Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 25 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik News: राज-उद्धव युतीपूर्वीच वादाची ठिणगी; नाशिकच्या बैठकीत नेमकं काय घडलं?

मनसे आणि शिवसेना (ठाकरे गट) यांची संयुक्त बैठक नाशिकमधील शिवसेना कार्यालयात पार पडली. बैठकीदरम्यान दोन्ही पक्षांचे प्रमुख पदाधिकारी आपले विचार मांडत होते.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 08, 2025 | 04:55 PM
Nashik News: राज-उद्धव युतीपूर्वीच वादाची ठिणगी; नाशिकच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
Follow Us
Follow Us:

Nashik News: राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने मनसे प्रमुख राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत संभाव्य युतीबाबत चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. शहरातील रस्त्यांवरील खड्डे, वाढती गुन्हेगारी, अनियमित पाणीपुरवठा आणि शेतकऱ्यांचे प्रश्न यासारख्या मुद्द्यांवर या बैठकीत विशेष चर्चा झाली.

मात्र, या बैठकीत ठाकरे गटाचे दोन नेते – जयंत दिंडे आणि विनायक पांडे यांच्यात विधानसभा निवडणुकीतील प्रचाराच्या मुद्द्यावरून तीव्र वाद झाला. या वादानंतर विनायक पांडे यांनी बैठकीतून निघून जाणे पसंत केले. यामुळे बैठकीत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. या वादामुळे नाशिकमध्ये राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, संभाव्य युतीच्या पार्श्वभूमीवर ही घटना महत्त्वाची मानली जात आहे.

AI मुळे 5 लाख नोकऱ्यावर गदा! TCS ने 12,000 कर्मचाऱ्यांच्या कपातीनंतर तज्ज्ञांचा इशारा

नेमकं काय घडलं?

मनसे आणि शिवसेना (ठाकरे गट) यांची संयुक्त बैठक नाशिकमधील शिवसेना कार्यालयात पार पडली. बैठकीदरम्यान दोन्ही पक्षांचे प्रमुख पदाधिकारी आपले विचार मांडत होते. याच वेळी शिवसेना (ठाकरे गट) चे नेते जयंत दिंडे भाषणासाठी उभे राहिले. आपल्या भाषणाच्या शेवटी जयंत दिंडे यांनी विधानसभा निवडणुकीसंदर्भात स्वतःचे विश्लेषण मांडले. त्यांनी नमूद केले की, नाशिक मध्यम मतदारसंघातून वसंत गीते यांचा पराभव झाला, यामागे प्रचारात काही मुद्द्यांचे योग्य नियोजन न झाल्याचे कारण होते.

“एमडी ड्रग्जसारख्या संवेदनशील विषयासह काही मुद्दे आम्ही चुकीच्या पद्धतीने हाताळले. जर हे मुद्दे प्रचारातून वगळले गेले असते, तर कदाचित विजय आपल्याकडे झुकला असता,” असे दिंडे यांनी स्पष्ट केले. याच वक्तव्यावरून उपस्थितांमध्ये वातावरण तापले आणि पुढे वादाच्या रूपात त्याचा विस्फोट झाला.

Uddhav Thackeray-Rahul Gandhi Meeting: दिल्लीतील चर्चांमागचं ‘राज’कारण; राहुल-उद्धव भेटीत काय ठरलं?

शहरातील स्थानिक प्रश्नांवर चर्चा सुरू असतानाच, बैठकीत वादाची ठिणगी पडली आणि वातावरण तापले. शिवसेना कार्यालयात ही बैठक झाली. यावेळी शिवसेना नेते जयंत दिंडे भाषणासाठी उभे राहिले. त्यांनी विधानसभा निवडणुकीतील पराभवावर भाष्य करत, “नाशिक मध्यम मतदारसंघातून वसंत गीते यांचा पराभव झाला, त्यामागे एमडी ड्रग्जसारख्या मुद्द्यांची चुकीची हाताळणी जबाबदार होती. हे मुद्दे प्रचारातून वगळले असते, तर विजय शक्य होता,” असे मत व्यक्त केले.

दिंडे यांच्या या वक्तव्यावर वसंत गीते यांचे जवळचे सहकारी आणि माजी महापौर विनायक पांडे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. ते  म्हणाले, “आम्ही गेल्या ४० वर्षांपासून लढा देतोय, मग आम्ही नेमकं केलं तरी काय?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कारण गीते आणि पांडे यांनी मिळून संपूर्ण प्रचाराची रणनीती आखली होती. वातावरण तणावपूर्ण होताच, जयंत दिंडे यांनी क्षमा मागून प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतप्त झालेल्या विनायक पांडे यांनी तातडीने बैठकीतून काढता पाय घेतला. त्यांचा निषेध नोंदवत त्यांनी कार्यालयातून बाहेर पडल्याचे पाहायला मिळाले. या वादामुळे संभाव्य युतीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये राजकीय चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे.

 

 

Web Title: The spark of controversy even before the raj uddhav alliance what exactly happened in the nashik meeting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2025 | 04:10 PM

Topics:  

  • Nashik News
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

डिजिटल अरेस्टची पुन्हा घटना; मनी लाँड्रिंगमध्ये अडकवण्याची धमकी देत 71 लाख लुटले
1

डिजिटल अरेस्टची पुन्हा घटना; मनी लाँड्रिंगमध्ये अडकवण्याची धमकी देत 71 लाख लुटले

टंचाई निवारणार्थ 13.84 कोटी; टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी 11 कोटींची तरतूद
2

टंचाई निवारणार्थ 13.84 कोटी; टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी 11 कोटींची तरतूद

Uddhav Thackeray : ‘गोळी लागली असती तर आरोपी पकडून काय चाटायचंय?’ टायगर श्रॉफ प्रकरणावरून उद्धव ठाकरेंचा शिंदेंना टोला
3

Uddhav Thackeray : ‘गोळी लागली असती तर आरोपी पकडून काय चाटायचंय?’ टायगर श्रॉफ प्रकरणावरून उद्धव ठाकरेंचा शिंदेंना टोला

Uddhav Thackeray Dasara Melava : उद्धव ठाकरेंनी सांगितली युवराजची गोष्ट आणि सगळेच हळहळले; राज्यातील भयाण दुष्काळाचे मांडले वास्तव!
4

Uddhav Thackeray Dasara Melava : उद्धव ठाकरेंनी सांगितली युवराजची गोष्ट आणि सगळेच हळहळले; राज्यातील भयाण दुष्काळाचे मांडले वास्तव!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.