नांदेड महापालिका इलेक्शन मॅनेजमेंटची सूत्रे बेट कॉंग्रेसच्या खासदार रवींद्र चव्हाण यांच्या हाती आहेत (फोटो - सोशल मीडिया)
Maharashtra Politics : नांदेड : मनपाच्या आगामी निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असताना, कांग्रेस-वंचित आघाडीने या निवडणुकीसाठी अत्यंत नियोजनबद्ध अभ्यासपूर्ण आणि सकारात्मक प्रचार मंत्रणा उभी केली आहे. या संपूर्ण इलेक्शन मॅनेजमेंटची सूत्रे बेट खासदार रवींद्र चव्हाण यांनी आपल्या हाती घेतल्याने काँग्रेसच्या प्रचाराला नवी धार आणि आत्मविश्वास मिळाला आहे.
नांदेड शहरातील त्यांच्या कार्यालयाला अक्षरशः वॉर रूमचे स्वरूप प्राप्त झाले असून, प्रत्येक प्रभागातील राजकीय समीकरणे, सामाजिक रचना, मतदारांचा कल, स्थानिक प्रश्न आणि उमेदवाराची जनमानसातील प्रतिमा यांचा सखोल अभ्यास करून निर्णय घेतले जात आहेत. केवळ निवडणूक जिंकण्यापुरते मर्यादित न राहता, शहराच्या दीर्घकालीन विकासाचा विचार केंद्रस्थानी ठेवून उमेदवारांची निवड करण्यात आल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.
हे देखील वाचा : बंडखोरांना शिवसेनेचा दणका; विरोधात अर्ज भरणाऱ्या 26 नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
खासदार रवींद्र चव्हाण यांची कार्यपद्धती ही डेटा, अनुभव आणि लोकसंवाद यांचा प्रभावी मेळ घालणारी आहे. प्रत्येक प्रभागातील अहवाल, स्थानिक कार्यकर्त्यांशी थेट संवाद, नागरिकांच्या अपेक्षा आणि मागील निवडणुकांचे विश्लेषण या सर्व घटकांवर आधारित नियोजनामुळे काँग्रेस वंचित आघाडीने प्रत्येक प्रभागात सक्षम आणि विश्वासार्ह उमेदवार मैदानात उतरवले आहेत. त्यामुळे यावेळी जवळपास सर्वच प्रभागांमध्ये चुरशीची आणि विचारप्रधान लढत पाहायला मिळत आहे.
नांदेड शहराच्या इतिहासाकडे पाहिले तर काँग्रेस पक्षाची भूमिका ही केवळ राजकीय नव्हे, तर विकासात्मक राहिली आहे. तब्बल ३० ते ३२ वर्षे नांदेड महानगरपालिकेवर काँग्रेसची एकहाती सत्ता होती. शहराचा जो सर्वांगीण विकास झाला, तो काँग्रेसच्या दूरदृष्टीपूर्ण धोरणांमुळेच शक्य झाला, हे नांदेडकर नाकारू शकत नाहीत. पाणीपुरवठा योजना, रस्ते, शिक्षण संस्था, आरोग्य सुविधा, प्रशासकीय विस्तार, सांस्कृतिक केंद्रे आणि नागरी सोयीसुविधांची पायाभरणी याच काळात झाली.
हे देखील वाचा : ‘निवडणूक आयोग भाजपच्या दावणीला बांधलेला अन् राहुल नार्वेकर…’; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची सडकून टीका
काँग्रेस – वंचित आघाडी सक्षम पर्याय
आज नांदेड शहराला जे शहरी स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामागे काँग्रेसच्या विकासात्मक विचारसरणीचा ठसा ठळकपणे दिसतो. शहर केवळ वाढवायचे नाही, तर माणसांच्या जीवनमानात गुणवत्ता आणायची हा विचार काँग्रेसच्या कारभाराचा केंद्रबिंदू राहिला आहे. हाच विचार घेऊन खासदार रवींद्र चव्हाण आजच्या निवडणुकीत काम करत असून, भूतकाळातील विकासाचा वारस्य आणि भविष्यातील नव्या संधी यांचा सेतु बांधण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
काँग्रेस वंचित आघाडीचा प्रचार हा नकारात्मकतेवर नव्हे, नव्हे, तर काम, अनुभव आणि विश्वास यावर आधारित असल्याचे चित्र दिसत आहे. मतदारांशी थेट संवाद, स्थानिक प्रश्नांना प्राधान्य आणि सामाजिक समावेशकतेवर भर देणारी ही रणनीती नांदेडच्या राजकारणात सकारात्मक बदलाची नांदी ठरेल, अस विश्वास कार्यकत्यांमध्ये व्यक्त केला जात आहे. एकंदरीत, खासदूर रवींद्र चव्हाण यांच्या नेतृ नेतृत्वाखाली सुरू असलेले है सूक्ष्म नियोजन, काँग्रेसच्या दीर्घकालीन विकासदृष्टीची आठवण करून देणारे ठरत असून, नदिड महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस अंचित आघाडीला नव्या उंचीवर नेणारे ठरेल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.






