देशात सध्या हिंदुत्त्वाची मोठी लाट आहे. याचाच फायदा घेत मुंबई आणि मुंबईला लागून असलेल्या काही उमेदवारांकडून हिंदुत्त्ववादी नेत्यांच्या प्रचारसभांची मागणी होत आहे.
उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मोठी गळती लागली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. निवडणुकीच्या प्रचाराची रणनीती ठरवावी की पक्ष सोडून जाणाऱ्यांना थांबवावे असा प्रश्न उद्धव ठाकरे यांच्यासमोर उभा ठाकला आहे.
आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळणाऱ्या मुबंई महापालिकेसह राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. १५ जानेवारी ला मतदान होणार आहे.
"मराठी लोक महाराष्ट्रासाठी काय निर्णय घेतात हे त्यांचे काम आहे. परंतु हे खरे आहे की राज्यात मराठी भाषा आणि मराठी अस्मिता धोक्यात आहे. मी काँग्रेसी असलो तरी सत्य तेच आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक नवीन युतीचा जन्म झाला आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी युती केली आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीयआधी दोन्ही ठाकरे बंधु एकत्रित आले आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे अशी इच्छा व्यक्त केली जात होती. राजकीय विश्लेषकांपासून ठाकरेंच्या चाहते, कार्यकर्त्यांकडून त्यांनी एकत्र यावे, अशी मागणी होत होती.
ठाकरे बंधूंमधील युतीनंतर, पुणे महानगरपालिकेत काका-पुतणे शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील युतीची तारीख जाहीर करण्यात आली आहे. अजित पवार यांनी यांनी २६ डिसेंबर रोजी अधिकृतपणे युतीची घोषणा करतील
उद्धव ठाकरे आणि मनसेच्या युतीची ज्या ब्ल्यू सी हॉटेलमध्ये पत्रकार परिषद होणार आहे. त्याच ठिकाणी महाराष्ट्राच्या राजकारणातील अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या होत्या.
महाविकास आघाडीला मोठा फटका बसला आहे. दरम्यान भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला चिंतन करण्याची आवश्यकता असल्याचे समोर आले आहे.
ठाकरे गटाची शिवसेना आणि मनसे यांच्यातील युती आज किंवा उद्या जाहीर होऊ शकते. युतीची घोषणा करण्यासाठी भव्य पत्रकार परिषद किंवा मोठ्या मेळाव्याचे आयोजन करण्याचे नियोजन दोन्ही पक्षांकडून करण्यात येत आहे.
२३ तारखेपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. त्याच दिवशी मनसे–शिवसेना युतीची अधिकृत घोषणा होणार असून, सर्व महानगरपालिकांबाबतची युती एकाच वेळी जाहीर केली जाणार आहे.
सध्याच्या सरकारचा कारभार अंधाधुंद असून, त्याचे गंभीर परिणाम समाजाला भोगावे लागत असल्याचे ठाकरे पत्रकार परिषदेत म्हणाले. राजकारणासाठी चुकीच्या लोकांचा वापर केल्याचा आरोप ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर केला.
दिल्लीत ७० पैकी केवळ तीन सदस्य असूनही आम आदमी पार्टीने भाजपला विरोधी पक्षनेतेपद दिले होते. तेव्हा त्यांनी ते स्वीकारले, तर महाराष्ट्रात का नाही?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
राज्याच्या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षनेता नसल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी विधान सभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेचे अध्यक्ष राम शिंदे यांची भेट घेतली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही देशभक्त संघटना असून पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय गृहमंत्री अमितजी शहा यांच्यावर केलेली टीका हे समतोल ढासळ्याचे लक्षण असल्याचा टोला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला.
कोकणातील आंब्यालाच हापूसचा दर्जा मिळाला पाहिजे, अशी आग्रही मागणी आमदार शेखर निकम यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात केली. बांबू लागवड, ॲग्रीस्टॅक योजनेतील अडचणी संदर्भात देखील निकम यांनी यावेळी भाष्य केले.