Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shivsena : ‘जमलेल्या माझ्या तमाम..,’ उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली, षण्मुखानंद हॉलमध्ये ठाकरे गटाचा शिवसेना वर्धापन दिन मेळावा

ऑपरेशन टायगरनंतर प्रथमच उद्धव ठाकरे शिवसैनिकांना संबोधित करत आहेत. शिवसेनेच्या ६० व्या वर्धापनदिनानिमित्त षण्मुखानंद सभागृहात आयोजित मेळाव्याकडे महाराष्ट्राच्या राजकारणाचे लक्ष लागले आहे.

  • By विवेक
Updated On: Jun 20, 2026 | 05:36 PM
उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली, षण्मुखानंद हॉलमध्ये ठाकरे गटाचा शिवसेना वर्धापन दिन मेळावा

उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली, षण्मुखानंद हॉलमध्ये ठाकरे गटाचा शिवसेना वर्धापन दिन मेळावा

Follow Us
Follow Us:

शिवसेनेच्या स्थापनेला ६० वर्षे पूर्ण होत असताना राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एकीकडे ठाकरे गटातील सहा खासदारांच्या बंडामुळे निर्माण झालेली खळबळ, तर दुसरीकडे शिवसेनेच्या वर्धापनदिनाचे मेळावे यामुळे सर्वांचे लक्ष मुंबईकडे लागले आहे. ठाकरे गट आणि शिंदे गट स्वतंत्रपणे वर्धापनदिन साजरा करणार आहेत अश्यातच, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वर्धापनदिन मेळावा मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. ‘ऑपरेशन टायगर’नंतर प्रथमच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधित करत असल्याने या भाषणाकडे विशेष लक्ष लागले आहे.

खचून गेलेला नाही तर पेटलेला शिवसैनिक माझ्यासोबत 

“जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो” म्हणत उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. यावेळी उपस्थितांशी संवाद साधत ते म्हणाले, “आज अनेकांना वाटलं होतं, आजच्या मेळाव्याला खचून गेलेला शिवसैनिक येईल. मात्र हा खचून गेलेला नाही तर पेटलेला शिवसैनिक आहे. संकटाला पुरून उरणारा शिवसैनिक माझ्यासोबत आहे. आज देशाच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक हा सोहळा पाहात आहेत. भाजप आहे कुठे? त्यांना संसदेत दोन तृतीयांश बहुमत नाही,” असे ते म्हणाले.

30 वर्षात भाजपसोबत  विलीन झालो नाही, तर आता काँग्रेसमध्ये कसे होणार?

ते पुढे म्हणाले, “30 वर्षे आम्ही भाजपसोबत होतो. या 30 वर्षात त्यांच्यासोबत विलीन झालो नाही, तर आता काँग्रेसमध्ये कसे होणार? भाजपचं आता एकनाथ शिंदेंच्या गटात सामील होणार आहे. माझ्यावर टीका होत आहे. आदित्यवर घाणेरडे आरोप होत आहेत. एकनाथ शिंदेंना दुसऱ्याचे बाप चोरावे लागत आहेत.”

हक्काचे 20 आमदार आणि अनेक नगरसेवक अजूनही खंबीरपणे सोबत

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “आपण चार खासदारांचा सत्कार तर केलाच आहे, पण त्यासोबतच आपले हक्काचे 20 आमदार आणि अनेक नगरसेवक अजूनही खंबीरपणे सोबत उभे आहेत. ज्या वेळेपासून आपण आपले यश – अपयश हे केवळ निवडणुकीच्या निकालासोबत तुलना करायला लागतो, तिथेच आपण फसतो, असं माझं स्पष्ट मत आहे. शिवसेनाप्रमुखांसोबत पहिली नेत्यांची फळी ज्या वेळी होती, ज्यांनी पक्षासाठी अतोनात कष्ट घेतले. ते निष्ठावंत आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पाहायला मिळत आहेत,” असे ते म्हणाले.

… तर देश अराजकतेकडे जाऊ शकतो

“लोकांचा लोकशाहीवरील विश्वास उडत चालला आहे. मला चिंता वाटते कि, जर हे असेच चालू राहिले तर देश अराजकतेकडे जाऊ शकतो. माझ्या आवाहनाला आणि बाळासाहेबांच्या नावाला प्रतिसाद देत या मतदारांनी आम्हाला मतदान केले होते. मोदींचे नाव न वापरता आम्ही या नऊ जागा जिंकल्या होत्या.”

Web Title: Uddhav thackeray first speech after operation tiger shiv sena foundation day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2026 | 08:35 PM

Topics:  

  • Shivsena UBT
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Uddhav Thackeray On Maharashtra Drought: अधिसूचना ठीक, पण पंचनामे कधी? दुष्काळावरून उद्धव ठाकरेंचा थेट सरकारला सवाल
1

Uddhav Thackeray On Maharashtra Drought: अधिसूचना ठीक, पण पंचनामे कधी? दुष्काळावरून उद्धव ठाकरेंचा थेट सरकारला सवाल

उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंना कोर्टाचा दिलासा; Vasant Davkhare मानहानी प्रकरणाचा निकाल, 2009 च्या CD प्रकरणात चौघांची निर्दोष मुक्तता
2

उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंना कोर्टाचा दिलासा; Vasant Davkhare मानहानी प्रकरणाचा निकाल, 2009 च्या CD प्रकरणात चौघांची निर्दोष मुक्तता

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरून शिंदे गटाचा आज युक्तिवाद; अंतिम निर्णय आता नेमकी कधी?
3

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरून शिंदे गटाचा आज युक्तिवाद; अंतिम निर्णय आता नेमकी कधी?

Sushma Andhare : ‘शेतकरी उपाशी मरतोय, नेते काजू-बदामावर ताव मारतायत,’ सुषमा अंधारेंचा सरकारवर हल्लाबोल
4

Sushma Andhare : ‘शेतकरी उपाशी मरतोय, नेते काजू-बदामावर ताव मारतायत,’ सुषमा अंधारेंचा सरकारवर हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.