्वतःऐवजी अनुभवी नेते अंबादास दानवे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. दानवे हे उद्या (३० एप्रिल) सकाळी ११ वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

सुषमा अंधारे यांची भावूक पोस्ट

या निवडणुकीसाठी शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांचे नावही चर्चेत होते. मात्र, अंबादास दानवे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर अंधारे यांनी सोशल मीडियावर आपली भूमिका स्पष्ट केली. उद्धव ठाकरेंना राखी बांधतानाचा एक व्हिडिओ शेअर करत त्यांनी लिहिले, “आमदारकी, खासदारकी आपल्यावरून १०० वेळा कुर्बान.” या पोस्टद्वारे त्यांनी पक्षप्रमुखांच्या निर्णयाचा आदर करत निष्ठेचा संदेश दिला आहे.

आमदारकी खासदारकी आपल्यावरून 100 वेळा कुरबान…🥰 pic.twitter.com/4vU5VW2wyi — SushmaTai Andhare (@andharesushama) April 29, 2026


शहानूरवाडी आठवडी बाजार बंद करण्याच्या निर्णयाला कडाडून विरोध; अंबादास दानवेंच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांचे ‘जनआंदोलन’

भाजपकडून विधान परिषदेसाठी ६ उमेदवारांची यादी

दरम्यान, भाजपने विधान परिषदेसाठी ६ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजप संसदीय समितीच्या मंजुरीनंतर, भाजपने महाराष्ट्रातील ५ विधान परिषदांच्या जागांसाठी पाच उमेदवारांची अधिकृत घोषणा केली आहे. त्याचप्रमाणे, विधान परिषदेच्या एका पोटनिवडणुकीसाठी एकूण ६ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.

भाजप उमेदवार
सुनील कर्जतकर,
माधवी नाईक,
संजय भेंडे,
विवेक कोल्हे,
प्रमोद जठार,
प्रज्ञा सावंत

विधान परिषद निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम

निवडणूक अधिसूचना जारी करण्याची तारीख: २३ एप्रिल २०२६
उमेदवारी अर्ज भरण्याचा अंतिम दिवस: ३० एप्रिल २०२६
उमेदवार छाननी: २ मे २०२६
उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख: ४ मे २०२६
मतदानाची तारीख: १२ मे २०२६
मतदानाची वेळ: सकाळी ९ ते सायंकाळी ४.
मतमोजणी: १२ मे २०२६ सायंकाळी ५ वाजता
निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख: १३ मे २०२६

Sambhaji Nagar 2026: संभाजीनगरमध्ये ‘व्हीप’ वॉर! अंबादास दानवेंवर स्वपक्षीय आमदाराचे गंभीर आरोप

Web Title: Sushma andhares post goes viral immediately after ambadas danves candidacy is announced

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2026 | 05:52 PM

Topics:  

  • Ambadas Danve
  • Shisena UBT
  • sushma andhare
  • Uddhav Thackaray

संबंधित बातम्या

पुणे जिल्ह्यात ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं खिंडार; ‘या’ बड्या नेत्यांचा शिंदे गटात प्रवेश
1

पुणे जिल्ह्यात ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं खिंडार; ‘या’ बड्या नेत्यांचा शिंदे गटात प्रवेश

धर्मेंद्र प्रधानांनंतर आता नितीन गडकरी टार्गेटवर? उद्धव ठाकरेंच्या एका वक्तव्याने राजकीय चर्चांना उधाण
2

धर्मेंद्र प्रधानांनंतर आता नितीन गडकरी टार्गेटवर? उद्धव ठाकरेंच्या एका वक्तव्याने राजकीय चर्चांना उधाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.