
Maharashtra Politics: राजकारणात मोठा भूकंप! 'उबाठा'चे नगरसेवक फुटणार? नेमका विषय काय?
मुंबई महानगरपालिकेत महायुतीची सत्ता
29 पैकी 25 महापालिकेत महायुतीची सत्ता
शिंदेंचे नगरसेवक हॉटेलमध्ये वास्तव्याला
Eknath Shinde/BMC Election 2026: राज्यात नुकत्याच 29 महानगरपालिकांचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये महायुतीने मोठे यश संपादन एले आहे. राज्यातील 29 पैकी जवळपास 25 महापालिकेत महायुतीची सत्ता आली आहे. त्यात मुंबई महानगरपालिकेत देखील महायुतीची सत्ता आली आहे. मात्र उद्धव ठाकरे यांनी देवाच्या मनात असेल तर आमचा महापौर होईल असे विधान केले होते. मात्र आता त्यांचेच नगरसवेक फुटणार की काय अशी चर्चा सुरू झाली आहे.
एकनाथ शिंदेंचे 29 नगरसेवक मुंबई महानगरपालिकेत निवडून आले आहेत. भाजपचे देखील 80 च्या वर नगरसेवक आले आहेत. त्यामुळे मुंबईत महायुतीची सत्ता येणार जे स्पष्ट झाले आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी आपले 29 नगरसेवक हॉटेलमध्ये ठेवले आहेत. नगरसेवक फुटू नयेत याची काळजी घेतली जास्त असल्याचे म्हटले जात आहे.
मुंबईत सत्ता स्थापन करण्यासाठी फोडाफोडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व प्रकारची काळजी घेतली जात आहे. त्यामुळे मुंबई महापौर पदासाठी मुंबईत राजकीय फोडाफोडी होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांनी हॉटेलमध्ये ठेवलेल्या आपल्या नगरसेवकांशी संवाद साधल्याचे समोर आले आहे. ठाकरे गटणे नगरसेवक फुटू नयेत म्हणून हॉटेलमध्ये ठेवल्याचा आरोप शिवसेनेवर केला आहे. त्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे.
Maharashtra Politics: “खुर्च्या कशा मतदान…”; BMC निकालावर उद्धव ठाकरेंचा विरोधकांना टोला
दरम्यान एकनाथ शिंदे यांनी महापालिकेतील कामकाज, नगरसेवक म्हणून कसे काम करायचे आणि अन्य गोष्टींवर हॉटेलमदये नगरसेवकांशी संवाद साधल्याचे म्हटले जात आहे. तेव्हा ठाकरे गटाच्या आरोपावर त्यांनी उत्तर दिल्याचे समोर येत आहे. आम्हाला कोणतीही भीती नाही. त्यांनाच त्यांच्या नगरसेवकांची भीती आहे. त्यांनी त्यांचे नगरसेवक सांभाळून ठेवावेत असे शिंदे यांनी म्हटल्याचे समोर येत आहे.
उद्धव ठाकरेंचा विरोधकांना टोला
महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरे म्हणाले, “प्रत्येक निवडणूक जणू काही त्यांच्या जीवणमरणाचा प्रश्न असल्यासारखा साम, दाम, दंड, भेद वापरुन लढल्या गेल्या. शिवसैनिकांना अटक झाली, पक्षांची लालूच दाखवली गेली, तडीपार केले गेले. ठाण्यात देखील उमेदवारांना पैशांची आमिष देण्यात आले. जबरदस्ती उमेदवारी मागे घेण्याचा प्रयत्न केला गेला.”
“जे काही यश शिवशक्तीने मिळवले आहे त्यामुळे सत्ताधारी पक्षाला घाम फोडला आहे हे नक्कीच. शिवसेनेला नामोहरम करण्यासाठी त्यांनी एकही प्रयत्न सोडला नाही. यांच्या सभेला गर्दी फुलली होती. मात्र दुसऱ्या दिवशी खुर्च्यांची गर्दी होती. मात्र खुर्च्या कशा मतदान करून शकतात? हे न उलगडणारे कोडे आहे. भाजपने कागदावरची शिवसेना संपवली असेल, मात्र त्यांना जमीनिवरची त्यांना संपवता येणार आहे. भाजप हा पक्ष कागदावर्ती आहे मात्र जमिनीवर नाही,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.