मनसे अध्यक्ष राज ठाकरे (फोटो- यूट्यूब)
उद्धव ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची नाशिकमध्ये सभा
महानगरपालिका निवडणुकीमध्ये ठाकरेंची पहिलीच जाहीर सभा
15 तारखेला मतदान तर 16 तारखेला निकाल जाहीर होणार
Nashik News: राज्यात महानगरपालिका निवडणुकीचा रंणसंग्राम सुरू आहे. यंदाच्या निवडणुकीत राज्यात वेगवेगळ्या युती आणि आघाडी आपल्याला पाहायला मिळत आहे. 15 तारखेला मतदान आणि 16 तारखेला निकाल जाहीर होणार आहे. अनेक वर्षांनी ठाकरे बंधू देखील एकत्रित आल्याचे पाहायला मिळाले आहे. तर अनेक ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष एकत्रित आले आहेत. आज ठाकरे बंधू यांची नाशिकमध्ये जाहीर सभा पार पडली. यावेळी ठाकरे बंधू यांनी जनतेला संबोधित केले.
नाशिकमधील सभेत बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले, ” निवडणुका घेण्यासाठी इतका कालावधी का लागला याचे कारण कोणीच सांगू शकत नाही. याचे उत्तर आत्ताच्या सरकारने दिल पाहिजे. इतका चुकीचा कॅरम फुटला आहे ना, कोणाच्या सोंगट्या कोणाच्या भोकात आहेत हेच समजत नाही. आज कुठे हे प्रत्येकाला विचारावे लागते.”
पुढे बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले, “महाराष्ट्रात निवडणुकीवरून मोठ्या प्रमाणात गोंधळ सुरू आहे. पालिका निवडणुका घेण्यासाठी इतका वेळ का लागला? नाशिकमध्ये तुमच्याकडे काम करणारी माणसे होती ना? 1952 मध्ये जन्माला आलेल्या जनसंघ पक्षाला म्हणजे आताच्या भाजपला 2026 मध्ये पोर भाड्याने घ्यावी लागतात. तुमच्याकडे माणसे असताना दुसऱ्यांची का कडेवर घेताय?”
“2012 मध्ये माझी नाशिकमध्ये सत्ता आली. 2017 मध्ये फडणवीस आले आणि म्हणाले मी नाशिक दत्तक घेतो. त्या गोष्टीना नाशिककर भुलले आणि आमची केलेली कामे विसरली. मात्र त्यानंतर बाप इकडे फिरकलाच नाही. भाजपने पक्षातील लोकांना छाटले. 2012 मध्ये आमची सत्ता असताना उत्तम कुंभमेळा झाला. आमच्या काळात एकही भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही. आता यांना कामे करायची नाहीत. जाती, धर्माच्या नावावर यांना भुलवायचे. “






