Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pankaja Munde News: ‘तो दिवस आमच्या कुटुंबासाठी अत्यंत दुखद आणि उद्ध्वस्त करणारा होता’: पंकजा मुंडे

“हा बंगला मला राहण्यासाठी मिळाला आहे. खरं तर, २०१४ मध्येच मी तो मागितला होता, पण तो वरिष्ठ मंत्र्यांचा बंगला असल्याने मला मिळाला नव्हता. आता तो मला मिळाल्याने मला मोठं पारितोषिक मिळाल्याचा आनंद वाटतो

  • By anuradha sagar
Updated On: Jun 03, 2025 | 01:34 PM
Pankaja Munde News: ‘तो दिवस आमच्या कुटुंबासाठी अत्यंत दुखद आणि उद्ध्वस्त करणारा होता’: पंकजा मुंडे
Follow Us
Follow Us:

Pankaja Munde News:  तीन जून 2014 हा दिवस पंकजा मुंडे यांच्या कुटुंबासाठी अत्यंत दुखद आणि उद्ध्वस्त करणारा होता, अशी भावना मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली. त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. तसेच, मुलगी म्हणून त्यांचे कर्तव्य जाणीवपूर्वक पार पाडण्यासाठी आज साधारण कार्यक्रम आयोजित केला असल्याचेही त्यांनी सांगितले. दिवंगत उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज परळीत रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. पण पावसामुळे हा कार्यक्रम लवकर संपवावा लागला, पण मुंडे साहेबांच्या संकल्पनेतून आम्ही काम करत आहोत. आतापर्यंत अनेक कामे झाली आहेत.

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची आज पुण्यतिथी आहे. या निमित्ताने गोपीनाथगडावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात ११ वर्षांनंतर पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत. गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त धनंजय मुंडे उपस्थित राहणार की नाहीत, असा प्रश्न विचारल्यानंतर पंकजा मुंडे म्हणाल्या की, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आता आमचा मित्र पक्ष आहे. त्यामुळे त्या पक्षातील सर्व नेत्यांना आम्ही निमंत्रण दिले आहे. तसेच, धनंजय मुंडे यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. कार्यक्रमात कीर्तनाचाही समावेश आहे आणि धनंजय मुंडे हे माझे भाऊ असल्यामुळे ते नक्कीच या कीर्तनाला उपस्थित राहतील.”११ वर्षांनंतर एकाच मंचावर दोन्ही मुंडे बंधू-भगिनी येणार असल्यामुळे हा कार्यक्रम राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे.

Pune News: मंत्र्यांच्या दौऱ्यांसाठी कोट्यवधी खर्च अन् लाडक्या बहिणींसाठी निधीची टंचाई; सामाजिक कार्यकर्त्याची टीका

रामटेक बंगला- एका विचारांचे आणि जबाबदारीचे प्रतीक

रामटेक बंगल्याबाबतही पंकजा मुंडे यांनी भाष्य केले. “हा बंगला मला राहण्यासाठी मिळाला आहे. खरं तर, २०१४ मध्येच मी तो मागितला होता, पण तो वरिष्ठ मंत्र्यांचा बंगला असल्याने मला मिळाला नव्हता. आता तो मला मिळाल्याने मला मोठं पारितोषिक मिळाल्याचा आनंद वाटतो, मुंडे साहेबांच्या पश्चात मला हा बंगला मिळणे, ही गोष्ट ऐतिहासिक आहे. देशात असं एखादंच उदाहरण असेल. हा बंगला माझ्यासाठी केवळ वास्तू नाही, तर एका विचारांचा आणि जबाबदारीचा प्रतीक आहे,” असेही त्यांनी नमूद केले.

 

 

Web Title: That day was extremely sad and devastating for our family pankaja munde

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2025 | 01:34 PM

Topics:  

  • BJP
  • dhananjay munde
  • gopinath munde
  • Pankaja Munde

संबंधित बातम्या

BJP New Incharge List 2026: भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश, बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी
1

BJP New Incharge List 2026: भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश, बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी

BJP MLA Son Missing: भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता; अपहरण,दहशतवादाचा संशय अन् नाट्यमय घडामोडी
2

BJP MLA Son Missing: भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता; अपहरण,दहशतवादाचा संशय अन् नाट्यमय घडामोडी

Rahul Bondre : राहुल गांधींचा एक फोन अन् राहुल बोंद्रेंचा भाजप प्रवेश थांबला? यशोमती ठाकूरांनी सांगितलं काय घडलं
3

Rahul Bondre : राहुल गांधींचा एक फोन अन् राहुल बोंद्रेंचा भाजप प्रवेश थांबला? यशोमती ठाकूरांनी सांगितलं काय घडलं

महायुतीत नवा ट्विस्ट! मुंबईत शिंदे गट मैदानात; पुण्यात भाजपच्या स्वबळाचे संकेत
4

महायुतीत नवा ट्विस्ट! मुंबईत शिंदे गट मैदानात; पुण्यात भाजपच्या स्वबळाचे संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.